ब्लॉग: INS Kavaratti आणि INS Sindhukirti – भाग २ – समुद्राच्या गर्भातील अदृश्य योद्ध्याची भेट
विशाखापट्टणम येथे INS सिंधुकीर्ति पाणबुडीला दिलेल्या भेटीचा अनुभव. पेरिस्कोप, सोनार, टॉर्पेडो आणि भारतीय नौदलाच्या अदृश्य योद्ध्यांची ओळख.
विशाखापट्टणम येथे INS सिंधुकीर्ति पाणबुडीला दिलेल्या भेटीचा अनुभव. पेरिस्कोप, सोनार, टॉर्पेडो आणि भारतीय नौदलाच्या अदृश्य योद्ध्यांची ओळख.
ब्लॉग: INS Kavaratti आणि INS Sindhukirti – भाग १
आम्ही कामानिमित्त विशाखापट्टणमला भेट दिली. विशाखापट्टणम इथे माझा मामे भाऊ भारतीय नौसेनेत वरिष्ठ पदावर कार्यरत आहे. त्यामुळे तिथे नौदलातील मध्यम आकाराची कॉर्व्हेट (Corvette) आणि डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी बघण्याचा सुवर्ण कांचन योग आला. कॉर्व्हेटला मराठीत “जलद आक्रमक युद्धनौका” सुद्धा म्हणतात. कॉर्व्हेट म्हणजे समुद्रात जलद गतीने गस्त घालणारी, शत्रूच्या पाणबुड्या व जहाजांवर हल्ला करू शकणारी लहान पण शक्तिशाली युद्धनौका. कॉर्व्हेट जहाजांची वैशिष्ट्ये म्हणजे या आकाराने फ्रिगेट आणि डेस्ट्रॉयरपेक्षा लहान असतात. वेग जास्त आणि हालचाल चपळ असते. कॉर्व्हेट चा वापर किनारपट्टी सुरक्षा, पाणबुडीविरोधी युद्ध (ASW), हवाई संरक्षण आणि गस्तीसाठी होतो.
आम्ही क्षितिज enclave च्या FOSM(Flag Officer of submarine) बंगलो मध्ये बसून नाष्टा करतोय. फ्लॅग हाऊसेस हे नयनरम्य अशा डॉल्फिन हिल वर वसलेली आहेत. समोर अथांग समुद्र, मागे फळबागा साठी जागा, दोन मजली टुमदार बंगला, समोर बागेसाठी जागा, बागेत बसण्यासाठी प्रशस्त व्हरांडा, दोन स्टडी रूम, ५ बेडरूम, १ किचन असा भव्य बंगला आहे. इथे फ्लॅग हाऊस साठी वेगळा प्रोटोकॉल पाळला जातो. फ्लॅग ऑफिसर शहरात असेल तर घरावर नेव्ही चा फ्लॅग फडकत असतो. फ्लॅग ऑफिसर जर बाहेर गावी असेल तर नेव्ही फ्लॅग काढून ठेवतात.
ब्लॉग : लेख : INS Kavaratti आणि INS Sindhukirti – भाग १ Read More »
खवळलेल्या बिसकेच्या उपसागरात, ३० फुटी लाटांशी झुंज देत एक भारतीय पाणबुडी पुढे- पुढे सरकत होती. आत जखमी सहकारी, बाहेर प्रचंड वादळ. पण निर्धारित प्रवासाचं मिशन सुरूच होतं. त्यात दोन अधिकारी प्रचंड वेदना सहन करत प्रवास करत होते. सगळ्यांना एकच भीती होती की त्यांना 12 दिवसाचा प्रवास सहन होईल का? पण सहनशक्तीची परीक्षा त्यांनी NDA असतानाच दिली होती. भारतीय नौसेनेचे ब्रीदवाक्य “शं नो वरुणः” आहे. National Defense Academy (NDA) हे भारतातील तिन्ही सैन्यदलांचे संयुक्त प्रशिक्षण देणारी प्रतिष्ठित अकॅडमी आहे. एनडीएचे ब्रीदवाक्य “सेवा परमो धर्मः” आहे. भारतीय नौसेनेचा प्रत्येक अधिकारी आणि जवान प्राणाची बाजी लावून देश सेवा आणि त्याबरोबर देशाची सुरक्षा करत असतात. सैनिकांचे कार्य त्यांच्या कृतीतून आणि सेवा भावातून स्पष्टपणे दिसून येते. एनडीए त्यांच्या कडून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत स्वत:ला सावरण्याची क्षमता निर्माण करून घेते. अतिशय कठीण आणि आणीबाणीच्या प्रसंगात परिस्थितीवर मात करून निर्णय आणि नेतृत्व करण्याची क्षमता तयार होते ती खडतर अशा एनडीए च्या प्रशिक्षणा मुळेच. एनडीएच्या मूल्यांवर घडलेला प्रत्येक नौसैनिक केवळ सैनिक नसतो, तर तो संकट काळात दृढ निश्चयी, शांत राहणारा, निर्णयक्षम आणि देशासाठी सर्वस्व अर्पण करणारा