कविता : पाऊस आणि ती….

उगीचच केस वाऱ्याशी स्पर्धा करतात
पावसाचे थेंब मुक्त केसात ओघळतात
केस लाडीकपणे मुखावर उगी रेंगाळतात
जणू टपोरे थेंब तिलाच भेटण्या बरसतात

मोकळे केश पाहून पाऊस गर्जू लागला
हळूच कानात येऊन गुजरावं करू लागला
सोबत वारा विजा घेऊन येतो म्हणू लागला
जीवनात भिजण्याचा आनंद घे विनवू लागला

उगाच बोलावतेस त्याला क्षण भिजू लागले
तुझ्या विचाराचे सौदर्य निसर्गात खुलू लागले
दैवी सौन्दर्य पावसाचा आस्वाद घेऊ लागले
जणू काही तुझ्या मुळेच इंद्रधनुष्य फुलू लागले

Views: 36

Leave a Reply