प्रत्येक माणसाचे ईश्वराशी संवाद साधण्याचा कला वेगळी असते आणि गाऱ्हाण मांडायची पद्धत सुद्धा वेगळी असते. माझ्या आईची पद्धत सुद्धा वेगळी आहे. देव काही कर्मकांडात अडकला नाही. आईने काही संगीतामध्ये शिक्षण घेतले नाही. आई जेव्हा घरातल्या देवाची पूजा मनापासून करते आणि सोबत भावगीत गाते. काय सांगू ऐकायला खुप छान वाटते. कारण आहे तिची देवावरील श्रद्धा. एखादा गायक रियाज करताना सुराला जसे आळवतो. त्याच प्रमाणे आई भावगीत गाऊन देवाला आळवते. हृदयातलली भक्ती गाणे रुपी भावातून गळ्यातून प्रकट होतात. जसे काही संगीत सेवा ईश्वरा चरणी रूजू करते. आई आणि घरातील देव त्या भक्तीरसा मध्ये नाहून निघतात आणि ऐकणाऱ्याचे कान तृप्त होतात.देवावर श्रद्धा म्हणजे काय असते ते आईकडे बघून कळते. आईची तिरूपती बालाजी वर खुपच श्रद्धा. एखादे वेळेस तिला बरे न वाटल्यास. त्यावेळेस बालाजीचे दर्शन झाल्यास तिला खुप चांगले वाटते. असा भक्त देवा जवळ हट्ट सुद्धा करतो आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी. प्रत्येकाला जीवनात अडचणी येतात. आईला लेकरांची खुप चिंता असते. तिच्या नजरेतून तिच्या जवळच्या व्यक्तीच्या मोठ्या अडचणी सुटत नाहीत. मग त्यावेळेस ती श्रद्धापूर्वक प्रार्थना आणि विनंती करते तिच्या देवाला मोठ्या अडचणी दूर सुटाव्यात म्हणून. जसे कंपनी मध्ये ई-मेल करून काम न झाल्यास remainder ई-मेल टाकावा लागतो. तसे आई मग आठवड्याला उपवास करते. तरी इच्छा अपूर्ण राहिल्यास आईला भात्यातून ब्रह्मास्र काढण्यावाचून काही पर्याय नसतो. जो पर्यंत काम मार्गी लागत नाही तो पर्यंत देवाला गोष्ट लक्षात आणून देण्यासाठी खडी साखरेचा उपवास करते. दिवसभर काहीही न खाता, काहीही न पिता संध्याकाळी फक्त खडी साखर खाऊन आणि पाणी पिऊन उपवास सोडायचा. हे तिला कसे काय जमते हे मला माहित नाही. या मध्ये शारीरिक त्रास होतोच. पण प्रबळ मानसिक शक्ती तारून नेते. तसे एका प्रकारे तपच आहे फक्त आपल्या माणसासाठी केलेले.
Views: 40