लेख – “देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी।तेणें मुक्ति चारी साधियेल्या॥”

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या अमृतवाणी ने पावन झालेल्या हरिपाठा मधील हा पहिलाच अभंग आहे. माऊलीचे गुणगान करताना शब्द आणि भावना कमी पडतील. माऊली म्हटले की अंत:करणातील उत्तुंग चांगले भाव उचंबळून येतात. माऊली आपले अंत:करण व्यापून टाकतात. हरिपाठाचा हा अभंग मला अतिशय आवडतो पण पहिल्यांदा मला कोडे पडले होते की मंदिराच्या फक्त दारात उभे राहिले तरी तुम्हाला मुक्ती भेटते. आपण मंदिरात दर्शन करून आल्यावर मंदिरात बसतो. पण त्यामुळे प्रत्येकाचे कल्याण होईलच असे नाही. पण आपण मंदिरात इतक्यांदा जाऊन आपल्या किंवा कोणालाही मुक्ती मिळत नाही हा प्रश्न मला कित्येकदा पडला होता. कारण आपण वरवर विचार करतो. या अभंगाचा काय किंवा कोणत्याही अभंगाचा ऊहापोह करण्याचा आपल्याला अधिकार आणि प्रयोजन नाही. पण आपल्या परीने अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न करू शकतो.

लेख – “देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी।तेणें मुक्ति चारी साधियेल्या॥” Read More »