स्वलिखित “थोडं मनातलं... थोडं जनातलं...” पुस्तक विक्रीस उपलब्ध आहे!!! 

प्रवासवर्णन

प्रवासवर्णन

ब्लॉग : प्रवासवर्णन – अक्कलकोट आणि नळदुर्ग किल्ला – एक दिवसीय ट्रीप

बरेच दिवस झाले अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजाचे दर्शन घ्यायची इच्छा होती पण योग काही येत नव्हता. मग २९ तारखेला उगाच विचार केला की उद्या जाऊ दर्शनाला नंतर कदाचित करोंना तिसरी लाट आली तर काय घ्या. मग लगेच अक्कलकोट निवासी कुबेर करांना ‘गणेश दीवणजी’ फोन लावला. फेसबुक वर कुबेर ग्रुप आहे. तिथे सगळे एकमेकांना मदत करायला तत्पर असतात. दीवणजीनी फोन योग्य ते मार्गदर्शन केले. आम्हाला ११ च्या आत दर्शन घ्यायला सांगीतले. मग काय गुरुवारी पहाटे ५.४५ लाच गाडीने निघालो. आम्हाला ११ च्या पोहचायचे होते पण ड्राईवर ने ९.३० लाच अक्कलकोट टच केले. त्यामुळे दर्शन मजेत, उत्साहात, आणि अतिशय कमी वेळात झाले. हा गुरुवार सुद्धा खासच होता. कारण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि त्याच दिवशी एकादशी असल्याने आणि वर्षा चा शेवट असल्याने गर्दीचा अंदाज होता. दीवणजी नी स्वामी समाधी मंदिराचे सुद्धा दर्शन घ्यायला सांगीतले. जे की आम्हाला माहितीच नव्हते. तिथे दीवणजी सोबत छान गप्पा रंगल्या. सोबत आणखी एक कुबेर करां सोबत छान गप्पा करत नाष्टा झाला. खरे तर कुबेरकरांचे हॉटेल होते. त्यामुळे छान नाष्टा झाला. मग लगेच दुसऱ्यादा दर्शन घेऊन समाधी दर्शन घेतले आणि नळदुर्ग कडे निघालो.
हन्नूर मार्ग बनत आहे. मार्गा मध्ये कच्चा रस्ता असल्याने वेळ लागत होता. बरोबर १२.१८ ला नळदुर्ग कडे पोहोचलो. आणि नळदुर्ग च्या किल्ल्याची धावती भेट घेतली. नळदुर्ग हा महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यातील सर्वात मोठा किल्ला आहे. नळदुर्ग किल्ला उस्मानाबाद जिल्ह्यात येत असून सोलापूर पासून 48 किमी वर राष्ट्रीय महामार्गावर आहे. हा किल्ला कल्याणीच्या चालुक्य राजाच्या ताब्यात होता आणि शेवटी मोगला कडे हा किल्ला गेला. मुख्य दरवाजा जवळ जाण्यासाठी वळणाचा रस्ता आहे आणि साध्या कमानीतून प्रवेश आहे. शत्रूला चकवा देण्यासाठी अशी मुख्य दरवाजाची योजना आहे. दरवाजा लाकडी असून त्याला टोकदार खिळे आहेत. हलमुख मुख्य दरवाजातून प्रवेश झाल्यावर समोर हत्तीखाना आहे. प्रवेश झाल्यास नळदुर्ग चा किल्ला किती अजस्त्र आहे ही गोष्ट लक्षात येत नाही. हत्तीखाना च्या वरी मोकळी जागा आहे तिथे लोक फोटो काढत होती मग आमची स्वारी सुद्धा साहजिक तिथे पोहोचली. तिथे लोक घुमटावर चढून फोटो काढत होती. मग आमच्यातील दोघांनी घुमटावर फोटो काढले. सगळा नसला तरी थोडा परिसर दिसत होता. मुख्य रस्त्या सोबत एका साइड ने चालण्याचा रस्ता आणि दुसऱ्या बाजूने ई-रिक्षाला जाण्यासाठी होता. बागांना छान, सुस्थितीत ठेवले आहे. जेवणाची वेळ झाली होती. मग काय घरून आणलेल्या जेवणावर छान झाडाखाली बसून ताव मारला. छोटीशी एक पंगतच केली. बाजूला झाडावर बसलेल्या कोतवाल पक्ष्याचे फोटोसेशन केले. मग ई-रिक्षाने पुढे गेलो.