योद्धा असतो. २००१ साली रशिया मध्ये विकसित झालेल्या सिंधुघोष-श्रेणी (किलो-श्रेणी) पाणबुड्या कार्यरत होत्या. किलो-श्रेणीतील पाणबुड्या भारतीय नौदलातील शक्तिशाली डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्या आहेत. या रशियात तयार करण्यात आल्या आहेत आणि १९८७ ते २००० पर्यंत जवळपास १० पाणबुड्या भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. सिंधुघोष (Kilo-class) प्रकारातील पाणबुड्या भारताच्या सागरी सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. या पाणबुड्याची लांबी सुमारे ७२.६ मीटर असून त्यांचे प्रत्येकी पाण्यावरील वजन सुमारे २३०० टन आणि पाण्याखालील वजन ३००० टन आहे. या पाणबुड्या पाण्याखाली जवळपास १९ नॉट्स म्हणजे ३५.१८ किमी/तास वेगाने प्रवास करू शकतात आणि साधारण ४५ दिवस समुद्रात कार्यरत राहू शकतात.
ब्लॉग : लेख : भारतीय नौसेना – धैर्य आणि शौर्य Read More »
ब्लॉग – व्यक्तिविशेष – रियर ॲडमिरल – #FOSM – चेतन चं. चंडेगावे
आपल्या आजूबाजूलाच प्रेरणादाई गोष्टी सतत घडत असतात. आणि व्यक्तिमत्व व्यक्ती सुद्धा आपल्याच जवळपास असतात. एक प्रभावशाली आणि यशस्वी माणसाचे व्यक्तिमत्व कसे असावे तर ते आमच्या राजू दादा कडे पाहून समजते. चेतन चं. चंडेगावे यांना आम्ही सगळे प्रेमाने राजू दादा म्हणतो. माणसाचा मोठेपण कधी सिद्ध होते तर तो आपल्या नातेवाईकांना, सहकार्यांना, लहान मोठ्यांना कसे वागवतो. बोलण्यात तर राजू दादाचे विशेष प्राविण्य आहे. प्रत्येकाला भेटताना दादाच्या चेहर्यावर स्मित हास्य, स्मरणशक्ती उत्तम असल्याने संभाषणात मागच्या आठवणी काढून हसवतो. भारतीय नौदलात मोठ्या पदावर असून सुद्धा संभाषण करताना पुढील व्यक्तीला सहज मन मोकळे बोलून आपलेसे करतो. दादा 2-3 वर्षा नंतर सुद्धा भेटला असेल तरी काल परवाच भेटला होता असे वाटते. कोणताही विषय घेतला तर त्याच्याकडे काही ना काही जास्तीची माहिती असतेच. मग ते राजकारण असो समाजकारण असो शिक्षण असो संगीत असो किंवा कोणताही जागतिक विषय असेल. प्रत्येक बाबतीत त्याच्याकडे काहीतरी महत्त्वपूर्ण माहिती असते. कदाचित सतत वाचनामुळे आणि चांगल्या आकलन शक्तीमुळे त्यालाही क्षमता प्राप्त झाली असेल.
ग्रामीण भागातून येऊन खडतर संघर्ष करत, नव-नवीन आव्हानांना सामोरे जात, जिद्द, अविरत परिश्रमांना नवीन उंचीवर नेत भारतीय नौदलात दादाने आपले स्थान निर्माण केले आहे. राजू दादाचे मूळगांव ‘उदगीर’ आहे. प्राथमिक शिक्षण ‘व्यंकटेश विद्यालय’ लातूर इथे झाले आहे. सहावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण सैनिक स्कूल सातारा इथे पार पडले. त्यानंतर एनडीए ची (National Defense Academy) परीक्षा उत्तीर्ण करून भारतीय नौदल अकॅडमी (Indian Naval Academy – Goa) इथे खडतर प्रशिक्षण झाले आहे. दादा १९९२ ला नौदल अकॅडमीचे प्रशिक्षण पूर्ण करून नौदलात अधिकारी म्हणून कार्यरत झाला. भारतीय नौदलात विविध जबाबदारी पार पडत त्याच्या प्रवास ‘रियर ॲडमिरल(Rear Admiral)’ या पदा पर्यंत पोहोचला आहे. आयएनएस रणवीर या अत्यंत महत्त्वाच्या भारतीय युद्धनौकेचे नेतृत्व सुद्धा केले आहे. दादा कोणालाही भेटला तर त्याची चुणूक सर्वांनाच जाणवते. तशीच ती त्याच्या वरिष्ठांना आणि सहकाऱ्यांना नक्कीच जाणवली असणार. त्यामुळे एका मागे एक नौदलातील महत्त्वाची शिखरे त्याने पादाक्रांत केली.
