मोबाईल फोटोग्राफी
Views: 128
“युद्धस्य कथा रम्य:” अशी म्हण आहे. युद्धाच्या गोष्टी ऐकावयास फार गोड वाटतात. आणि त्या सोबत एक प्रेम कथा दाखवलेली असेल तर या दोन्हीच्या खास संयोगातून एक प्रकारचे उत्तम समीकरण तयार होते. ऐतिहासिक प्रेम कथा या प्रकारातील चित्रपट आहे. पत्र पाठवणे सुद्धा एक कला आहे. जुन्या काळी पत्र पाठवणे विचारपूस करण्याचे साधन होते. त्यात भावनेने ओथंबलेले, परिस्थितीची जाणीव करून देणारे, मनस्थितीचे सुरेख वर्णन असल्यास काय बघायचे. आपल्या प्रिय आणि आप्त जणांना विचारपूस करता येत होती आणि ती पत्र जतन करून ठेवल्यास त्याच्या सुरेख आणि सुंदर आठवणी आयुष्य भरा साठी पुरतात. याच पत्राचा सुरेख वापर या चित्रपटात केला आहे.
ब्लॉग : चित्रपट परिक्षण – Leo (लिओ) – LCUचा जॉन विक – स्पॉइलर अलर्ट Read More »
कविता: सखी
सखे तुझ्या मधाळ वाणीने न बोलणारा बोलू लागलो
तुझ्या साध्या बोलण्यावर सुद्धा खुदकन हसू लागलो
तुझ्या आनंदात मी आनंद शोधत प्रसन्न राहू लागलो
दु:खाचे काय घेऊन बसलीस वेडे तुझे दु:ख जगू लागलो
जुनी खपली काढू नको सुखाचा मुलामा चढवू लागलो
सुखी सह-जीवनाची स्वप्न मी आत्ता मस्त रंगवू लागलो
भूतकाळ असो किती ही कठोर तरी घर आता सजवू लागलो
तू कधी येशील जीवनात तीच वाट फक्त पाहू लागलो
येण्याने उजळेल आयुष्य, छोटे-छोटे प्रसंग खुलवू लागलो
एकत्र येण्यासाठी असतील आव्हाने त्या विरुद्ध लढू लागलो
अडचणींना लढू साथीने, त्यासाठी पुन्हा तयारी करू लागलो
सखी करू नको काळजी फक्त देवावर श्रद्धा ठेवू लागलो
नवा श्वास नवा ध्यास आभाळा पर्यंत दृष्टी फेरु लागलो
तुझी साथ असेल तर प्रेमात परत बहरू लागलो
तू फक्त-फक्त हो म्हण, आनंदी पक्ष्या प्रमाणे उडू लागलो
देशील साथ? होकार दे, पुन्हा प्रेमाचे बंध विणू लागलो
कविता : चल सखे
चल सखे बनवू आपले सुंदर घर
जसे चिमणी करते खटाटोप दिनभर
एक-एक वीट लावू समजुतीच्या जपून
दिन रात्र मेहनत करू एकमेकांना समजून
मनसोक्त हास्य, प्रचंड मस्ती, किंचित आदर
ठेवू जाणीव, ठेवू मान, करू एकमेकांची फक्त कदर
पडतील थोडे कष्ट सोडावे लागतील मोहाचे क्षण
कस लागेल नात्याचा मात्र सापडतील मोत्याचे कण
एकएक पै जमा करून घर सजवू अतिशय मस्त
पाहुणचारात पाठवू नको अतिथीला रिक्त हस्त
कधी भांडू कधी लढू कधी परिस्थितीचा अतिरेक
येतील अडचणी फार विश्वास हीच जगण्याची मेख
घडाभर संवेदना, संपूर्ण साथ, परिपूर्ण स्वातंत्र्य यांचे मिश्रण
जोडीदाराची प्रगती साधायला लागणार नाहीत जास्त परिश्रम
आनंद, दु:ख, सण, क्षण, जाणिवांना करू एकत्र साजरे
तू कर थोडे नखरे आपण जगू क्षण करून मन हसरे
फोटोग्राफी : परिसरातील फुलपाखरू – भाग ४
Butterfly Photography Part 4
फोटोग्राफी : फुलपाखरू – भाग ४ Read More »
आईची लाडकी… लाडकी माझी हॉस्टेल ला राहणार आहेअश्रूंचा बांध आता कसा थांबणार आहेक्षणोक्षणी तुझी आठवणं काढणार आहेव्याकुळ हृदय विरह कसा सोसणार आहे बाहेरच्या जगात तुझे पाऊलआता पडणार आहेरुसून फुगणे, अनं हसणे कोणाला जमणार आहेसारखा-सारखा हट्ट आत्ता कोण करणार आहेघरातील तुझी जागा आता कोण भरणार आहे तुझी प्रगती मी प्रसन्न होऊन पुन्हा बघणार आहेहॉस्टेलला राहतेस तरी
