“वडीलांनी त्यांना प्रश्न विचारला बाई तुमच्या कडे किती दिवसा पासून फोन आहे.”
“2 वर्ष पासून.”
“2 वर्षात काही प्रॉब्लेम आला का?”
“नाही”
“फक्त एकदा फोन बिघडला म्हणून तुम्ही एवढ्या बोललात पण 2 वर्षे सतत चांगली सेवा दिली त्या बद्दल कधी आभार मानलेत का?”
बाई, कंपनीत मध्ये काम करणारी सुद्धा लोकच असतात. त्यांच्या कडून सुद्धा चुका होऊ शकतात. एका चुकीसाठी एवढे बोलण्याची गरज नव्हती. तेव्हा बाईला चूक उमजली आणि झालेल्या चुकी बद्दल माफी सुद्धा मागीतली.
आपण कधी कोणी चांगले काम करत असेल तर त्याचे कधीच आभार मानत नाही किंवा धन्यवाद सुद्धा म्हणत नाही. मात्र त्याने एखादी चूक केली कि त्यावर तुटून पडतो. चांगलं काम करणार्याला आभार मानल्यास हुरूप येतो आणि प्रेरणा मिळते.
वडीलांनी सांगीतले त्यासाठी तू सुद्धा आभार मानायला शिकत जा.
काही महिन्यापुर्वी मी तिरूपती ला गेलो होतो. तिथे अन्न प्रसादम मध्ये भोजन प्रसाद घेतला. अतिशय सुंदर स्वयंपाक झाला होता. माझे जेवण संपवून मी तेथील वाढणाऱ्याला धन्यवाद म्हटले. तर तो खूप खुष झाला. त्याने मला रजिस्टर मध्ये एन्ट्री करायला सांगितली. 2 मिनिटे का होईना त्याच्या चेहर्यावर हास्य फुलले. मला सुद्धा खूप प्रसन्न वाटले.
Views: 59