#ब्लॉग: ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर एक अविस्मरणीय दिवस
## दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजे स्वप्नांची दुनिया…
गोरेगाव पूर्वेला असलेली दादासाहेब फाळके चित्रनगरी अर्थात Film City ही भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन विश्वातील महत्त्वाची जागा आहे. महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीतील या चित्रनगरीमध्ये विविध चित्रपट, मालिका, जाहिराती आणि रिअॅलिटी शोचे चित्रीकरण केले जाते. अधिकृत माहितीनुसार Film City मध्ये अनेक outdoor locations आणि studios उपलब्ध आहेत. Film City मध्ये प्रवेश केल्यानंतरच वातावरण बदलल्यासारखे वाटते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चित्रीकरणासाठी वापरली जाणारी ठिकाणे, स्टुडिओ, सेट्स आणि तांत्रिक कामांची लगबग पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. आपण ज्या गोष्टी टेलिव्हिजनच्या पडद्यावर पाहतो, त्या तयार करण्यासाठी पडद्यामागे खूप माणसे काम करत असतात!
## KBC च्या सेटच्या दिशेने…
त्यात जवळपास १.५ तास आमचे रजिस्ट्रेशन सुरू होते. एवढी कडक चाचणी बघून आमचा नंबर लागेल की नाही याची शाश्वती होत नव्हती. पण त्यामुळे मी माझ्या संपर्कातील संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला. आवश्यक माहिती मिळाल्यानंतर मात्र सुटकेचा निःश्वास टाकला. गुगल फॉर्म भरून, नाव पडताळणी करून, आणि शेवटी प्रतीक्षा कक्षात पोहोचलो. तिथे प्राईम फोकस निर्मिती संस्थाचे कर्मचारी आम्हा सर्वांना KBC बद्दल मार्गदर्शन करत होते. एनर्जी ठेवा, स्मितहास्य द्या. रिऍक्शन द्या. विकट हसू नका. बिग बींच्या आगमनावेळी टाळ्यांचा कडकडाट करा. तो आम्हाला आवश्यक सूचना देत होता आणि त्याचबरोबर थोडी मस्ती व विनोद करून वातावरणही हलकेफुलके ठेवत होता.
##आणि मग झाली बिग बींची एन्ट्री!
## Fastest Buzzer First आणि हॉट सीटचा थरार
आल्याबरोबर त्यांनी ‘Fastest Buzzer First’ ची परीक्षा घेतली. दहा स्पर्धकांमधून आजमगढ येथील ४५ वर्षीय मुख्याध्यापिका पद्मिनी राय यांनी सर्वात कमी वेळेत अचूक उत्तर देत त्या दिवसातील हॉट सीटवर बसण्याचा पहिला मान पटकावला. त्यांना चहाची अतिशय आवड आहे. त्या दिवसातून ७-८ वेळेस चहा घेतात असे सांगितले. त्यांनी ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ या गाण्यावर ‘ऑडियन्स पोल’ ही लाइफ लाइन निवडली. याचे अचूक उत्तर मला माहिती होते आणि मी आणि इतर ८४% प्रेक्षकांनी प्रश्नाचे उत्तर देऊन पद्मिनी राय यांना योग्य उत्तर सुचवले आणि याचा उपयोग करून त्यांनी पुढे मजल मारली. अमिताभ सरांनी आपल्या लहानपणी शिक्षकांकडून कसा मार खाल्ला, याचे मजेशीर किस्से सांगितले. आपल्या नर्म विनोदी शैलीने सगळ्यांना हसवले.
पद्मिनी राय यांनी ‘Super Sandook’ मध्ये १० पैकी ७ प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन एक नवीन लाइफलाइन जिंकली. अकराव्या प्रश्नाचे योग्य उत्तर दिल्यास ७,५०,००० पर्यंत पोहोचल्या. पण बाराव्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे ठरल्याने खेळातील नियमानुसार ७,५०,००० ऐवजी ५ लाख रुपये घेऊन खेळातून बाहेर पडल्या. त्यानंतर कृष्ण लाल कुमावत यांनी Fastest Buzzer First चा राऊंड जिंकला. आणि त्यांनी आपली संघर्षपूर्ण जीवन कथा थोडक्यात सांगितली. त्यांनी वडिलोपार्जित व्यवसाय स्वीकारला होता. त्यांनी सहजपणे २५,००० रुपया पर्यंत मजल मारली.
## चार तासांचे चित्रीकरण आणि पडद्यामागची मेहनत
##अविस्मरणीय दिवसाची आठवण
KBC चा सेट प्रत्यक्ष पाहताना आणखी एक गोष्ट जाणवली—टीव्हीवर कार्यक्रम काही मिनिटांचा किंवा एका भागाचा दिसत असला तरी त्यामागे असंख्य लोकांची मेहनत असते. कॅमेरा टीम, लाईटिंग, साउंड, मेकअप, सेट डिझाइन, तांत्रिक कर्मचारी, प्रेक्षक व्यवस्थापन आणि संपूर्ण प्रॉडक्शन टीम मिळून हा अनुभव तयार करत असतात. आपण पडद्यावर फक्त कार्यक्रम पाहतो; पण स्टुडिओमध्ये गेल्यावर त्या कार्यक्रमामागची खरी मेहनत दिसते. चार तासांचे चित्रीकरण कधी संपले, हेच कळले नाही. टेलिव्हिजनवर अनेक वर्षे पाहिलेला KBC चा मंच, हॉट सीट, प्रकाशझोत, कॅमेरे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे साक्षात अमिताभ बच्चन—हे सर्व प्रत्यक्ष अनुभवण्याचा योग आयुष्यात क्वचितच येतो. पुण्याहून मुंबईपर्यंतचा हा प्रवास केवळ काही किलोमीटरचा नव्हता. तो मला टेलिव्हिजनच्या पडद्यामागच्या एका वेगळ्याच जगात घेऊन गेला. त्या दिवशी मी केवळ ‘कौन बनेगा करोडपती’चा प्रेक्षक नव्हतो; तर त्या कार्यक्रमाच्या निर्मितीचा, त्या उत्साहाचा आणि त्या अविस्मरणीय वातावरणाचा प्रत्यक्ष साक्षीदार होतो. स्टुडिओमधून बाहेर पडताना मनात एकच विचार होता—
काही प्रवास संपतात… पण काही प्रवास आयुष्यभरासाठी आठवणी बनून राहतात. पुणे ते मुंबईचा हा प्रवास माझ्यासाठी असाच एक प्रवास होता—अविस्मरणीय!
KBC चा १९ ऑगस्ट २०२६ रोजी चित्रित केलेला भाग ३१ ऑगस्ट २६ रोजी रात्री ९ वाजता सोनी या टीव्ही चॅनल वर प्रसारित झाला आहे.
Views: 7

