मन जसे ओहळाच पाणी
दंवबिंदू फुलावर पडल्या वाणीमिसळणे माझा गुणधर्म
तृष्णा भागवणे पुण्यकर्ममी एकरूप निसर्गाशी
इमान मात्र स्वःधर्माशीना पाप पुण्याची भाषा
निखळ प्रवाही हीच आशारमतो स्वत:त, ना जगाची फिकीर
घेतो साठवून दुखांना जसा फकीरमाझ जगणे प्रवाही माझ रूप प्रवाही
प्रवास अति दूरवर राहतो प्रवाहीपुढे मी घेतो नदीचा आकार
स्वः प्रवाहावर सगळी मदारमी जोडतो समुद्राशी नातेजसे गीत झऱ्याचे नदी गातेझरा, नदी, समुद्र सगळी माझीच रूपजश्या मनातील जपलेल्या आठवणी खूप
Views: 38