निवडक चारोळी – भाग ७

निवडक चित्र चारोळी 

निवडक चित्र चारोळी – भाग २ 

निवडक चित्र चारोळी – भाग ३

निवडक चित्र चारोळी – भाग ४

निवडक चित्र चारोळी – भाग ५

निवडक चित्र चारोळी – भाग ६

शब्द समजेन आता…
तुझ्या ओठांवर आलेला शब्द मी झेलीन आता
ओठांवर येऊन माघारी गेलेला शब्द समजेन आता
सखी तुला दिलेला शब्द मी अक्षरशः पाळेन आता
क्षणा-क्षणांत आनंद शोधून गोळा करून देईन आता

सौंदर्य…
अभिजात शब्द फिका पडेल असे सौंदर्य
इतरांना आपलंस करणे तुझे औदार्य
सखी का आहेस तू इतकी कुशाग्रबुद्धीची
सगळ्यांची आवडती यात नाही आश्चर्य

आई आणि मुलगी…
आईच्या नजरेत मुली साठी असते प्रचंड माया
संस्कार, संगोपनामुळे मुलगी असते तिचीच काया
कुठल्याही परिस्थितीत आई असते मुलींसाठी वटवृक्ष
आश्वासक सहवास मुलींसाठी असते मूर्तिमंत छाया

Views: 126

Leave a Reply

Translate »