कविता – पराभव

कविता – पराभव

झालेला पराभव लागला तुला जिव्हारी
आता केव्हा घेणार तु परत भरारी?

कसे कळणे नाही तुला छुपे संगनमत
ना कळले तुला नात्यातील मिलीभगत

तुझ्या अप्रतिष्ठेला फक्त तूच कारणीभूत
घनिष्ठ लोकांनीच केले तुला परत पराभूत

अपमान गिळून टाक घे पुन्हा नवा संकल्प
पुन्हा यशस्वी होऊन कर सगळ्यांना गप्प

उपहास, अवमान, अनादर सहन करून घे
बुद्धीने, सहनशक्तीने संकटांना घालवून ये

मानभंग अन् कुचेष्टा ही तर पहिली पायरी
शून्यातून भरारी घेण्यास परत कर तयारी

Views: 145

Leave a Reply

Translate »