महेश मंदिर यात्रा २०१७ – शिरूर ताजबंद

महादेव मंदिर शिरूर ताजबंद

सप्ताहाचा शेवटच्या दिवसाची प्रसन्न सुरुवात काकडा भजनं झाल्यानंतर “याती कुळ माझे गेले हरपुनी । श्रीरंगा वाचून अणू नेणे॥” या गवळणीने झाली.

११ वाजता काल्याचे किर्तन ह. भ. प मोहन महाराज खुर्दळीकर यांनी पुढील अभंगावर केले.

उपजोनिय पुढती येऊ । काला खाऊ दही भात!!१!!
वैकुंठी तो असे नाही । कवळ काही काल्याचे!!ध्रु!!
एकमेका देऊ मुखी । सुखी घालु हुंबरी!!२!!
तुका म्हणे वाळवंट । बरवें नीट उत्तम!!३!!

“काला म्हणजे जीव ब्रह्माचे ऐक्य. काला स्वर्गात सुद्धा भेटत नाही. आम्ही परत-परत काला खाण्यासाठी येऊ आणि पंढरपुरात वाळवंटात एकमेका सोबत काला खाऊन आनंदाने नाचू.” असा अभंगाचा अर्थ वडीलांनी सांगीतला आहे.

महादेव मंदिर यात्रा कधी पासून सुरू झाली याची कुठेही नोंद नाही. शिरूर ताजबंद येथे १९५४ या साली माधवराव गुरुजी, अहमदपूरकर यांनी यात्रेच्या काळात सप्ताह करायला सुरूवात केली. यात्रेचे वेध गुढीपाडव्या वेळेस लागतात. यात्रा सप्ताह दर वर्षी चैत्र महिन्याच्या षष्ठीला सुरू होतो. त्रयोदशीला सप्ताहाचा शेवट असतो. बहुतेक मार्च किंवा एप्रिल च्या दरम्यान वेळ असते. ५ वाड्या आणि सहावे शिरूर या गावातील मंडळी कार्य पार पाडतात. गावातील विविध

महेश मंदिर यात्रा २०१७ – शिरूर ताजबंद Read More »