खाद्यपरीक्षण – Barbeque मिसळ – झणझणीत मिसळ

मी Barbeque मिसळ हे नाव ऐकूनच चक्रावलो. आम्ही ठरवले की ३१च्या निमित्ताने आजच्या दिवशी ही मिसळ आधी टेस्ट न करता थेट जाऊन मिसळीचा आस्वाद घ्यायचा. पण ऐनवेळी ३ मित्र येऊ शकले नाहीत. तरी आम्ही “Barbeque मिसळ” ला दुपारी लंच वेळे मध्ये धडक दिली. पुण्यात चहाची दुकाने गल्लोगल्लीत आढळतात तशीच मिसळची दुकाने सुद्धा आत्ता वाढली आहेत. कारण पुणेकरांचे मिसळ पाव या खाद्यपदार्था वर मनापासून प्रेम आहे. मला वाटले मिसळ सारखी मिसळ असेल पण या वेळेस अनुभव वेगळा होता. पण येथील व्यवस्था थोडी वेगळी होती.

Barbeque ची व्यवस्था थोडी वेगळी होती. इथे मुख्य चार प्रकारचे मिसळ नमुने (१. पुणेरी २. नाशिक ३. जैन ४.कोल्हापुरी) उपलब्ध होते. चार प्रकारची मिसळ गरम रहावी या करता Barbeque खाली पेटलेला कोळसा ठेवायची व्यवस्था होती. टेबलावर Barbeque च्या दोन्ही बाजूला लाकडी साच्यात ५ वाट्या ठेवल्या होत्या. त्यात दही, उकडलेले बटाटे मिश्रण, पोहे, शिजवलेली मटकी, लिंबू आणि कांदा. बाजूला ताट आणि एका बाऊल मध्ये कुरकुरीत फरसाण. ताट, बाऊल, पाण्याचा ग्लास/पेला, पाण्याचा मग आदी ऑथेन्टिक आणि स्वच्छ दिसत होते. सगळं व्यवस्थित आणि छान मांडून तर ठेवले होते. हे बघून माझा मित्र ‘गुरबक्ष’ फोटो काढण्यात मग्न झाला. आत्ता फक्त मिसळीवर ताव मारून आस्वाद घ्यायचा बाकी होते.

मी दही, उकडलेले बटाटे, पोहे, शिजवलेली मटकी, लिंबू आणि फरसाण एकजीव करून मस्त मिश्रण करून घेतले. त्यात प्रश्न होता की मिसळीचा कोणता प्रकार पहिल्यांदा टेस्ट करायचा. पुणेरी ऐटबाज मिसळ का नाशिकची ऐतहासिक मिसळ. जैन प्रकारची साधी आणि सात्विक मिसळ आणि झणझणीत, मसालेदार आणि अतितिखट कोल्हापुरी ठस्केबाज मिसळ. मी तर पुणे आणि नाशिक चे उत्तम मिश्रण केले आणि त्यात दो बुंद जिंदगीके या प्रमाणे दोन वेळा २ बुंद कोल्हापुरी मिसळ चे मिक्स केले. आणि तयार झाले मिश्र मिसळचे उत्तम रसायन. पाव सुद्धा व्यवस्थित टोस्ट करून ठेवले होते. पण मला टोस्ट केलेल्या ब्रेड सोबत मिसळीचा आस्वाद जास्त आवडला. त्याची रुचकर चव जिभेवरील रेंगाळत राहते.जेवताना रुचकर पदार्थ असतील तर लोक जास्त चर्चा करत नाहीत हे मात्र सिद्ध झालं.

विविध पदार्थाची उत्तम मांडणी, कुरकुरीत फरसाण, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ग्राहकांना त्यांच्या आवडी नुसार मिसळ बनवता येते, थोड्या प्रयत्ना तुम्हाला सुद्धा मिसळीची सुंदर भट्टी जमायला लागते. मिसळपाव या पदार्थाशी आपले नाते एकदम दृढ करणारा अनुभव मिळेल. Barbeque मिसळ इथे अमर्यादित मिसळपावची किंमत फक्त रुपये ९९ आहे. रस्सा आणि इतर पदार्थचे मिश्रण स्वतः करायचे आहे. रस्सा चे प्रमाण कमी जास्त झाले तर मिसळीचा आस्वाद खराब लागू शकतो. त्यामुळे प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो. एकदा भेट दिल्या नंतर एक उत्तम मिसळ खाल्ल्याच्या आनंद तुम्हाला नक्कीच भेटेल. तर एकदा भेट दयायला काहीच हरकत नाही.  

फोटो - Barbeque मिसळ
फोटो – Barbeque मिसळ
 
फोटो - Barbeque मिसळ
फोटो – Barbeque मिसळ 
 
 
फोटो - Barbeque मिसळ
फोटो – Barbeque मिसळ 

फोटो - Barbeque मिसळ
फोटो – Barbeque मिसळ
फोटो - Barbeque मिसळ -
फोटो – Barbeque मिसळ – फरसाण
 

 
फोटो - Barbeque मिसळ -
फोटो – Barbeque मिसळ 

Views: 128

Leave a Reply