माझा मित्र अनिकेत सतत त्याचा बोलण्यात ‘विषय कट’ हा शब्द येतो. कोणत्याही विषयावर चर्चा झाल्यावर किंवा निर्णय झाला की तो बोलतो हे असे-असे ठरले आहे तर विषय कट. दिवसातून असे ८-१० ‘विषय कट’ तर त्याचा बोलण्यातून होतातच. त्याचा वाक्यात ‘विषय कट’ हा शब्द एका विशिष्ट हेल मध्ये ठासून म्हटला जातो.
“दिमाग खराब” हा एका माझ्या एका नागपूरी मित्राचा आवडता शब्द आहे. माझा मित्र अभिजीत नागपूरचा आहे त्या सोबत कट्टा वर बोलत असताना जाणवले. त्याचा जिभेवर २-३ शब्द हमखास असतात. त्यातला एक म्हणजे “कल्ला”. हा त्याचा ट्रेड मार्क शब्द आहे. मित्र बोलत असताना किंवा गोंधळ करत असतील आणि तो बाहेरून आला तर त्याचे वाक्य म्हणजे काय ‘कल्ला’ करताय? तो दिवसातून एवढ्या वेळेस कल्ला शब्दाचा उपयोग करतो त्याचे नावच आम्ही “कल्ला” असे ठेवले आहे. त्याचा दुसरा वाक्य “तुला वाटते सगळी गंमत”. बऱ्याच वेळेस तो हे वाक्य बोलण्याच्या शेवटी जोडून टाकतो. जसे की “भागवत हे सगळे असे आहे आणि तुला वाटते सगळी गंमत.” हा अश्याच भरपूर गंमती-जंम्मती करत असतो. त्याचे ट्रेड मार्क शब्द/वाक्य तो वेगवेगळ्या हेल मध्ये अचूक म्हणतो.
माझी हिंदी म्हणजे वेली सारखी आहे. तिचा पाया मराठी असून ती कुठेही वळवावी तिकडे वळते. कधी हिंदी मधील शब्द सापडला नाही तर बिनदिक्कत मराठीचा शब्द उचलून तिथे फिट्ट बसवतो. तर काही वर्षा खाली माझा नकळत ट्रेड मार्क शब्द हिंदी शब्द “ऐसा क्या?” असा होता. मी काहीही झाले तरी माझे ठरलेले बोलायचो ‘ऐसा क्या?’ मी खूप वेळेस पुनरावृत्ती करत असे. काही दिवसांनी माझे काही मित्र मला ‘ऐसा क्या?’ एका विशिष्ट आवाजात चिडवायला लागले.
माझ्या मित्राला गणेशला “कडक”, “एक नंबर” हे शब्द वापरायची खूप सवय आहे. एखाद्या गोष्ट त्याचा भाषेत “कडक” म्हणजे खूप चांगली किंवा मस्त असते. चांगली पोस्ट दिसली की त्याची टिप्पणी आली समजा. त्याने हे दोन शब्द सामाजिक माध्यमात इतक्या वेळेस वापरले की मी स्वत: या शब्दाचा उपयोग कधी पासून करतोय हेच मला कळले नाही. तेव्हा या ब्लॉग वर प्रतिक्रिया देताना या शब्दाचा तुम्ही उपयोग करू शकतो. मी सामाजिक माध्यमा मध्ये ‘भारी’,’लई भारी’, ‘कडक’, ‘एक नंबर’ या शब्दाचा प्रयोग जास्त करतो.
एखादा विशिष्ट शब्द एखाद्या प्रदेशाचा असू शकतो. मी पुण्यात नवीन आलो होतो आणि मित्राच्या खोली वर उतरलो होतो. रात्री आम्ही जेवण करून भांडी तशीच बेसीन मध्ये ठेवली होती दुसर्या दिवशी मावशी स्वयंपाक करण्यासाठी आल्या आणि पसारा पाहून “राडा” शब्द त्याचा मुखातून आला. राडा शब्द पहिल्यांदाच ऐकला होता. पुण्याच्या पेपर मध्ये वाचायचो “गुंडांनी या परिसरात राडा केला” पण इथे पहिल्यांदा ‘राडा’ शब्द आला होता. मग हा सुद्धा शब्द माझ्या बोलण्यात येऊ लागला.
माझ्या मावशीचे आवडते शब्द “जागडगुत्ता” आणि “बंगालचा बाजार” असे होते. काही मोठी समस्या उत्पन्न झाल्यास आणि फक्त चर्चेत प्रश्नाची भेंडोळीच उरली असतील तर मावशी म्हणायची काय ‘जागडगुत्ता’ करून ठेवलाय. आधी या दोन शब्दावरून आम्ही मावशीला चिडवायचो. मावशी आज नाही पण आजही ‘जागडगुत्ता’ शब्द कोणी उचारल्यास मावशीची आठवण येते.
Views: 38
mast re bhagwat
Thanks Amod!!!
nice bhagwat !!!
Thanks Girija!!!
Good observation skills
Ek number 🙂
धन्यवाद प्रतिभा!!!
धन्यवाद Ashraf!! 🙂
लई भारी, बलशेटवार साहेब!! 🙂
Jhakas
@अमोल कोकणे धन्यवाद!!!
@Vilochan Muley धन्यवाद!!!
Sahi… chan lekh
धन्यवाद
Badhiyaa!
धन्यवाद मंदार!!!