नौदलात गेल्यानंतर त्याची पाणबुडी विभागात निवड झाली. पाणबुडी मध्ये काम करत असताना अत्यंत खडतर आणि कठीण परिस्थितीमध्ये काम करावे लागते. अतिशय छोट्या जागेमध्ये राहत मोठी-मोठी आव्हाने पार पाडावी लागतात. समुद्रात पाणबुडी जेव्हा एखादे टारगेट दिल्यानंतर नौकानयनासाठी जाते तेव्हा काही वेळेस कित्येक दिवस, आठवडे कुटुंबाशी सुद्धा संपर्क करता येत नाही. पाणबुडीचा प्रवास हा समुद्राच्या खालूनच चालू असतो. त्यामुळे तेथील आव्हाने खूपच जगा वेगळी असतात. परंतु त्याची कार्य कुशलता, समर्पण, तात्काळ निर्णय घेण्याची पात्रता, हजरजबाबीपणा, सतत नाविन्यपूर्ण गोष्टी अमलात आणण्याची क्षमता यामुळे तो नेहमीच नौदलाच्या वेगवेगळ्या मिशन मध्ये पात्र होत गेला. अगदी सुरुवातीलाच तो सोमालिया आणि केनिया च्या नेमून दिलेल्या नौदल कामगिरी वरती गेला. त्यानंतर काही दिवसातच आयएनएस सिंधूराज या पाणबुडीला पाण्याच्या खालून ३ महिन्याचा प्रवास करून रशियावरून भारतात आणण्याचा मोहिमेत महत्त्वाचा वाटा होता. नंतर नौदलामध्ये त्याची थायलंड येथील प्रशिक्षणासाठी निवड झाली. दादा १९९२ च्या बॅचचा अधिकारी असून ऑस्ट्रेलिया येथील दुतावासात संरक्षण सल्लागार म्हणून सुद्धा आपली सेवा दिली आहे. तिथे असताना दादाने संरक्षण सल्लागार म्हणून फिजी, न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनी आणि टोंगा या देशाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळलेला आहे. विविध देशाच्या मान्यवर मंडळी आणि संस्थेला भेट दिली आहे. त्या सोबत केनिया, सोमालिया, रशिया या देशात कर्तव्य बजावले आहे. “पोलादी माणसे – लातूर जिल्हा” या पुस्तकात दादावर विस्तृत लेख प्रकाशित झाला आहे.
सध्या चेतन चं. चंडेगावे याला भारतीय नौदलात ‘रियर ॲडमिरल(Rear Admiral)’ या पदावर बढती मिळाली आहे. रियर ॲडमिरल हे पद अत्यंत आदर्श आणि प्रतिष्ठित मानले जाते. सध्या या पदावरती काम करत असताना त्याच्याकडे भारतातील सगळ्या पाणबुडीच्या सेफ्टी आणि प्रशिक्षण विषयी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. भारतीय नौदलात रियर ॲडमिरल हे एक फ्लैग ऑफिसर किंवा फ्लैग रॅंक असून कोमोडोर रॅंक आणि वाइस ॲडमिरल मधील पद आहे. भारतीय नौदलात या पदाला ‘दोन स्टार’ फ्लैग ऑफिसर रॅंक सुद्धा म्हणतात. जसे की वाइस ॲडमिरल ‘तीन स्टार’ आणि ॲडमिरल हे ‘चार स्टार’ फ्लैग ऑफिसर रॅंक पद आहे. भारतीय नौदलात रियर ॲडमिरल पद 32-35 वर्षाच्या खडतर सेवेनंतर मिळते. रियर ॲडमिरल हे पद भारतीय सेनेतील मेजर जनरल आणि वायुसेनेतील एयर व्हाइस मार्शल पदाशी समकक्ष आहे. रियर ॲडमिरल कडे रणनीती आणि धोरणात्मक नियोजन, प्रशिक्षण, नौदल तुकडीचे(तळ किंवा आस्थापना) नेतृत्व आणि मुत्सद्दीपणा आणि आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय आणि बहुपक्षीय परस्पर संवाद अश्या जबाबदार्या असतात. रियर ॲडमिरल च्या खांदेपट्टी मानचिन्ह वर दोन स्टार असतात. बाहीपट्टी वर एक लहान आणि एक मोठी पट्टी आहे. लहान पट्टी वर वर्तुळ आहे. भारतीय अग्रक्रमाचा क्रम (Order of precedence in India) यामध्ये रियर ॲडमिरल यांचा २६वा अग्रक्रम येतो.
