कविता : आईची लाडकी…

आईची लाडकी…

लाडकी माझी हॉस्टेल ला राहणार आहे
अश्रूंचा बांध आता कसा थांबणार आहे
क्षणोक्षणी तुझी आठवणं काढणार आहे
व्याकुळ हृदय विरह कसा सोसणार आहे

बाहेरच्या जगात तुझे पाऊलआता पडणार आहे
रुसून फुगणे, अनं हसणे कोणाला जमणार आहे
सारखा-सारखा हट्ट आत्ता कोण करणार आहे
घरातील तुझी जागा आता कोण भरणार आहे

तुझी प्रगती मी प्रसन्न होऊन पुन्हा बघणार आहे
हॉस्टेलला राहतेस तरी नात्यात गोडी वाढणार आहे
सगळे कुटुंब तुझ्या सोबत संवाद साधणार आहे
सर्वजण घरी येई पर्यँत वाट बघत थांबणार आहे

लाडात वाढलेली आपली सुकन्या जेव्हा हॉस्टेल ला किंवा बाहेर शिकायला जाते त्यावेळेस तिच्या आईची परिस्थिती यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

Visits: 181

Leave a Reply