२००१ साली रशिया मध्ये विकसित झालेल्या सिंधुघोष-श्रेणी (किलो-श्रेणी) पाणबुड्या कार्यरत होत्या. किलो-श्रेणीतील पाणबुड्या भारतीय नौदलातील शक्तिशाली डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्या आहेत. या रशियात तयार करण्यात आल्या आहेत आणि १९८७ ते २००० पर्यंत जवळपास १० पाणबुड्या भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. सिंधुघोष (Kilo-class) प्रकारातील पाणबुड्या भारताच्या सागरी सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. या पाणबुड्याची लांबी सुमारे ७२.६ मीटर असून त्यांचे प्रत्येकी पाण्यावरील वजन सुमारे २३०० टन आणि पाण्याखालील वजन ३००० टन आहे. या पाणबुड्या पाण्याखाली जवळपास १९ नॉट्स म्हणजे ३५.१८ किमी/तास वेगाने प्रवास करू शकतात आणि साधारण ४५ दिवस समुद्रात कार्यरत राहू शकतात.
या पाणबुड्यामध्ये त्यांचा आत्मा म्हणजे नियंत्रण कक्ष. सर्वसाधारणपणे पाणबुड्यामध्ये टॉर्पेडो कक्ष, इंजिन आणि बॅटरी विभाग, सोनार आणि सेन्सर प्रणाली, एक संडास, एक ऑपरेशन थिएटर, जवळपास १२ लोकांना झोपण्या साठी बेड आणि छान स्वयंपाक घर सुद्धा असते. स्वयंपाकघरात तीन खानसामा सुद्धा असतात. आणि पाणबुडीमध्ये सुमारे ५० ते ५५ अधिकारी व नौसैनिक राहू शकतात. त्यांच्यासाठी झोपण्याची जागा आणि आवश्यक सुविधा असते. मोकळ्या वेळेत नौसैनिक बुद्धिबळ, कॅरम आणि इतर खेळ सुद्धा खेळतात.
जीवन किती आव्हानात्मक आणि अवघडप्राय असते यांचे मूर्तिमंत रूप म्हणजे भारतीय नौदलातील सैनिकांचे जीवन. भारतीय नौदलाला प्रत्येक परिस्थिती हाताळता येते. त्या साठी ऑफिसर नाही तर प्रत्येक नौसैनिक तयार असतो. कारण परिस्थिती कधी तुमची परीक्षा घेईल सांगता येत नाही. चवथ्या दिवशी पहाटे चार वाजता पाणबुडी ले हाव्रे मधून बाहेर पडली. नैसर्गिक रित्या संरक्षित असल्याने बाहेर समुद्रात किती मोठ्या लाटा आहेत हे कळायला काहीच मार्ग नव्हता. आणि त्यात बिसकेच्या उपसागरात समुद्री वादळ आले होते. बिसकेच्या उपसागरात मध्ये नेहमीच समुद्री वादळे येत असतात. इंग्लीश चॅनल मध्ये खूप मोठ्या प्रमाणात जल वाहतूक चालू असते. त्यात आत्ता लाटांची समुद्र स्थिती ६-७ होती. म्हणजे जवळपास लाटांची उंची ३० फुटी होती. खरे तर पाणबुडीची दिशा नियंत्रण प्रणाली ही समुद्रा खाली प्रवासा साठी असते पण पाण्यावर प्रभावी नसते. जशी पाणबुडी समुद्रात उतरली तसे पाणबुडीच्या बाहेरच्या म्हणजे नियंत्रण मनोरा वरून पाण्याच्या लाटा वाढल्या. त्याच वेळेस एका मोठ्या लाटांचव लाटांच्या पाणबुडी वरील नौदलाचे मास्टर चीफ पेटी ऑफिसर हे खाली पडून त्यांचा खांदा निखळला. त्यानंतर ज्या वेळेस पाणबुडी बाहेर बाह्य आवरणावर जाऊन दोरखंड सोडण्या साठी गेलेल्या आणखी एक पेटी ऑफिसरचा खांदा निखळला. त्यात पेटी ऑफिसरचे हाड सुद्धा तुटले. त्या नंतर स्पेनला पोहोचे पर्यंत १२ दिवसाचा कठीण आणि खडतर प्रवास सुरू झाला. कारण सगळ्या लोकांचे पाणबुडी वरील नियोजन, संघ कार्य जबरदस्त असते. पाणबुडी वर सगळे जण एकाच प्रकारचा गणवेश धारण करतात. खवळलेला समुद्र… जखमी झालेले पेटी ऑफिसर… त्यांच्या वर उपचार व्हावेत यासाठी झटणारे नेतृत्व… न संपणारा प्रवास… प्रियजणांना बोलण्याची संधी मिळत नव्हती.. निर्धारित वेळेत पोहोचण्याची धडपड.. त्या साठी लागणारे नियोजन.. यातच सगळा वेळ खर्ची पडत होता.
Views: 27