‘रियर ॲडमिरल’ चेतन चं. चंडेगावे यांनी 18वे Flag Officer Submarines (FOSM – Seat – विशाखापट्टणम) म्हणून पदभार ‘रियर ॲडमिरल’ के. वेंकटरामन यांच्या कडून 1 सप्टेंबर 2024 रोजी पदभार स्वीकारला आहे. या पदावर असलेली व्यक्ती नौदलाच्या पाणबुडी ताफ्याचे धोरणात्मक, आधुनिकिकरण, देखभाल, सुरक्षा आणि बचाव, आणि प्रशासनिक नियंत्रण ठेवते, ज्यामुळे भारताच्या सागरी संरक्षण आणि सामरिक बळकटतेसाठी हे पद अत्यंत आवश्यक ठरते. FOSM पदावर असणारी व्यक्ति अत्यंत अनुभवी असते. त्यांनी अनेक वर्ष वेगवेगळ्या पाणबुड्या वर सेवा बजावलेली असते. यांच्याकडे भारतीय नौदलातील सर्व प्रकारच्या पाणबुडींची देखरेख असते, ज्यात विविध पाणबुड्या यांचा समावेश आहे. या सोबत ‘पाणबुडी विरोधी युद्ध’, गुप्तचर माहिती संकलन, सागरी प्रतिबंध, सागरी नियंत्रण आणि विशेष ऑपरेशन्स यात निपुण असतात. FOSM पद या FOC-in-C ENC (Flag Officer Commanding-in-Chief Eastern Naval Command) पदावरील वरिष्ठांना रीपोर्ट करतो.
भारत हा ‘आण्विक त्रिकट (Nuclear Triad)’ संपन्न देश आहे. थोडक्यात अणुबॉम्ब जमीन वरून मिसाईल द्वारे, हवेतून विमाना द्वारे, आणि पाण्यातून पाणबुडी द्वारे प्रक्षेपित करण्याची क्षमता असणे. जगात ‘आण्विक ट्रायड देश’ फक्त 5 देश आहेत. भारतीय नौदलात सशस्त्र आण्विक पाणबुडीतून अणुबॉम्ब प्रक्षेपित करण्याची अचूक क्षमता आहे. यात अणू-चालित आक्रमक पाणबुड्या (SSNs) आणि सामरिक बॅलिस्टिक मिसाईल पाणबुड्या (SSBNs) पाणबुड्या आहेत. भारताचा “प्रथम वापर नाही” हा आण्विक सिद्धांत आहे. आणखी एक अतिशय महत्त्वाची जबाबदारी असते ती म्हणजे अणू-चालित आक्रमक पाणबुड्या (SSNs) आणि सामरिक बॅलिस्टिक मिसाईल पाणबुड्या (SSBNs) यांचे प्राथमिक दायित्व FOSM कडे असते.
याच महिन्यात आयएनएस अरिघात ही अरिहंत-श्रेणीच्या (Arihant-class) अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे. आयएनएस अरिघात (INS Arighat) ही पूर्णपणे स्वदेशी विकसित तंत्रज्ञानावर आधारित पाणबुडी आहे. आयएनएस अरिघात ही भारतीय नौदलातील दुसरी अणुऊर्जेवर चालणारी बॅलिस्टिक मिसाईल पाणबुडी (SSBN) आहे, जी भारताच्या आण्विक त्रिकटाचा (Nuclear Triad) महत्त्वाचा भाग आहे. आयएनएस अरिघात चे अंदाजे 6,000 टन विस्थापन वजन आहे आणि अणु ऊर्जेवर चालणारी असल्याने दीर्घकाळ पाण्याखाली राहू शकते. K-4 मिसाइल्सची रेंज मारक क्षमता 3,500 किमी पर्यंत आहे. पाणबुडीला अत्याधुनिक स्टेल्थ तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे तिला शत्रूच्या सोनार (SONAR) वर शोधणे अत्यंत अवघड होते. आयएनएस अरिघात चे आण्विक प्रतिबंध हे प्रमुख कार्य आहे आणि “प्रथम वापर नाही” धोरण असल्याने गरज पडल्यास दूसरा प्रहार करण्यास अतिशय सक्षम आहे. तज्ञांच्या मते भारताला कमीत कमी ३-४ SSN किंवा SSBN पाणबुडीची गरज आहे. तज्ञांच्या मते बहुतेक तिसरी SSBN आयएनएस अरिधमन पाणबुडी लवकरच भारतीय नौदलात सामील होईल.
