नवीन मोबाइल येई पर्यंत आपल्या जीवात जीव नसतो. जसे की नवीन लग्न ठरल्या नंतर होणार्या जोडीदाराला लवकर भेटण्याची तळमळ वाढते तसेच नवीन मोबाइलची तुम्ही चातका सारखी वाट बघता. मोबाइल हातात पडल्यावर जोडीदार सोबत जुळवुन घ्यावे लागते तसे तुम्ही मोबाइलचे वैशिष्टे बघून तुम्ही जुळवुन घेता. परंतु मोबाइलचे एखादे वैशिष्ट्य आपल्याला कळत नाही किंवा पसंत नसते. काही वेळेस दूरच्या नातेवाईकाचा नाठाळ कार्ट पसंत पडत नाही पण सोसावा लागतो. त्याला आपलं करण्यासाठी योग्य जालीम उपाय शोधावा लागतो. इथे तुमचे जुगाडू भारतीय डोकं कामाला येते. त्या पसंत न पडलेल्या मोबाइल वैशिष्ट्या साठी तुम्ही नवीन अनुप्रयोग किंवा नवीन संगणकप्रणाली शोधता. आणि तुम्ही त्यातून सुद्धा मार्गक्रमण करता. जोडीदार एका दिवसात उमजत नाही. त्याप्रमाणे मोबाइल सुद्धा एका दिवसात तपासुन होत नाही. जोडीदाराची आणि तुमची एखादी आवड जुळत असल्यास जेवढा आनंद होतो किंबहुना त्यापेक्षा जास्त आनंद तुम्हाला मोबाइलचे एखादे नवीन वैशिष्ट् आवडल्यास होतो. शेवटी जोडीदारात किती ही उणिवा असल्या तरी आपण जमवून घेतो. त्याप्रमाणे मोबाइलची वैशिष्टे कमी-जास्त असतील तर आपण जुगाड करून निभावून नेतो आणि मोबाइल आपला होऊन जातो. हे इतर गोष्टी विकत घेत असताना सुद्धा घडत.
Views: 28