कविता : आईची लाडकी… Read More »
व्यक्ती विशेष – जागतिक महिला दिन
8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा झाला. आपल्या आजूबाजूला स्त्री विविध रुपात आपल्याला भेटत असते. प्रत्येकात माणसाला चांगुलपणाचा सुवास येत असतो. प्रत्येकात घेण्या सारखा एक तरी चांगला गुण असतो. त्या व्यक्तीच्या संपर्कात आल्या नंतर आपल्याला त्या व्यक्तीची माहिती कळते. तर अश्या अनेक माणसाच्या गराड्यात आपण आपल्याला लागणारे गुण दुसर्याकडून घ्यायचे असतात. स्त्री एकाच वेळेस असंख्य पात्र साकारत असते. कधी ती बहीण, वहिनी, मैत्रिण, डॉक्टर, मार्गदर्शक, गुरू, कधी आई तर कधी शिक्षिका असते. प्रत्येक महिलांचा आपल्यावर प्रभाव पडत असतो. मी माझ्या परिवारातील स्त्रियांना जागतिक महिला दिना निमित्त शब्दरूपी अभिवादन करणार आहे.
द्वितीय पुष्प – गीता ताई
ताई या शब्दातच आई हा शब्द उच्चारला जातो. आणि माझी ताई म्हणजे प्रेम आणि माया यांचे मूर्तिमंत रूप. तिच्या बोलण्यात जिव्हाळा तर ओथंबून वाहत राहतो. मी ताईशी कोणत्याही विषयावर बोलू शकतो. लहानपणी मी आणि ताई नवीन घराच्या बांधकामा वर पाणी टाकण्यासाठी जात असू. त्या सोबत कामगारांना चहा सुद्धा नेत असू त्या वेळे पासून मी ताईचे अनुकरण करतो. भिंतींना पाणी कसे टाकावे इथून सर्व ताईचे बघून शिकलो. पण तिने कधी शिकवणीची फी घेतली नाही हा! लहानपणी शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर ताईचे सर्व पुस्तके मला भेटत. आमचे काका प्रत्येक पुस्तकाला पुठ्ठा लावायचा हे शिकवायचे. पुस्तके एक वर्ष जुनी असली तरी ही व्यवस्थित वापरल्या मुळे नवीन असल्या सारखी वाटायची. ताईने टापटीप हा गुण लहानपणा पासूनच जोपासलाय. बोलक्या स्वभावामुळे ताईचे शाळेत आणि पुढे कॉलेज मध्ये मित्र-मैत्रिणी खूप होत्या. आम्ही एकदा चाकूरला यूथ फेस्टिव्हल सुद्धा गेलो होतो. तिला वाचनाची खूपच गोडी असल्याने मी सुद्धा वाचनालयात जाऊन पुस्तके वाचायला लागलो. माझ्यातील अनेक चांगल्या सवयी आणि पुस्तका बद्दल रूची ताई मुळे निर्माण झाली. तिने माझ्या चांगल्या वाईट काळात, कडू गोड प्रसंगात कणखर राहून साथ दिली आहे आणि मार्गदर्शक केले आहे. लिखाणात सतत प्रोत्साहन दिले. ताई पत्नी, आई, बहीण, सून, मैत्रिण, आणि वहिनी अश्या सर्व जबाबदार्या मन:पूर्वक पार पडत असते. ती स्वत:हून कधी फोन करणार नाही पण योग्य वेळी तिचा पहिला फोन येतो. सगळ्यांच्या अडचणी सोडवण्यात अतिशय पटाईत आहे. कुशाग्र बुद्धी आणि परिस्थिती मुळे निर्माण झालेला संयम याचा उपयोग करून जीवनात पुढे मार्गक्रमण करते आहे. जगावेगळे निर्णय घ्यायला ताई मागे पुढे पाहत नाही. तिरुपती बालाजी इथे पूर्ण केस दान करण्याचा निर्णय सुद्धा असाच जगावेगळा होता. पूर्ण केस काढल्यावर एक वेगळंच तेज दिसत होतं चेहर्यावर. मुलं महत्त्वाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेला असताना उगाच वर्षभर टेन्शन न घेता, अति अपेक्षा न ठेवता सर्व प्रयत्न करणारी आई ही वेगळीच भासली. लहानपणा पासून एकत्र असल्याने ताई वर आणखी लिहिता येईल पण सध्या तरी संक्षिप्त लिहिले आहे. एकच तक्रार आहे ताई लेखन, चारोळी चांगली करत असताना सुद्धा जास्त काही लिहित नाही.