दादाच्या प्रगतीला त्याच्या कुटुंबाची सर्वोत्तम साथ आहे. आई, वडील, पत्नी, मुलगी, बहीण, भाऊ, आणि बच्चे कंपनी असा मोठा परिवार आहे. देश सेवा डोळ्यासमोर ठेवून संघर्ष करत, आव्हानांना सामोरे जात, अविरत परिश्रम करत प्रगती करणे बहुतेक हाच त्याचा गुरूमंत्र आहे. राजू दादाला पुढील वाटचाली साठी लक्ष-लक्ष शुभेच्छा. दादाच्या हातातून महान देश सेवा घडावी हीच सदिच्छा.
शब्द/Long Form
FOSM – Flag Officer Submarines
SSBNs – Ship Submersible Ballistic Nuclear Submarine
SSNs – Ship Submersible Nuclear Submarine
SONAR – Sound Navigation and Ranging
आयएनएस – INS – Indian Naval Ship
एनडीए – National Defense Academy
भारतीय अग्रक्रमाचा क्रम (Order of precedence in India)
FOC-in-C ENC – Flag Officer Commanding-in-Chief Eastern Naval Command
आण्विक त्रिकट – Nuclear Triad
ब्लॉग – व्यक्तिविशेष – रियर ॲडमिरल – #FOSM – चेतन चं. चंडेगावे Read More »
व्यक्ती विशेष – जागतिक महिला दिन
8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा झाला. आपल्या आजूबाजूला स्त्री विविध रुपात आपल्याला भेटत असते. प्रत्येकात माणसाला चांगुलपणाचा सुवास येत असतो. प्रत्येकात घेण्या सारखा एक तरी चांगला गुण असतो. त्या व्यक्तीच्या संपर्कात आल्या नंतर आपल्याला त्या व्यक्तीची माहिती कळते. तर अश्या अनेक माणसाच्या गराड्यात आपण आपल्याला लागणारे गुण दुसर्याकडून घ्यायचे असतात. स्त्री एकाच वेळेस असंख्य पात्र साकारत असते. कधी ती बहीण, वहिनी, मैत्रिण, डॉक्टर, मार्गदर्शक, गुरू, कधी आई तर कधी शिक्षिका असते. प्रत्येक महिलांचा आपल्यावर प्रभाव पडत असतो. मी माझ्या परिवारातील स्त्रियांना जागतिक महिला दिना निमित्त शब्दरूपी अभिवादन करणार आहे.
द्वितीय पुष्प – गीता ताई
ताई या शब्दातच आई हा शब्द उच्चारला जातो. आणि माझी ताई म्हणजे प्रेम आणि माया यांचे मूर्तिमंत रूप. तिच्या बोलण्यात जिव्हाळा तर ओथंबून वाहत राहतो. मी ताईशी कोणत्याही विषयावर बोलू शकतो. लहानपणी मी आणि ताई नवीन घराच्या बांधकामा वर पाणी टाकण्यासाठी जात असू. त्या सोबत कामगारांना चहा सुद्धा नेत असू त्या वेळे पासून मी ताईचे अनुकरण करतो. भिंतींना पाणी कसे टाकावे इथून सर्व ताईचे बघून शिकलो. पण तिने कधी शिकवणीची फी घेतली नाही हा! लहानपणी शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर ताईचे सर्व पुस्तके मला भेटत. आमचे काका प्रत्येक पुस्तकाला पुठ्ठा लावायचा हे शिकवायचे. पुस्तके एक वर्ष जुनी असली तरी ही व्यवस्थित वापरल्या मुळे नवीन असल्या सारखी वाटायची. ताईने टापटीप हा गुण लहानपणा पासूनच जोपासलाय. बोलक्या स्वभावामुळे ताईचे शाळेत आणि पुढे कॉलेज मध्ये मित्र-मैत्रिणी खूप होत्या. आम्ही एकदा चाकूरला यूथ फेस्टिव्हल सुद्धा गेलो होतो. तिला वाचनाची खूपच गोडी असल्याने मी सुद्धा वाचनालयात जाऊन पुस्तके वाचायला लागलो. माझ्यातील अनेक चांगल्या सवयी आणि पुस्तका बद्दल रूची ताई मुळे निर्माण झाली. तिने माझ्या चांगल्या वाईट काळात, कडू गोड प्रसंगात कणखर राहून साथ दिली आहे आणि मार्गदर्शक केले आहे. लिखाणात सतत प्रोत्साहन दिले. ताई पत्नी, आई, बहीण, सून, मैत्रिण, आणि वहिनी अश्या सर्व जबाबदार्या मन:पूर्वक पार पडत असते. ती स्वत:हून कधी फोन करणार नाही पण योग्य वेळी तिचा पहिला फोन येतो. सगळ्यांच्या अडचणी सोडवण्यात अतिशय पटाईत आहे. कुशाग्र बुद्धी आणि परिस्थिती मुळे निर्माण झालेला संयम याचा उपयोग करून जीवनात पुढे मार्गक्रमण करते आहे. जगावेगळे निर्णय घ्यायला ताई मागे पुढे पाहत नाही. तिरुपती बालाजी इथे पूर्ण केस दान करण्याचा निर्णय सुद्धा असाच जगावेगळा होता. पूर्ण केस काढल्यावर एक वेगळंच तेज दिसत होतं चेहर्यावर. मुलं महत्त्वाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेला असताना उगाच वर्षभर टेन्शन न घेता, अति अपेक्षा न ठेवता सर्व प्रयत्न करणारी आई ही वेगळीच भासली. लहानपणा पासून एकत्र असल्याने ताई वर आणखी लिहिता येईल पण सध्या तरी संक्षिप्त लिहिले आहे. एकच तक्रार आहे ताई लेखन, चारोळी चांगली करत असताना सुद्धा जास्त काही लिहित नाही.
