कविता : छत्र

स्मशान भूमीत अग्नी दिला मी पित्याच्या चितेला
जुन्या आठवणी वडिलांच्या कसे आवरू स्वतःला

पित्याचे छत्र हो हरवले सांगू कसे आणि कुणाला
ऊन, पाऊस, वारा लागणार थेट सगळ्या कुटुंबाला

वडिलांची काळजी कोण वाहणार कसे समजावू मनाला
जाण्याने इंद्रधनुष्याचे रंग उडाले भकास वाटते कुटुंबाला

पितृऋण कोणत्या प्रकारे फेडू हा विचार मांडू कशाला
बाबांनी शून्यातून विश्व निर्माण केले, फूटपठ्ठी लावू कशाला

वाळू प्रमाणे अलगद निसाटलात पोरके केले आम्हाला
जाण्याने इंद्रधनुष्याचे रंग उडाले भकास वाटते कुटुंबाला

वडिलांच्या प्रेमासाठी आता शोधू कसे कुठे आणि कुणाला
शर्थीचे प्रयत्न, परिस्थिती आटोक्यात आली नाही कोणाला

प्रतिष्ठा, वारसा कसा पुढे चालवावा कळेना आम्हाला
अन्नदान आणि सेवा तुमच्या एक दशांश घडेल का मला

Views: 198

Leave a Reply