ब्लॉग : प्रवासवर्णन – अक्कलकोट आणि नळदुर्ग किल्ला – एक दिवसीय ट्रीप Read More »

 ब्लॉग : प्रवासवर्णन – तिरूपती बालाजी दर्शन ट्रीप – दीड दिवसीय ट्रीप

आपण छोटा का होईना प्रवास का करतो? तर प्रवास मध्ये गप्पा टप्पा, सुख दु:खाची चर्चा, विचारपूस, निसर्गाशी संवाद आणि मना वर आलेला मरगळ दूर करण्या साठी करतो. या वर्षी करोना लॉकडाऊन नंतर तिरूपती बालाजी दर्शन करण्याची कुटुंबाची बालाजी दर्शनाला जायची इच्छा होती. पण कोविड मुळे काही जाता येत नव्हते. त्यात मी महाराष्ट्रात, मंदिर आंध्रात आणि मध्ये कर्नाटक, तेलंगणा मधून रस्ता जास्त असल्याने शक्य नव्हते. कारण प्रत्येक राज्याचे वेगवेगळे नियम आणि कधी कोणता नियम अर्ध्या रात्रीत येईल याची शाश्वती नव्हती. त्यामुळे कोविड मुळे दर्शन लांबत गेले. आणि दुष्काळात तेरावा महिना म्हणल्या प्रमाणे जुलै महिन्यात दर्शन पास तर 5 मिनिटात संपले. इकडे आधार कार्डचा नंबर टाके पर्यंत तर तिकडे तिकिट सुद्धा संपले. हे तर गाजलेल्या मोबाइल फ्लॅश सेल सारखे तिकिटे 5 मिनिटात संपून जात होती. दुसर्‍या प्रकारची तिकिटे होती पण आपल्याला भेटतील याची काही खात्री नव्हती. त्यामुळे आम्ही तिकडे फिरकलोच नाही. २४ ऑगस्टला परत सप्टेंबर महिन्याचे तिकिटे ओपन झाली. आणि ६ जणांचे तिकिट काढे पर्यंत तर ५ मिनिटात संपले सुद्धा. पण बहुतेक कोणाचेही तिकिट न निघाल्या मुळे परत १० मिनिटात तिकिट ओपन झाली. त्यामुळे मी strategy बदलली. एकदाच सगळे तिकिटे काढण्या पेक्ष्या ३-३ लोकांचे तिकिट काढत गेलो आणि त्यातच पूर्ण दिवस गेला. त्यात यश (भाचा) आधार कार्ड नसल्याने त्याला एक ही दर्शन मिळाले नाही. त्या साठी परत पर्यायी दर्शन तिकिटाची व्यवस्था केली. मग त्यात आमचे दुसरे दर्शन, यशचे एक दर्शन यांचा ताळमेळ घालणे नाकी नऊ आले. पण त्याची सुद्धा तयारी झाली. आमचे दुसरे दर्शन तिकिटे सुद्धा लगेच मिळाली. पण यशचे आधार कार्ड काढून दर्शन तिकिट काढायला थोडा वेळ लागला. रेल्वे आणि राहायची सोय या नंतर तिकिट पुराण एकदाचे संपले. रेल्वे, दर्शन, निवास तिकिट काढणे वेळ खाऊ काम होते.

 ब्लॉग : प्रवासवर्णन – तिरूपती बालाजी दर्शन ट्रीप – दीड दिवसीय ट्रीप Read More »

ब्लॉग : प्रवासवर्णन – मढेघाट स्टॉर ट्रेक – स्टार गेझिंग ईवेंट

स्टार ट्रेक कार्यक्रमासाठी मी २७ तारखेला सकाळी १०.३० वाजता निघालो. Primesandzooms (उपकरण भाड्याने देणारी संस्था) मधून काही उपकरणं घेतली. १.३० वाजता मी बस जवळ पोहोचलो. एका अनोख्या एक दिवसीय सफरीवर मी पहिले पाऊल टाकले. मी मढेघाटला ४.३० ला पोहोचलो. तिथे बऱ्याच वेळ सूर्यास्त आमची वाटच बघत होता.

