मी खुप वेळेस बालाजीला दर्शनासाठी गेलो आहे. त्या आठवणीतला एक किस्सा येथे देत आहे. एकदा मी बालाजीचे दर्शन घेऊन श्रीकालहस्तीला गेलो. तिथे मंदिरा बाहेर ओळीने बरीच दुकाने होती. माझ्या पत्नीला भांड्याच्या दुकानात इडली पात्र दिसले. आम्ही किंमत विचारायला दुकानात गेलो. तिथे मला एक जाडजूड बाई ने तेलुगु मिश्रीत हिंदीत आवाज दिला “भैया आप कहा से आ रहे हो” मी तिला पुणे उत्तर दिल. ती नवऱ्याकडे बोट दाखवून समजावून सांगण्याच्या उद्देशाने म्हणाली. “इस आदमी को थोडा समझाओ लोग यहासे शॉपिंग करके सामान पुणे लेके जा रहे है और इसको हैदराबाद इतना नजदीक है फिरभी शॉपिंग को ना बोलता है”
मी माझ्या समदु:खी मित्राकडे पाहून किंचित स्मित केले. तिचा नवरा किडकिडीत शरीरयष्टीचा साधासुधा इसम होता. मी त्याच दु:ख समजू शकलो परंतु मी सुद्धा किती हतबल आहे हे त्याला डोळ्यानेच सांगीतलं. तो सांगत होता, इतना बडा बर्तन शॉपिंग करनेकी क्या जरुरत। हैदराबाद मे भी ये चीझ मिल सकती है। मी त्याला डोळ्यानेच सांगीतले इडली पात्र पुण्यात सुद्धा कमी किमतीत मिळतील. पण या स्त्रियांना कोण सांगणार मोठे ओझे वाहून प्रवास करण्यात काय फायदा. मी हसू दाबून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण हसू आवरणे शक्य झाले नाही. नकळत मी एका माणसाला बोलण्याचे कारण बनलो होतो आणि त्याच्या दु:खाची खपली काढली होती.
पाच मिनिटांची करमणूक अनुभवून मी तेथून काही न घेता सटकलो. पण काहीही न घेण्याची चूक मला परतीच्या प्रवासात महाग पडली. मग तिरूपती ला जाऊन मी पहिले reliance mart ला भेट द्यावी लागली. बहुतेक स्त्रियांना प्रवासाची आठवण किंवा आवड म्हणून खरेदी करायची असते. पुरुषांना वाटत असते लक्ष्मी रोड किंवा बोहरी आळी मध्ये सगळी शॉपिंग होऊ शकते. पुरुषाला शॉपिंगचा कंटाळा आणि स्त्रियांना कुठेही गेलो तरी शॉपिंग करायला आवडत असते.
Views: 40