ब्लॉग : लेख – विषय कट

असे म्हणतात दर १२ कोसाला भाषा बदलते. शब्दाचे काय आहे पावसाचे पाणी जसे जमिनीत मुरते तसे शब्द आप-आपल्या भाषेत मुरतात. कधी एखाद्या शब्दाने माणसाला वजन प्राप्त होते तर कोणाच्या बाणेदार बोलण्याने शब्दाला धार चढते. शब्दाची श्रीमंती तुमच्या भारदस्त उच्चारात नसून शब्दाच्या आपलेपणात आहे. एखादा विशिष्ट शब्द एखाद्या माणसाची ओळख सुद्धा होऊ शकते.

मी “फास्टर फेणे” परिक्षण या संदर्भात बोलताना चर्चेतून मी बोलता-बोलता सांगीतले की फास्टर फेणे चित्रपट प्रसिद्ध होणार तेव्हा विषय कट. पण नंतर मा‍झ्या लक्ष्यात आले की “विषय कट” हा काही माझा स्वत:चा शब्द नाही. मग लक्ष्यात आले हा शब्द तर मा‍झ्या मित्राचा आवडता शब्द आहे आणि त्याचा कडून मा‍झ्या कडे आला आहे.

ब्लॉग : लेख – विषय कट Read More »