ब्लॉग : प्रवासवर्णन – मढेघाट स्टॉर ट्रेक – स्टार गेझिंग ईवेंट Read More »

ब्लॉग : प्रवासवर्णन – गोवा ऑफसाईट – ३ दिवसीय ट्रीप

मी मा‍झ्या (SAS R&D Ltd Pune)ऑफिसच्या ऑफसाईटच्या निमित्ताने गोव्याला गेलो होतो. 3 दिवसाचा कार्यक्रम होता. १० तारखेला गुरूवारी दुपारी 4.30 ला आम्ही रेल्वेने निघालो आणि 11 तारखेला 8.30 वाजता पोहोचलो. सकाळी एका हॉटेल मध्ये पोहे खाल्ले. पुण्या पेक्षा चवीला उत्कृष्ट पोहे गोव्यात खाल्याने सुखद अनुभव दिला. (फॉरचून अक्रॉन रेजिना) हॉटेल रूम भेटायला वेळ असल्याने आम्ही पटापट अ‍ॅक्टिवा भाड्याने घेतल्या आणि तडक उत्तर गोव्यातील (Vegator Beach) वेगटोर बीच कडे कूच केले. छोटे रस्ते, प्रदूषण मुक्त हवा, आजूबाजूला हिरवीगार शेती, आमच्या कडे बघून प्रसन्न पणे हसणारा सूर्य आणि कमी वर्दळ यामुळे अ‍ॅक्टिवाचा प्रवास सुखद होता. सकाळची वेळ, कमी उकाडा आणि शांत रस्ता त्यामुळे एका तासांतच आम्ही तिथे पोहोचलो. बीचच्या बाजूला चपोरा किल्ल्याचे(Chapora Fort) आधी दर्शन घेतले. हा किल्ला एका टेकडीवर वसलेला आहे. त्यात एका बाजूला समुद्र आणि दुसर्‍या बाजूला हिरवीगार झाडी. पण महाराष्ट्राच्या किल्ल्या एवढी भव्यता तिथे जाणवली नाही. किल्ला चढताना मात्र माझी दमछाक झाली. प्रवासात उलटी सदृश्य मळमळ झाल्यामुळे गटागट नारळाचे पाणी पिले आणि पाण्याची एक बाटली भरून घेतली. मी प्रवासात डिहायड्रेट (dehydrate) होणार नाही याची काळजी घेतो. फोटोग्राफी साठी एक अतिशय उत्तम जागा आहे. उंचा वर असल्यामुळे चारही दिशेचे फोटो काढायला सुखद अनुभव होता. किल्ला उतरल्या नंतर आम्ही वेगटोर बीचला गेलो. सुंदर आणि शांत बीच होता. दुपारची वेळ असल्याने वर्दळ कमी होती. जीन्स असल्याने मी काही जास्त पाण्यात गेलो नाही. पण दुसऱ्यांनी समुद्र स्नानाचा आनंद लुटला. तेथून आम्ही लंच साठी २.३० ला हॉटेलला पोहोचलो. लंच करून आराम केला आणि सूर्यास्त बघायचे ठरवले. सूर्यास्तासाठी बीचवर पोहोचायला उशीर झाला. पण सूर्यास्त एन्जॉय करून परत ऑफिस पार्टी मध्ये एन्जॉय केला. बाघा बीच बघून अश्या रीतीने गाणी गुणगुणत पहिला दिवस संपला.

ब्लॉग : प्रवासवर्णन – गोवा ऑफसाईट – ३ दिवसीय ट्रीप Read More »

ब्लॉग : प्रवासवर्णन – मढेघाट स्टॉर ट्रेक – स्टार गेझिंग ईवेंट

स्टार ट्रेक कार्यक्रमासाठी मी २७ तारखेला सकाळी १०.३० वाजता निघालो. Primesandzooms (उपकरण भाड्याने देणारी संस्था) मधून काही उपकरणं घेतली. १.३० वाजता मी बस जवळ पोहोचलो. एका अनोख्या एक दिवसीय सफरीवर मी पहिले पाऊल टाकले. मी मढेघाटला ४.३० ला पोहोचलो. तिथे बऱ्याच वेळ सूर्यास्त आमची वाटच बघत होता.

