ब्लॉग – कविता: मित्रांची मैफल

Friendship

जमवू मित्रांची मस्त मैफल
काढू प्रत्येकांची पिसे अस्सल
लावू मस्त गप्पा-टप्पाचा फड
कधी-कधी आठवणीं होतील जड

घेऊ महत्त्वाच्या विषयावर सल्ला
एकमेका करून मदत गाठू पल्ला
करू विचाराचे मंथन मांडू मत
पुढील भेटीसाठी देवू विचारांना खत

सोडू कधी सुख दु:खाची शिदोरी
येतील ते स्वर्गीय क्षण पुन्हा माघारी
घेऊ थोडा आयुष्यातून छोटासा ब्रेक
लुटू आनंद हीच जीवनाची खरी मेख

फोटोग्राफी : परिसरातील सामान्य पक्षी – भाग ४

भाग १ – फोटोग्राफी : लॉकडाऊन मध्ये केलेली भाग २ – फोटोग्राफी : लॉकडाऊन – भाग २ भाग ३ – फोटोग्राफी : लॉकडाऊन – भाग ३ फोटोग्राफी : परिसरातील पक्षी  फोटोग्राफी : परिसरातील सामान्य पक्षी – भाग  २  फोटोग्राफी : परिसरातील सामान्य पक्षी – भाग ३     Hits: 49

निवडक चित्र चारोळी – भाग ७

सुहृदय..
येताना तयार होते हास्याची साखळी
जाताना तयार होते नीरव पोकळी
भविष्यासाठी नव सूर्य शोधावा लागतो
गतकाळाचा सूर्य आठवणीत बुडालेला असतो

कविता : संयमाची परीक्षा

अति-आज्ञेत होते संयमाची कठोर परीक्षा
जशी नात्यात असते दुसर्‍या कडून अपेक्षा

संयमानेच संयमाला मोजायचे असते
दुसरे मोजमाप काही जमायचे नसते

उतरत्या काळात संयम सोडायचा नसतो
उगवत्या काळात संयम वाढवायचा असतो

ब्लॉग : चित्रपट परिक्षण :“विक्रम वेधा”– शह-काटशहाचा दर्जेदार बुद्धीबळ खेळ

Vikram Vedha Poster

तुम्ही लहानपणी विक्रम वेताळची गोष्ट नक्कीच वाचली असेल. विक्रम प्रत्येक वेळेस वेताळाला पकडतो आणि वेताळ त्याला प्रत्येक वेळेस एक गोष्ट सांगतो. गोष्ट संपल्या नंतर वेताळ प्रश्न विचारतो. राजा विक्रमादित्य ने जर उत्तर दिले नाही तर त्याच्या डोक्याचे हजार तुकडे होतील असे सांगतो. राजा विक्रमादित्यने उत्तर दिल्या नंतर मात्र वेताळ उडून जातो. अशीच कथा चित्रपटात रूपांतरित झाली तर काय होईल. कोणत्याही संदर्भ, घटना, गोष्टीला दोन पैलू असतात. दोन्ही पैलू पडताळून पहिल्या नंतरच खर उत्तर मिळते. कारण सत्य आणि असत्य मध्ये सुद्धा थोडसच अंतर असते.

फोटोग्राफी : परिसरातील सामान्य पक्षी – भाग ३

भाग १ – फोटोग्राफी : लॉकडाऊन मध्ये केलेली भाग २ – फोटोग्राफी : लॉकडाऊन – भाग २ भाग ३ – फोटोग्राफी : लॉकडाऊन – भाग ३ फोटोग्राफी : परिसरातील पक्षी  फोटोग्राफी : परिसरातील सामान्य पक्षी – भाग  २                 Hits: 125

खाद्यपरीक्षण – Barbeque मिसळ – झणझणीत मिसळ

मी Barbeque मिसळ हे नाव ऐकूनच चक्रावलो. आम्ही ठरवले की ३१च्या निमित्ताने आजच्या दिवशी ही मिसळ आधी टेस्ट न करता थेट जाऊन मिसळीचा आस्वाद घ्यायचा. पण ऐनवेळी ३ मित्र येऊ शकले नाहीत. तरी आम्ही “Barbeque मिसळ” ला दुपारी लंच वेळे मध्ये धडक दिली. पुण्यात चहाची दुकाने गल्लोगल्लीत आढळतात तशीच मिसळची दुकाने सुद्धा आत्ता वाढली आहेत. कारण पुणेकरांचे मिसळ पाव या खाद्यपदार्था वर मनापासून प्रेम आहे. मला वाटले मिसळ सारखी मिसळ असेल पण या वेळेस अनुभव वेगळा होता. पण येथील व्यवस्था थोडी वेगळी होती.

ब्लॉग : प्रवासवर्णन – मढेघाट स्टॉर ट्रेक – स्टार गेझिंग ईवेंट

स्टार ट्रेक कार्यक्रमासाठी मी २७ तारखेला सकाळी १०.३० वाजता निघालो. Primesandzooms (उपकरण भाड्याने देणारी संस्था) मधून काही उपकरणं घेतली. १.३० वाजता मी बस जवळ पोहोचलो. एका अनोख्या एक दिवसीय सफरीवर मी पहिले पाऊल टाकले. मी मढेघाटला ४.३० ला पोहोचलो. तिथे बऱ्याच वेळ सूर्यास्त आमची वाटच बघत होता.

%d bloggers like this: