कविता : वटवृक्ष…

वटवृक्ष माझे कसे काय हो झाकोळले
पांडुरंगी मनी चित्त कसे काय हो मावळले

बाबांचे शब्द ऐकण्यास कान फार तरसले
विठ्ठल मनी रमणारे मन कसे हो कोमेजले

विठ्ठला, तुझे अभंग लिहिणे का बरे थांबविले
भावनांचा बांध फुटला तुझे शब्द नाही गरजले

आकाशात क्षितिजावर प्राण का नाही रेंगाळले
अश्रुंचा पूर पण पावसाचे ढग का नाही बरसले

का देवा? विठ्ठलदास बरें कधीच नाही उमगले
विठ्ठला आमचे दुःख का कधीच नाही जाणवले

देवा, तुझे प्रसाद रुपी शब्द का नाही सापडले
शर्थीचे प्रयत्न करून सुद्धा वटवृक्ष माझे हरवले

Views: 211

Leave a Reply