स्टार गेझिंग ईवेंट हा कार्यक्रम स्टार ट्रेक आयोजित आणि SAS R&D च्या WOP (World of Parenting) या प्रकल्पा अंतर्गत घेण्यात आला होता. त्यात जवळपास ८०‌+ लोकांनी नोंदणी केली होती. कार्यक्रम पत्रिका भरगच्च होती आणि त्यात प्रमुख ३ भाग होते. १. दुर्बीण सत्र (Telescopic session) २. आकाश दर्शन सत्र (Sky Session) ३. संवाद (Interactive Session). पूर्ण रात्रभर तुम्ही हलणार सुद्धा नाही अशा सत्रांची रेलचेल होती. सोबत चहा, नाश्ता आणि जेवण यांचे सुद्धा अचूक वेळापत्रक होते. संवाद भागात प्रश्नोत्तरे आणि व्हिडीओ, माहिती, गप्पा गोष्टी यांची भरमार होती. प्रश्न व उत्तर असा लहान मुलांसाठी एक खास भाग होता. लहान मुले बहुतेक करून पहिल्या रांगेत होती आणि मा‍झ्या बाजूला २ मुलं होती. प्रस्तुतकर्त्याने एखादा प्रश्न विचारला की १० सेकंदामध्ये पहिल्या रांगेतून किंवा मा‍झ्या बाजूला बसलेले मुलं उत्तर देत होती. मोठ्यांना विचार करायला वेळ सुद्धा मिळत नव्हता. मला तर बहुतेक उत्तरं माहितीच नव्हती. अशा अवस्थेत मला “गेम ऑफ थ्रोन्स” एका संवादाची आठवण झाली “You know nothing, Jon Snow”. “अरविंद जगताप” यांनी कृष्णविवराची (Black hole) व्याख्या सांगा आणि कसे बनते असा प्रश्न विचारल्यावर काय उत्तर देणार. खगोलशास्त्रा विषयी माहिती नसल्याने मा‍झ्यासाठी “You know nothing about Atronomy, Bhagwat” हे वाक्य जास्त लागू होईल. अरविंदने सविस्तर सांगितले की ताऱ्यामधील इंधन संपल्यानंतर ताऱ्याचे कृष्णविवर बनते. जसे की माणसाची वैचारिक बैठक संपली की माणूस अविचारी होतो. कृष्णविवर आजूबाजूचं सगळं फस्त करून टाकतो. त्याच प्रमाणे अविचारी माणसे सुद्धा पृथ्वी वरील संपदा नष्ट करून आपला स्वार्थ साधत आहेत.

ब्लॉग : प्रवासवर्णन – मढेघाट स्टॉर ट्रेक – स्टार गेझिंग ईवेंट Read More »

अनुभववर्णन – TATR – ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प

मी कविता सादरीकरण्या साठी “९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला” जाणार होतो. तर सहजच यवतमाळच्या जवळपास पर्यटन साठी काय आहे त्या दृष्टीने मी शोध घेतला आणि मला आठवले त्याच भागात “तो” राहतो. त्याचा वावर 600 वर्ग किलोमीटरचा आहे. त्याला भेटायची भीती वाटते पण बघायला हरकत नसावी. त्यामुळे मी ताडोबाची जंगल सफारी आरक्षित केली.

अनुभववर्णन – TATR – ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प Read More »

