आम्ही क्षितिज enclave च्या FOSM(Flag Officer of submarine) बंगलो मध्ये बसून नाष्टा करतोय. फ्लॅग हाऊसेस हे नयनरम्य अशा डॉल्फिन हिल वर वसलेली आहेत. समोर अथांग समुद्र, मागे फळबागा साठी जागा, दोन मजली टुमदार बंगला, समोर बागेसाठी जागा, बागेत बसण्यासाठी प्रशस्त व्हरांडा, दोन स्टडी रूम, ५ बेडरूम, १ किचन असा भव्य बंगला आहे. इथे फ्लॅग हाऊस साठी वेगळा प्रोटोकॉल पाळला जातो. फ्लॅग ऑफिसर शहरात असेल तर घरावर नेव्ही चा फ्लॅग फडकत असतो. फ्लॅग ऑफिसर जर बाहेर गावी असेल तर नेव्ही फ्लॅग काढून ठेवतात.
तिथे भारतीय नौदलाच्या पाणबुडी, डिस्ट्रॉयर, कॉर्व्हेट आणि इतर युद्ध नौका उभ्या होत्या. तेवढ्यात आमची गाडी थांबली. समोर पाहतो तर अजस्त्र युद्धनौका INS Kavaratti उभी होती. गाडीतून उतरून INS Kavaratti वर जाताना एक वेगळीच अनुभूति होती. हे म्हणजे प्राणी संग्रहालयात वाघ बघणे आणि प्रत्यक्ष ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जाऊन वाघ बघणे या दोन्ही मध्ये फरक आहे. ताडोबात समोरासमोर वाघ बघणे जसा रोमांचित करणारा अनुभव असतो तसा अनुभव INS Kavaratti वर आला.
मग आम्ही अग्रभागावरील फॉरडेकवर वर कमांडर सोबत फोटो काढला. तिथेच मागे ७६ mm मुख्य तोफ होती. समोर दोन मोठे मोठे साखळदंड जहाज नांगर म्हणून होते. भारतीय नौसेना पोत कवरत्तीची जहाज बांधणी २० जानेवारी २०१२ ला सुरू झाली आणि २२ ऑक्टोबर २०२० मध्ये भारतीय नौसेनेत दाखल/कमिशन झाली. INS Kavaratti मध्ये कार्बन कंपोझिट (Carbon Composite) सामग्रीचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे ते वजनाने हलके आणि रडारला चकवा देण्यास सक्षम आहे. फॉरडेक वर भा. नौ. पो. कवरत्तीने किती target शिप नष्ट केली आहेत ती संख्या नोंदवली आहे. ती संख्या बघूनच आपल्याला गर्व वाटतो. कमांडरने सांगितले की भा. नौ. पो. कवरत्तीचे वर्णन हंटर निमेसिस म्हणजे शत्रूच्या पाणबुड्यांसाठी विनाशक असे सुद्धा करतात. आणि INS Kavaratti चा ओळख क्रमांक किंवा Pennant Number P31 आहे. भा. नौ. पो. कवरत्तीच्या चिन्हात कवडी आहे आणि त्यावर मुकुट आहे.
ब्रिज वर जहाजाचे नियंत्रण, नेव्हिगेशन आणि संचालन केंद्र आहे. हा विभाग जहाजाचा सर्वात महत्त्वाचा नियंत्रण विभाग मानला जातो. ब्रिज वर मुख्य कार्य म्हणजे जहाजाचे संचालन, दिशा व वेग नियंत्रण, समुद्री मार्ग निरीक्षण, रडार व कम्युनिकेशन समन्वय साधणे आहे. येथे मोठ्या काचेच्या खिडक्या होत्या ज्यामुळे समुद्राचे विस्तृत निरीक्षण करता येते. ब्रिजवर विविध प्रकारची आधुनिक उपकरणे बसवलेली असतात. त्यात स्टिअरिंग कंट्रोल सिस्टम, नेव्हिगेशन रडार, GPS, इलेक्ट्रॉनिक चार्ट सिस्टम आणि कम्युनिकेशन उपकरणांचा समावेश होतो. सोबत इंजिन कंट्रोल पॅनेल, दूरदर्शक निरीक्षण प्रणाली सुद्धा असते. भा. नौ. पो. कवरत्ती वर रेवती रडार बसवलेले आहे.
जुलै २०२५ मध्ये स्वदेशी बनावटीचे एक्स्टेंडेड रेंज अँटी-सबमरीन रॉकेट (ERASR) हे युद्धनौकांवर वापरले जाणारे एक अत्याधुनिक शस्त्र आहे. याचा मुख्य उपयोग समुद्रातील शत्रूच्या पाणबुड्याशोधून त्यांच्यावर दूर अंतरावरून हल्ला करण्यासाठी केला जातो. याची मारक क्षमता ८.९ km पर्यंत आहे. शत्रूच्या पाणबुड्या आणि युद्धनौकांवर हल्ला करण्यासाठी टॉर्पेडो प्रक्षेपित करणारी प्रणाली आहे. पाणबुडी विरोधी कारवायांसाठी वापरली जाणारी RBU-6000 केट लाँचर्स रॉकेट प्रणाली आहे. या दोन्ही प्रणाली लार्सन आणि टुब्रो कंपनीने तयार केली आहे. कवच चॅफ लाँचर्स (Kavach Chaff Launchers) ही शत्रूच्या क्षेपणास्त्रांना दिशाभूल करण्यासाठी वापरली जाणारी प्रतिकारक प्रणाली आहे. ही प्रणाली आयुध कारखाना अंबरनाथ यांनी विकसित केली आहे.
तेथून आम्ही हेलिकॉप्टर उतरण्याची जागा म्हणजे हेलिपॅड कडे निघालो. ज्याला शास्त्रीय भाषेत हेलिकॉप्टर डेक (Helicopter Deck) म्हणतात. या डेकचा वापर हेलिकॉप्टर लँडिंग आणि टेक-ऑफसाठी होतो. तसेच पाणबुडी शोध मोहिमा आणि समुद्रातील बचाव कार्यासाठीही याचा उपयोग केला जातो. तसेच सामान आणि कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठीही याचा उपयोग होतो. त्याच बाजूला हेलिकॉप्टरचे हंगर सुद्धा आहे. मोकळ्या वेळात त्या ठिकाणी नौसैनिक नेट लाऊन वॉलीबॉल आणि इतर खेळ खेळतात.
शब्द/Long Form
FOSM – Flag Officer Submarines
SONAR – Sound Navigation and Ranging
आयएनएस – INS – Indian Naval Ship
ASW – Anti-Submarine Warfare अँटी-सबमरीन वॉरफेअर
भा. नौ. पो. – भारतीय नौसेना पोत
GRSE – Garden Reach Shipbuilders & Engineers Ltd
DND – Directorate of Naval Design
Views: 39