अश्या माझ्या कणखर, संयमी, आणि मार्गदर्शक बहिणीला 8 मार्च जागतिक महिला दिन निमित्ताने द्वितीय पुष्प देऊन अभिवादन करतो!!!
ब्लॉग – व्यक्तीविशेष – जागतिक महिला दिन Read More »
फोटोग्राफी : भिगवण आणि मयूरेश्वर अभयारण्य
फोटोग्राफी : भिगवण आणि मयूरेश्वर अभयारण्य Read More »
भगवान श्रीकृष्णाला पूर्ण अवतार म्हणतात. खरे तर भगवान श्रीकृष्णाचे देवत्व आणि पूर्ण अवतार हा विचार बाजूला ठेवून थोडा वेळ त्यांच्या मानवी आयुष्याचे अवलोकन केले तर खूप काही गोष्टी लक्षात येतील आणि त्यातून भरपूर आत्मसात करण्या सारखे आहे. भगवान श्रीकृष्णाचे जीवन अथांग समुद्रा सारखे आहे त्यातून आपल्या अल्पमतीला कळेल किंवा हातात जितके पाणी मावेल तितके घेऊन आपले जीवन कसे समृद्ध करता येईल हे पाहणे संयुक्तिक ठरेल.
भगवान श्रीकृष्णाच्या मानवी आयुष्यात खूप चढ उतार आहेत. भावनांचे खूपच सखोल कंगोरे, कठीण परिस्थिती, आणि बुद्धिमत्ता, चातुर्य, अभ्यास, लीला आणि त्यातून होणारे मानवी नात्याचे प्रगटीकरण, आणि मानवी मनाचे विविध पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वात ठळक दिसतात. त्यांचे मानवी आयुष्य विविध रंगांनी आणि विविध अंगांनी परिपूर्ण भरलेले आहे. भगवान श्रीकृष्णाला मानवी रुपात अतिशय कठोर परिस्थितीचा सामना करावा लागला.
भगवान श्रीकृष्णानां बासरी वादन, पीतांबर (वस्त्र), लोणी अतिशय प्रिय आहे. जन्म घेतल्या बरोबर आई वडीलांना दूर राहावे लागले. जिथे ते लहानाचे मोठे झाले. खेळले, राक्षसाचा विनाश केला. रासलीला केली. लोणी खाल्ले. गुरांची देखभाल केली. काही वर्षा साठी त्यांना गोकुळ सोडून वृंदावनात जावे लागले. श्रीकृष्ण आणि राधेचे प्रेम तर सर्वश्रुत आहे. पण त्या राधेला आणि असंख्य प्रियजणांना वृंदावन सोडून त्यांना मथुरा नगरीत जावे लागले होते. यशोदा माता आणि नंदबाबा, सवंगडी, आणि गोपिका या सगळ्यांचा त्याग केला होता. यशोदा माताने ममतेने पालन पोषण केल्या नंतर सुद्धा सोडून जावे लागले. त्यांनी उद्धवाला वृंदावनात पाठवले पण ते स्वत: परत कधीच वृंदावनात गेले नाहीत. असे सांगतात की वृंदावन सोडल्यावर त्यांनी कधीच बासरी वादन केले नाही आणि त्यांनी बासरीचा सुद्धा त्याग करून राधेला देऊन टाकली. वृंदावन सोडल्यावर त्यांनी कधीच लोणी चोरली नाही की खाल्ली सुद्धा नाही.
ब्लॉग – लेख – “सोडून द्या” Read More »