ब्लॉग – प्रवासवर्णन – बडोदे संमेलना निमित्त भटकंती

पूर्वतयारी
९१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कवी कट्टा या काव्य मंचा साठी मी माझी कविता जानेवारीत पाठवली होती. त्यावेळेस मी काही प्रवासाचे ठरवले नव्हते. बहुतेक हा मा‍झ्या नशीबात हा प्रवास लिहिलेला असेल. माझ्या कारने मला मोठा प्रवास करता आला नाही म्हणून मग मी कारने जायचे ठरवले. मी त्यासाठी मा‍झ्या दोन मित्रांना सुद्धा विचारले पण सुट्यांच्या कारणामुळे तो प्रयत्न काही यशस्वी झाला नाही. आम्ही घरातील तिघे जाणार होतो पण ते नियोजन सुद्धा बारगळले. आपण नियोजन केल्या प्रमाणे प्रवास झाला तर तो प्रवास मजेचा थोडेच वाटतो? पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यावर मग प्रवासाच्या ५ दिवस अगोदर रेल्वेचा प्रवास निश्चित केला आणि नशीबाने तिकीटे उपलब्ध होती. मग काय पटापट तिकीटे आरक्षित केली. बारा किंवा तेरा तारखेच्या घोळा मध्ये मला थेट बारा तारखेचे पुणे अहमदाबाद दुरंतो एक्सप्रेसचे तिकीट मिळाले. मग सगळे नियोजन अंबुजा सीमेंट प्रमाणे मजबूत झाले. मी तेरा तारखेला अहमदाबादला जाणार होतो आणि तेथून सोमनाथला दोन  दिवस राहणार होतो. मी फक्त सोमनाथ, दिव, आणि सासण गीर नॅशनल पार्क बघायचे नियोजन केले होते. पण एक विलक्षण योगायोग जुळून आला होता. कारण मी ज्या वेळेस कारने प्रवास करणार होतो त्यावेळेस मी जास्तीत जास्त अहमदाबाद पर्यंत जाऊन वापस येणार होतो. त्यात सोमनाथ दर्शनाच्या नियोजनाची काहीच आखणी नव्हती. पण बहुतेक ‘त्याची’ इच्छा असेल. माझा छोटासा कविता वाचनाचा कार्यक्रम होता पण पर्यटनाची संधी सोडेल तर काय कामाचे? ज्याप्रमाणे डेटा, कॉलिंग, आणि इतर एका पॅकमध्ये रिचार्ज करतो, त्याच प्रमाणे कुठेही जायचे असेल तर मी त्यात पर्यटन घुसवतोच. एकाच वेळेत ३ काम करायची सवय काही जात नाही.
दिनांक – १३ फेब्रुवारी (अहमदाबाद)तेरा तारखेला मी रेल्वेने पहाटे ६.४० ला अहमदाबाद पोहोचलो. मग आम्ही दोघं प्रतीक्षालयात गेलो आणि थोडा आराम केला. मी नाश्ता करून आलो तर राधाने(पत्नी) सांगीतले आज महाशिवरात्री आहे. मग मा‍झ्या डोक्यात प्रकाश पडला. मी सोमनाथाच्या दर्शनाची वेळ, पुढील गाडीची वेळ, हा सगळा हिशोब मांडला आणि बहुतेक माझा सगळा हिशोब चुकणार होता. माझी पुढील गाडी अहमदाबाद – सोमनाथ १०.४० ला सुटुन ८.०० ला तिथे पोहोचणार होती. मग मी विचार केला दर्शनाचा जुळून आलेला योगायोग हुकला. पण हार मानून चालणार नव्हते. मी हॉटेल मध्ये प्रवेश केल्या-केल्या मंदिराविषयी माहिती काढली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी रात्रभर मंदिर चालू राहणार होते. मग काय आम्ही तयार होऊन दीड तासात मंदिराजवळ पोहोचलो आणि मंदिरामध्ये Light And Sound कार्यक्रम चालू होता. तो बाहेरूनच ५ मिनिटे पाहीला. नेहमी प्रमाणे वाट चुकत आणि मंदिर शोधत एकदाचा नवीन मंदिरात गेलो. तर तिथे ११ वाजता आरती सुरू झाली होती मग तो ही प्रसाद पदरात पाडून शेवटी सुख कारक असे महादेवाचे दर्शन झाले. दर्शनाला दीड तास लागला परंतु अनुभव मात्र अवर्णनीय होता. एकदम नवीन मंदिर बांधले आहे आणि त्यावर सणा निमित्त रोषणाई उठून दिसत होती. Light and Sound कार्यक्रमाचा अनुभव सुद्धा एकदम छान आणि ताजातवाना करून जातो. महाशिवरात्री निमित्त मंदिर उजळून निघाले होते. जुने मंदिर बाजूलाच आहे. मग जुन्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. बहुतेक प्रवाश्याच्या जाण्या-येण्या मुळे हा परिसर गजबजला होता.

