ब्लॉग: INS Kavaratti आणि INS Sindhukirti – भाग २ – समुद्राच्या गर्भातील अदृश्य योद्ध्याची भेट
विशाखापट्टणम येथे INS सिंधुकीर्ति पाणबुडीला दिलेल्या भेटीचा अनुभव. पेरिस्कोप, सोनार, टॉर्पेडो आणि भारतीय नौदलाच्या अदृश्य योद्ध्यांची ओळख.
विशाखापट्टणम येथे INS सिंधुकीर्ति पाणबुडीला दिलेल्या भेटीचा अनुभव. पेरिस्कोप, सोनार, टॉर्पेडो आणि भारतीय नौदलाच्या अदृश्य योद्ध्यांची ओळख.
ब्लॉग: INS Kavaratti आणि INS Sindhukirti – भाग १
आम्ही कामानिमित्त विशाखापट्टणमला भेट दिली. विशाखापट्टणम इथे माझा मामे भाऊ भारतीय नौसेनेत वरिष्ठ पदावर कार्यरत आहे. त्यामुळे तिथे नौदलातील मध्यम आकाराची कॉर्व्हेट (Corvette) आणि डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी बघण्याचा सुवर्ण कांचन योग आला. कॉर्व्हेटला मराठीत “जलद आक्रमक युद्धनौका” सुद्धा म्हणतात. कॉर्व्हेट म्हणजे समुद्रात जलद गतीने गस्त घालणारी, शत्रूच्या पाणबुड्या व जहाजांवर हल्ला करू शकणारी लहान पण शक्तिशाली युद्धनौका. कॉर्व्हेट जहाजांची वैशिष्ट्ये म्हणजे या आकाराने फ्रिगेट आणि डेस्ट्रॉयरपेक्षा लहान असतात. वेग जास्त आणि हालचाल चपळ असते. कॉर्व्हेट चा वापर किनारपट्टी सुरक्षा, पाणबुडीविरोधी युद्ध (ASW), हवाई संरक्षण आणि गस्तीसाठी होतो.
आम्ही क्षितिज enclave च्या FOSM(Flag Officer of submarine) बंगलो मध्ये बसून नाष्टा करतोय. फ्लॅग हाऊसेस हे नयनरम्य अशा डॉल्फिन हिल वर वसलेली आहेत. समोर अथांग समुद्र, मागे फळबागा साठी जागा, दोन मजली टुमदार बंगला, समोर बागेसाठी जागा, बागेत बसण्यासाठी प्रशस्त व्हरांडा, दोन स्टडी रूम, ५ बेडरूम, १ किचन असा भव्य बंगला आहे. इथे फ्लॅग हाऊस साठी वेगळा प्रोटोकॉल पाळला जातो. फ्लॅग ऑफिसर शहरात असेल तर घरावर नेव्ही चा फ्लॅग फडकत असतो. फ्लॅग ऑफिसर जर बाहेर गावी असेल तर नेव्ही फ्लॅग काढून ठेवतात.
ब्लॉग : लेख : INS Kavaratti आणि INS Sindhukirti – भाग १ Read More »
खवळलेल्या बिसकेच्या उपसागरात, ३० फुटी लाटांशी झुंज देत एक भारतीय पाणबुडी पुढे- पुढे सरकत होती. आत जखमी सहकारी, बाहेर प्रचंड वादळ. पण निर्धारित प्रवासाचं मिशन सुरूच होतं. त्यात दोन अधिकारी प्रचंड वेदना सहन करत प्रवास करत होते. सगळ्यांना एकच भीती होती की त्यांना 12 दिवसाचा प्रवास सहन होईल का? पण सहनशक्तीची परीक्षा त्यांनी NDA असतानाच दिली होती. भारतीय नौसेनेचे ब्रीदवाक्य “शं नो वरुणः” आहे. National Defense Academy (NDA) हे भारतातील तिन्ही सैन्यदलांचे संयुक्त प्रशिक्षण देणारी प्रतिष्ठित अकॅडमी आहे. एनडीएचे ब्रीदवाक्य “सेवा परमो धर्मः” आहे. भारतीय नौसेनेचा प्रत्येक अधिकारी आणि जवान प्राणाची बाजी लावून देश सेवा आणि त्याबरोबर देशाची सुरक्षा करत असतात. सैनिकांचे कार्य त्यांच्या कृतीतून आणि सेवा भावातून स्पष्टपणे दिसून येते. एनडीए त्यांच्या कडून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत स्वत:ला सावरण्याची क्षमता निर्माण करून घेते. अतिशय कठीण आणि आणीबाणीच्या प्रसंगात परिस्थितीवर मात करून निर्णय आणि नेतृत्व करण्याची क्षमता तयार होते ती खडतर अशा एनडीए च्या प्रशिक्षणा मुळेच. एनडीएच्या मूल्यांवर घडलेला प्रत्येक नौसैनिक केवळ सैनिक नसतो, तर तो संकट काळात दृढ निश्चयी, शांत राहणारा, निर्णयक्षम आणि देशासाठी सर्वस्व अर्पण करणारा योद्धा असतो. २००१ साली रशिया मध्ये विकसित झालेल्या सिंधुघोष-श्रेणी (किलो-श्रेणी) पाणबुड्या कार्यरत होत्या. किलो-श्रेणीतील पाणबुड्या भारतीय नौदलातील शक्तिशाली डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्या आहेत. या रशियात तयार करण्यात आल्या आहेत आणि १९८७ ते २००० पर्यंत जवळपास १० पाणबुड्या भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. सिंधुघोष (Kilo-class) प्रकारातील पाणबुड्या भारताच्या सागरी सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. या पाणबुड्याची लांबी सुमारे ७२.६ मीटर असून त्यांचे प्रत्येकी पाण्यावरील वजन सुमारे २३०० टन आणि पाण्याखालील वजन ३००० टन आहे. या पाणबुड्या पाण्याखाली जवळपास १९ नॉट्स म्हणजे ३५.१८ किमी/तास वेगाने प्रवास करू शकतात आणि साधारण ४५ दिवस समुद्रात कार्यरत राहू शकतात.
ब्लॉग : लेख : भारतीय नौसेना – धैर्य आणि शौर्य Read More »
लहानपणा पासून मला भारतीय सैन्य आणि नौदल बद्दल प्रचंड आकर्षण होत. मी लहानपणी सातारा सैनिक स्कुल साठी परीक्षा सुद्धा देण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी मी विशेष क्लासेस सुद्धा लावले होते. परंतु मी सातारा सैनिक स्कुल प्रवेश परीक्षा काही चांगल्या मार्काने पारित होऊ शकलो नाही. पण एखादा आर्मी/नौदल ऑफिसर भेटल्या नंतर त्यांचा पोशाख, चालण्यात एक प्रकारचा रूबाब, आणि बोलण्यात आत्मविश्वास बघून भारतीय नौदला बद्दल प्रचंड आदर आणि आकर्षण वाटते. मला भारतीय नौदला विषयी जाणून घ्यायला खूप आवडते. भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. भारतीय नौदला कडे अत्याधुनिक युद्धनौका, विमान वाहक (Aircraft Carrier), विनाशिका (destroyer), फ्रिगेट (Frigates), कार्वेटेस (Corvettes), विविध श्रेणीतील पाणबुड्या, आणि अणुइंधनावरच्या पाणबुड्या आणि इतर अति विशिष्ट नौका आहेत.
ब्लॉग : लेख : Indian Navy Ship रणवीर Read More »