ब्लॉग : लेख : भारतीय नौसेना – धैर्य आणि शौर्य

लेख

खवळलेल्या बिसकेच्या उपसागरात, ३० फुटी लाटांशी झुंज देत एक भारतीय पाणबुडी पुढे- पुढे सरकत होती. आत जखमी सहकारी, बाहेर प्रचंड वादळ. पण निर्धारित प्रवासाचं मिशन सुरूच होतं. त्यात दोन अधिकारी प्रचंड वेदना सहन करत प्रवास करत होते. सगळ्यांना एकच भीती होती की त्यांना 12 दिवसाचा प्रवास सहन होईल का? पण सहनशक्तीची परीक्षा त्यांनी NDA असतानाच दिली होती. भारतीय नौसेनेचे ब्रीदवाक्य “शं नो वरुणः” आहे. National Defense Academy (NDA) हे भारतातील तिन्ही सैन्यदलांचे संयुक्त प्रशिक्षण देणारी प्रतिष्ठित अकॅडमी आहे. एनडीएचे ब्रीदवाक्य “सेवा परमो धर्मः” आहे. भारतीय नौसेनेचा प्रत्येक अधिकारी आणि जवान प्राणाची बाजी लावून देश सेवा आणि त्याबरोबर देशाची सुरक्षा करत असतात. सैनिकांचे कार्य त्यांच्या कृतीतून आणि सेवा भावातून स्पष्टपणे दिसून येते. एनडीए त्यांच्या कडून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत स्वत:ला सावरण्याची क्षमता निर्माण करून घेते. अतिशय कठीण आणि आणीबाणीच्या प्रसंगात परिस्थितीवर मात करून निर्णय आणि नेतृत्व करण्याची क्षमता तयार होते ती खडतर अशा एनडीए च्या प्रशिक्षणा मुळेच. एनडीएच्या मूल्यांवर घडलेला प्रत्येक नौसैनिक केवळ सैनिक नसतो, तर तो संकट काळात दृढ निश्चयी, शांत राहणारा, निर्णयक्षम आणि देशासाठी सर्वस्व अर्पण करणारा योद्धा असतो. २००१ साली रशिया मध्ये विकसित झालेल्या सिंधुघोष-श्रेणी (किलो-श्रेणी) पाणबुड्या कार्यरत होत्या.  किलो-श्रेणीतील पाणबुड्या भारतीय नौदलातील शक्तिशाली डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्या आहेत. या रशियात तयार करण्यात आल्या आहेत आणि १९८७ ते २००० पर्यंत जवळपास १० पाणबुड्या भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. सिंधुघोष (Kilo-class) प्रकारातील पाणबुड्या भारताच्या सागरी सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. या पाणबुड्याची लांबी सुमारे ७२.६ मीटर असून त्यांचे प्रत्येकी पाण्यावरील वजन सुमारे २३०० टन आणि पाण्याखालील वजन ३००० टन आहे. या पाणबुड्या पाण्याखाली जवळपास १९ नॉट्स म्हणजे ३५.१८ किमी/तास वेगाने प्रवास करू शकतात आणि साधारण ४५ दिवस समुद्रात कार्यरत राहू शकतात.

ब्लॉग : लेख : भारतीय नौसेना – धैर्य आणि शौर्य Read More »