कविता: सखी Leave a Comment / By Bhagwat Balshetwar कविता: सखीसखे तुझ्या मधाळ वाणीने न बोलणारा बोलू लागलोतुझ्या साध्या बोलण्यावर सुद्धा खुदकन हसू लागलोतुझ्या आनंदात मी आनंद शोधत प्रसन्न राहू लागलोदु:खाचे काय घेऊन बसलीस वेडे तुझे दु:ख जगू लागलो जुनी खपली काढू नको सुखाचा मुलामा चढवू लागलोसुखी सह-जीवनाची स्वप्न मी आत्ता मस्त रंगवू लागलोभूतकाळ असो किती ही कठोर तरी घर आता सजवू लागलो तू कधी येशील जीवनात तीच वाट फक्त पाहू लागलो येण्याने उजळेल आयुष्य, छोटे-छोटे प्रसंग खुलवू लागलोएकत्र येण्यासाठी असतील आव्हाने त्या विरुद्ध लढू लागलो अडचणींना लढू साथीने, त्यासाठी पुन्हा तयारी करू लागलो सखी करू नको काळजी फक्त देवावर श्रद्धा ठेवू लागलो नवा श्वास नवा ध्यास आभाळा पर्यंत दृष्टी फेरु लागलोतुझी साथ असेल तर प्रेमात परत बहरू लागलोतू फक्त-फक्त हो म्हण, आनंदी पक्ष्या प्रमाणे उडू लागलोदेशील साथ? होकार दे, पुन्हा प्रेमाचे बंध विणू लागलो Views: 123Share this:TwitterFacebookTelegramWhatsApp Like this:Like Loading... Related