कविता : कुटुंब आणि वाद

या कवितेची “९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन” च्या “कविकट्टा” या काव्यमंचा साठी निवड होऊन कविता वाचन झालेले आहे. 

विनाकारण उगाच झुंजतात माणसं
इतरांवर विश्वास ठेवून गंजतात माणसं
नात्यातला गुंता वाढवतात माणसं
वेड पांघरूण व्यर्थजगतात माणसं

सरड्या प्रमाणे रंग बदलतात इथे
पश्चातापा मुळे आत जळतात इथे
समई प्रमाणे सतत तेवत राहतात इथे
जीवाला-जीव लावणारे असतात इथे
स्वभावाला औषध थोडेच असते
सगळ्यां सोबतच मन रमवायचे असते
भांडणामुळे मन मात्र रूसत असते
विसंवाद तरी कुटुंब एकत्र घट्ट असते
कोणी दुसर्‍याला समजण्यात व्यस्त आहे
प्रत्येकजण कुरघोडी करण्यात मस्त आहे
इथे सगळ्यांना आप-आपले मत आहे
वादविवाद, घर याचं गहिरं नातं आहे
कुटुंबा साठी द्यायला वेळ नाही
आचार आणि विचाराचा मेळ नाही
नात्यातला गुंता वाढवणे खेळ नाही
कुटुंब फक्त राग, द्वेषाची भेळ नाही

Views: 127

0 thoughts on “कविता : कुटुंब आणि वाद”

Leave a Reply