कविता : संयमाची परीक्षा…

संयमाची परीक्षा

संयमानेच घेतली संयमाची परीक्षा
हरला संयम राहिल्या फक्त अपेक्षा

परिस्थितीनेच केला संयमाचा घात
कसे करायचे परिस्थितीशी दोन हात

हतबलतेने केले संयमावर अचूक वार
कष्टाचा पर्वत चढल्या शिवाय नाही हार

पुन्हा संकटांनी ग्रासले संयमाचा ठाव
आतातरी संयम करेल का भीतीवर घाव

मनोबळाने वाढवले संयमाचे अपूर्व बळ
केव्हा भेटणार संयम राखल्याचे फळ

संयमाला लागली भीतीची परत जाणीव
संयम जिंकेल या प्रयत्नात नाही काही उणीव

Views: 328

Leave a Reply