कविता : चल सखे

कविता : चल सखे

चल सखे बनवू आपले सुंदर घर
जसे चिमणी करते खटाटोप दिनभर

एक-एक वीट लावू समजुतीच्या जपून
दिन रात्र मेहनत करू एकमेकांना समजून

मनसोक्त हास्य, प्रचंड मस्ती, किंचित आदर
ठेवू जाणीव, ठेवू मान, करू एकमेकांची फक्त कदर

पडतील थोडे कष्ट सोडावे लागतील मोहाचे क्षण
कस लागेल नात्याचा मात्र सापडतील मोत्याचे कण

एकएक पै जमा करून घर सजवू अतिशय मस्त
पाहुणचारात पाठवू नको अतिथीला रिक्त हस्त

कधी भांडू कधी लढू कधी परिस्थितीचा अतिरेक
येतील अडचणी फार, विश्वास हीच जगण्याची मेख  

घडाभर संवेदना, संपूर्ण साथ, परिपूर्ण स्वातंत्र्य यांचे मिश्रण
जोडीदाराची प्रगती साधायला लागणार नाहीत जास्त परिश्रम

आनंद, दु:ख, सण, क्षण, जाणिवांना करू एकत्र साजरे  
तू कर थोडे नखरे आपण जगू क्षण करून मन हसरे

Visits: 102

Leave a Reply