हे महादेवा…
तूच जन्म, तूच मृत्यु
तूच स्तब्धता, तूच संगीत 
तूच शक्ती, तूच भक्ती
सोमनाथा, तुला करितो वंदन

ब्लॉग – प्रवासवर्णन – बडोदे संमेलना निमित्त भटकंती Read More »

कोंकण – हर्णे आणि केशवराज मंदिर

काही प्रवास अचानक ठरतात. दोन आठवड्याखाली कोकणात जाण्याचा असाच योग आला. बऱ्याच दिवसांनी मित्र भेटला. दुसऱ्या मित्राच्या नातेवाईकाची कार प्रवासासाठी सज्ज झाली. ताम्हिणी घाटातून प्रवास योजला होता. मित्र ड्राइविंग सीट वर होता. ताम्हिणी घाटातून जाताना मन खुप प्रसन्न होत होते. मोकळा रस्ता.. बाजूला हिरवागार निसर्ग… ओळीनी जाणारे सायकल स्वार… मध्येच वाहणारे लहान-मोठे धबधबे, वर्षा विहारासाठी निघालेली कुटुंब… मित्र मैत्रिणी… वाटेत कोणी निसर्गाचा आस्वाद घेतोय… कोणी चहाचा… कोणी जेवणाचा… गप्पांचा आस्वाद… धबधब्या मध्ये एकमेक वर पाणी उडवून मैत्रीचा आस्वाद..

मला वाटते की माणूस जसा-जसा निसर्ग जवळ जातो तसा तणाव मुक्त होतो. कार मध्ये आमच्या गप्पा मस्त पैकी रंगल्या. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणूक पासून ते आयुर्वेद पर्यंत सगळ्या गोष्टीचा उहापोह झाला. हिलरी किती चांगल्या आहेत आणि ट्रम्प किती बेकार आहे ते आयुर्वेद, योगा आणि लंडन मधल्या आरोग्य सुविधा पर्यंत चर्चा झाली. आमचं काय विषय कोणता ही असो आपला मुद्दा सांगायचा. जसे कोकणात शिरत होतो तसे-तसे निसर्ग आपली विविध रूपे दाखवत होता. 

कोंकण – हर्णे आणि केशवराज मंदिर Read More »

अमरनाथ यात्रा – अद्वितीय अनुभव

वर्षे २०११ पासून घरी चर्चा चालू होती की सगळे मिळून वैष्णोदेवी आणि अमरनाथ यात्रा करुया. पण मुहूर्त लागत नव्हता. मार्च २०१४ मध्ये अमरनाथ यात्रे बद्दल आणि टूर ऑपरेटर ची सर्व माहिती काढली आणि प्रवासाचे नक्की केले. टूर ऑपरेटर ने सांगितले की मेडीकल चेकअप करून अमरनाथ रजिस्ट्रेशन फाॅर्म भरून आणा. मी माझ्या फॅमिली ची सगळी माहिती भरून फाॅर्म दिले. पहलगाम मार्गे जाण्याचे नक्की झाले.
यात्रेला २ मार्ग आहेत. १. बालताल – १४ किलोमीटर, २.पहलगाम – ३२ किलोमीटर.
पहलगाम/बालताल मार्गे अमरनाथ जाणाया साठी ४ पर्याय उपलब्ध आहेत.
१.चालत, २.घोडा, ३.हेलिकॉप्टर, ४.पालखी.

हेलिकॉप्टर बुकींग १ माॅर्चला सुरु झाले आणि २ दिवसात बुकिंग फुल झाले. मग मित्रांनी सागितले की हेलिकॉप्टर बुकिंग पहलगामला पोहोचल्या नंतर सुद्धा करता येते. आम्ही २९ जूनला श्रीनगरला पोहाचलो. अमरनाथ बोर्डाने पहलगाम मार्ग बर्फ साचल्यामुळे २ जुलै पर्यंत बंद केला होता. विचारपूस केल्यानंतर कळले की हेलिकॉप्टर बुकिंग फुल आहे आणि ब्लँक मध्ये ४५०० चा पास ८५०० ला भेटतो. बालताल

अमरनाथ यात्रा – अद्वितीय अनुभव Read More »