पर्ण पेठे ऊर्फ अबोली हिचे पात्र शैक्षणिक गुन्हे रिपोर्टर ठीक ठाक आहे. प्रवेश चांगला दमदार आहे. पण तिला अभिनयासाठी विशेष मेहनत घ्यावी लागेल. बनेश आणि अप्पा यांच्या पुढे तिचा प्रभाव पडत नाही. तिची मुख्य भूमिका नसून सहायक भूमिका आहे. विशेष म्हणजे चित्रपटात एकही गाणे नाही. त्यामुळे चित्रपट वेळेत संपतो.
अप्पा ऊर्फ गिरीश कुलकर्णीचा जबरदस्त फॉर्म चित्रपटाला लाभलाय. मराठीत नवीन दमदार खलनायक आलाय. पूर्ण चित्रपट तो अभिनयाने तो खाऊन टाकतो. खुंटलेली दाढी, खुनशी नजर, वागण्यात बेफिकीर, तितकाच कावेबाज, आणि बेरकी मस्त रंगवलाय. त्याचे वन लायनर जबरदस्त आहेत. त्याची संवाद फेक मस्त आणि थेट आहे. त्याचा प्रत्येक वाईट कामासाठी एखादी लहान कथा तयार असते. त्याचे काही संवाद डार्क नाईट मधल्या जोकरची पुसटशी आठवण करून देतात. अप्पाचा एक संवाद “ज्याला आपली किमत माहीत नसते एक तर तो मूर्ख असतो किंवा अतिशहाणा” बेरकी भाषेत म्हणतो तो मस्त जमलाय. अप्पा आणि फाफे यांच्यातील संवाद बघायला मजा येते.
चित्रपटाच्या सकारात्मक बाजू
उत्तम छायाचित्रण दमदार अभिनय कडक पार्श्वसंगीत वेगवान कथानक
चित्रपटाच्या कमकुवत बाजू
Views: 251


Pingback: अद्वितीय अनुभव... - ब्लॉग : लेख : चित्रपट पार्श्वसंगीत (Back Ground Music)