अश्या माझ्या कणखर, संयमी, आणि मार्गदर्शक बहिणीला 8 मार्च जागतिक महिला दिन निमित्ताने द्वितीय पुष्प देऊन अभिवादन करतो!!!
ब्लॉग – व्यक्तीविशेष – जागतिक महिला दिन Read More »
भगवान श्रीकृष्णाला पूर्ण अवतार म्हणतात. खरे तर भगवान श्रीकृष्णाचे देवत्व आणि पूर्ण अवतार हा विचार बाजूला ठेवून थोडा वेळ त्यांच्या मानवी आयुष्याचे अवलोकन केले तर खूप काही गोष्टी लक्षात येतील आणि त्यातून भरपूर आत्मसात करण्या सारखे आहे. भगवान श्रीकृष्णाचे जीवन अथांग समुद्रा सारखे आहे त्यातून आपल्या अल्पमतीला कळेल किंवा हातात जितके पाणी मावेल तितके घेऊन आपले जीवन कसे समृद्ध करता येईल हे पाहणे संयुक्तिक ठरेल.
भगवान श्रीकृष्णाच्या मानवी आयुष्यात खूप चढ उतार आहेत. भावनांचे खूपच सखोल कंगोरे, कठीण परिस्थिती, आणि बुद्धिमत्ता, चातुर्य, अभ्यास, लीला आणि त्यातून होणारे मानवी नात्याचे प्रगटीकरण, आणि मानवी मनाचे विविध पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वात ठळक दिसतात. त्यांचे मानवी आयुष्य विविध रंगांनी आणि विविध अंगांनी परिपूर्ण भरलेले आहे. भगवान श्रीकृष्णाला मानवी रुपात अतिशय कठोर परिस्थितीचा सामना करावा लागला.
भगवान श्रीकृष्णानां बासरी वादन, पीतांबर (वस्त्र), लोणी अतिशय प्रिय आहे. जन्म घेतल्या बरोबर आई वडीलांना दूर राहावे लागले. जिथे ते लहानाचे मोठे झाले. खेळले, राक्षसाचा विनाश केला. रासलीला केली. लोणी खाल्ले. गुरांची देखभाल केली. काही वर्षा साठी त्यांना गोकुळ सोडून वृंदावनात जावे लागले. श्रीकृष्ण आणि राधेचे प्रेम तर सर्वश्रुत आहे. पण त्या राधेला आणि असंख्य प्रियजणांना वृंदावन सोडून त्यांना मथुरा नगरीत जावे लागले होते. यशोदा माता आणि नंदबाबा, सवंगडी, आणि गोपिका या सगळ्यांचा त्याग केला होता. यशोदा माताने ममतेने पालन पोषण केल्या नंतर सुद्धा सोडून जावे लागले. त्यांनी उद्धवाला वृंदावनात पाठवले पण ते स्वत: परत कधीच वृंदावनात गेले नाहीत. असे सांगतात की वृंदावन सोडल्यावर त्यांनी कधीच बासरी वादन केले नाही आणि त्यांनी बासरीचा सुद्धा त्याग करून राधेला देऊन टाकली. वृंदावन सोडल्यावर त्यांनी कधीच लोणी चोरली नाही की खाल्ली सुद्धा नाही.
