प्रवासवर्णन

कोंकण – हर्णे आणि केशवराज मंदिर

काही प्रवास अचानक ठरतात. दोन आठवड्याखाली कोकणात जाण्याचा असाच योग आला. बऱ्याच दिवसांनी मित्र भेटला. दुसऱ्या मित्राच्या नातेवाईकाची कार प्रवासासाठी सज्ज झाली. ताम्हिणी घाटातून प्रवास योजला होता. मित्र ड्राइविंग सीट वर होता. ताम्हिणी घाटातून जाताना मन खुप प्रसन्न होत होते. मोकळा रस्ता.. बाजूला हिरवागार निसर्ग… ओळीनी जाणारे सायकल स्वार… मध्येच वाहणारे लहान-मोठे धबधबे, वर्षा विहारासाठी निघालेली कुटुंब… मित्र मैत्रिणी… वाटेत कोणी निसर्गाचा आस्वाद घेतोय… कोणी चहाचा… कोणी जेवणाचा… गप्पांचा आस्वाद… धबधब्या मध्ये एकमेक वर पाणी उडवून मैत्रीचा आस्वाद..

मला वाटते की माणूस जसा-जसा निसर्ग जवळ जातो तसा तणाव मुक्त होतो. कार मध्ये आमच्या गप्पा मस्त पैकी रंगल्या. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणूक पासून ते आयुर्वेद पर्यंत सगळ्या गोष्टीचा उहापोह झाला. हिलरी किती चांगल्या आहेत आणि ट्रम्प किती बेकार आहे ते आयुर्वेद, योगा आणि लंडन मधल्या आरोग्य सुविधा पर्यंत चर्चा झाली. आमचं काय विषय कोणता ही असो आपला मुद्दा सांगायचा. जसे कोकणात शिरत होतो तसे-तसे निसर्ग आपली विविध रूपे दाखवत होता. 

कोंकण – हर्णे आणि केशवराज मंदिर Read More »

अमरनाथ यात्रा – अद्वितीय अनुभव

वर्षे २०११ पासून घरी चर्चा चालू होती की सगळे मिळून वैष्णोदेवी आणि अमरनाथ यात्रा करुया. पण मुहूर्त लागत नव्हता. मार्च २०१४ मध्ये अमरनाथ यात्रे बद्दल आणि टूर ऑपरेटर ची सर्व माहिती काढली आणि प्रवासाचे नक्की केले. टूर ऑपरेटर ने सांगितले की मेडीकल चेकअप करून अमरनाथ रजिस्ट्रेशन फाॅर्म भरून आणा. मी माझ्या फॅमिली ची सगळी माहिती भरून फाॅर्म दिले. पहलगाम मार्गे जाण्याचे नक्की झाले.
यात्रेला २ मार्ग आहेत. १. बालताल – १४ किलोमीटर, २.पहलगाम – ३२ किलोमीटर.
पहलगाम/बालताल मार्गे अमरनाथ जाणाया साठी ४ पर्याय उपलब्ध आहेत.
१.चालत, २.घोडा, ३.हेलिकॉप्टर, ४.पालखी.

हेलिकॉप्टर बुकींग १ माॅर्चला सुरु झाले आणि २ दिवसात बुकिंग फुल झाले. मग मित्रांनी सागितले की हेलिकॉप्टर बुकिंग पहलगामला पोहोचल्या नंतर सुद्धा करता येते. आम्ही २९ जूनला श्रीनगरला पोहाचलो. अमरनाथ बोर्डाने पहलगाम मार्ग बर्फ साचल्यामुळे २ जुलै पर्यंत बंद केला होता. विचारपूस केल्यानंतर कळले की हेलिकॉप्टर बुकिंग फुल आहे आणि ब्लँक मध्ये ४५०० चा पास ८५०० ला भेटतो. बालताल

अमरनाथ यात्रा – अद्वितीय अनुभव Read More »