ब्लॉग – लेख – “सोडून द्या” Read More »
मी अंबाजोगाईला गेलो की योगेश्वरी देवीचे दर्शन घेतो. मी बाईमावशीच्या घरी गेल्या नंतर एक व्यक्ती आवर्जून वाट बघायची आणि अगत्य करायची. लहान मुला पासून ते मोठे पर्यंत सगळेच त्यांना “नाना” या नावाने संबोधन करायचे. नाना मी किती तरी वर्षा पासून पाहतोय शांत, संयंत व्यक्तिमत्व, किडकिडत पण सशक्त अंगकाठी, सावळा अंगवर्ण, पिवळा किंवा क्रीम रंगाचा कुर्ता आणि पांढरे शुभ्र धोतर आणि बोलण्यात मृदुता. मी त्यांना कधी मोठ्या आवाजात किंवा जोरात बोलताना बघितले नाही. रागात तर येणे लांबच राहिले. किंचित सुद्धा चीडचिड नाही… अतिशय शांत, संयमित आणि सरळ व्यक्तिमत्व…. बोलणे सुद्धा अतिशय कमी…
नानांचा जन्म बीड जिल्ह्यातील मोरफळी गावात झाला. सगळं मोरफळी गाव त्यांना नाना आणि बाईमावशीला नानी म्हणत. मोरफळीला नाना किराणा दुकान आणि शेती करत असत. फक्त आणि फक्त कष्ट आणि मेहनतीच्या बळावर त्यांनी मोरफळी ते अंबाजोगाई हा पल्ला गाठला. बाईमावशी वारल्या नंतर सुद्धा त्यांची प्रतिक्रिया संयमितच होती. कोणतीही परिस्थिती चटकन स्वीकारणे त्यांना जमायचे. काटक असल्याने कधीही हॉस्पिटलचे जायचा प्रसंग त्यांच्या साठी आला नाही. सगळ्या सोबत त्यांनी देवधर्म यात्रा सुद्धा केल्या आहेत. आई बाबांनी, बाईमावशी, नाना, अक्का, मामा आणि मामी सोबत यात्रा केल्या. आई सांगते त्या आठवणी आणखी ताज्याच आहेत.
बाईमावशी कडे गेल्या नंतर भोजनाला नेहमी सोबत बसणार. मुला साठी काका नेहमी अंबाजोगाईला राहत. त्यांचे अंबाजोगाईला किराणा दुकान होते. अंबाजोगाईला शनिवारी आणि मंगळवारी बाजार असतो. मी सुद्धा दोन-तीनदा बाजारात गेलो होतो. बाजारात पाय ठेवायला जागा नसायची. त्या वेळेस मुले बाजार असताना नाना किराणा दुकानात बसायचे आणि पूर्ण दुकान आरामात सांभाळायचे. पहिले पासून दुकानात बसून असल्याने सगळा व्यवहार व्यवस्थित करायचे. पुढे वार्धक्या मुळे दुकानात बसणे कमी झाले. नातवंडाचे अतिशय लाड करत असत. ठराविक वेळे पेक्षा कोणाला(नातवंडाला) यायला वेळ लागत असेल तर ते लगेच मोठ्या सुने कडे विचारपूस करत असत. नाक्या पर्यंत जाऊन-येऊन लक्ष ठेवत असत. माझे मावस भाऊ बांधत असलेले नवीन घराचे त्यांना अतिशय अप्रूप होते. एप्रिल महिन्यात मी अंबाजोगाईला गेलो होतो तर सगळे घर त्यांनी मला फिरवून दाखवले होते. त्यांना तीन मजले चढल्यावर सुद्धा त्यांचा उत्साह कमी झाला नव्हता. त्यांच्या दोन्ही मुलांनी प्रचंड मेहनत करून नवीन घर बांधत असल्याचा सार्थ अभिमान त्यांच्या डोळ्यात झळकत होता.
आई वडीलांची मायेची नजर आपल्याला कळत नाही ते नसताना सगळ्यांना त्यांची उणीव भासते. काटक असल्याने नियमित दररोज चालणे हाच त्यांचा आरोग्याचा गुरुमंत्र होता. मी त्यांना कधीही जाड झाल्याचे बघितलेच नाही. घरी छोटी-छोटी काम करणे. मुलांना दुकानात मदत करणे आणि नातवंडांना वेळ देणे याच दोन गोष्टी त्यांनी उतारवयात केल्या. तसे माणसाचे आयुष्य एका रेषेत कधीच नसते पण नाना उतारवयात अनेक वर्ष एकाच सरळ रेषेत आयुष्य जगले.
मागच्या रविवारी परत अंबाजोगाईला बाईमावशीच्या घरी गेलो. वाटले त्या वेळेस आवाज येईल “भागवत कधी आलास. बरा आहेस का?” पण ते शब्द काही कानी पडले नाहीत. कैलासवासी गेलेली माणसे थोडेच बोलणार पण त्यांचे शब्द कायमच लक्षात राहतात.
नाना (कै. शेषाद्री रामभाऊ तारे, अंबाजोगाई मृत्यु – 08/12/2022 )
नानांना शब्दरूपी भावपूर्ण श्रध्दांजली|||
ब्लॉग – व्यक्तीविशेष – नाना Read More »
सुट्टीचे दिवस जसे येतात तसे जातात. कोणता दिवस सत्कारणी लागतो आणि कोणत्या दिवशी निव्वळ टाइमपास होतो. पण एखादा दिवस काहीही न ठरवता खूप छान जातो त्याचे विशेष अप्रूप वाटते. बरेच दिवस झाले लहानपणीचा मित्र ‘कृष्णाजी’ भेटला नव्हता. एक दिवस त्याने त्याच्या शेतात येण्याचे आमंत्रण देऊन घरी घ्यायला आला. मी विचार केला की 1-2 तास शेत बघून यावे. पण तिथे गेलो आणि संध्याकाळ आनंदात घालवून परतलो.
मग शेतात जात असतानाच आमच्या गप्पा सुरू झाल्या. आस्थेने केलेली विचारपूस मेडिकलच्या १० गोळ्या पेक्षा गुणकारी असतात. आमच्या गप्पा शेत बघत-बघत चालू होत्या. नोकरी कशी सुरू आहे? करोना काय म्हणतोय? असे विषय येत होते आणि रेल्वेच्या डब्या प्रमाणे मागे पडत होते. त्याचे माझे शेत बघून झाले पण गप्पा काही संपल्या नाहीत. शेतात काय – काय सुविधा आहेत आणि काय पेरले आहेत हे सांगताना त्याला स्फुरण चढत होते.
ब्लॉग : लेख : हुरडा पार्टी – सत्कारणी लागलेला दिवस Read More »
प्रत्येक माणसाला काही तरी नवीन करून दाखवायची इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा असते. त्यासाठी अपार मेहनत, उत्कृष्ट वस्तु आणि गुणवत्तेचा स्तर वाढवून, सतत प्रयत्न करून, ग्राहकांना चांगली सेवा आणि इतर सुविधा पुरवून आपल्या कंपनीचे उत्पादन, सेवा देऊन प्रगती मार्गावर चालण्याची इच्छा असते.
शार्क टॅंक हा टीव्ही शो अमेरिकेत २००९ साली सुरू झाला. शो मध्ये ५ गुंतवणूक दार ( Invester or shark) असतात आणि नवीन कंपनी(pitcher/ ग्राहक) ज्यांना व्यवसाय करण्यासाठी पैसा, मार्गदर्शन पाहिजे असतात असे स्वरूप आहे. हा शो भारतीय लोकांसाठी नवीन कल्पना आहे. ज्या नवीन कंपनीला अधिक भांडवलाची गरज आहे किंवा ज्या कंपनी उत्पादन आणखी प्राथमिक स्वरुपात आहे.
ब्लॉग : लेख : शार्क टॅंक इंडिया Read More »
माणसाने स्वप्न आणि प्रगती करण्याची इच्छा दर्शवणे आणि त्यासाठी संकल्प करणे आणि विशेष प्रयत्न करून तडीस नेणे ही उद्योजक बनण्याची पहिली पायरी आहे. मला आठवते तू प्रसिद्ध “येवले” चहा franchise साठी प्रयत्न केला होता. “The secret of getting ahead is getting started.” – Sally Berger सॅली यांनी म्हंटल्या प्रमाणे तू आता मित्रा सोबत उद्योजक होण्याचे पहिले पाऊल “मैत्री कट्टा हॉटेल” च्या उद्घाटनाने टाकत आहेस. तू जेव्हा “मैत्री कट्टा”ची माहिती देत होतास त्यावेळेस मला काहीही विशेष वाटले नाही. कारण मला माहिती होते, तुला उद्योग जगतात येण्याची तीव्र इच्छा काही स्वस्थ बसू देणार नाही. “येवले” नंतर तू या गोष्टी या पाठपुरावा करतच असशील आणि योग्य वेळ येता त्यातून सुसंधी निर्माण करत उद्योग जगताला जवळ करशील. आणि झालेही तसेच. आज ही त्यांना व्यवसाय करण्याची अनावर इच्छा आहे. यशस्वी होण्यासाठी लागणारे गुण जसे की गुणवत्ता, नियोजन, चिकाटी, जोखीम व्यवस्थापन, सुसंघटित पणा या तुझ्या मध्ये आधीच आहेत. फक्त त्याचा योग्य वेळी योग्य वापर झाला की अर्धी लढाई तू जिंकशील.
ब्लॉग – पत्र लेखन – अभिजीत – नवीन व्यवसाय Read More »