गझल – थांबले नाही कुणी…

कविता

मराठी गझल वृत्त – कालगंगा/ देवप्रिया
लगावली : गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा
मात्रा: २ १ २ २ २ १ २ २ २ १ २ २ २ १ २ = २६
गझलेत काही कमतरता, चुका असल्यास नक्की सांगा. त्यांचे स्वागतच असेल.
पहिले कडवे श्री.भूषण कटककर,”बेफिकिर” यांची ओळ आहे.
 
गझल – थांबले नाही कुणी…
घातली मी साद तेव्हा थांबले नाही कुणी
चांगले आहेत सारे, आपले नाही कुणी 
 
नियती आली समोरी, संघर्ष झाला जरा
वेळही गेलीच होती, ताणले नाही कुणी
 
भूतकाळाला अता नाही कशाचे मागणे,
वर्तमानाला सुद्धा का धावले नाही कुणी
 
घाव तो होता जुना अन् वेदना होती नवी 
कोंडलेला श्वास माझा जाणले नाही कुणी 
 
काळजावर घाव घेऊनी निघालो एकटा
वादळाला झुंजलो मी मानले नाही कुणी 
 
संपली होती इच्छा माझी कधीचीं अंतरी
ठेवली जवळी व्यथा पण धावले नाही कुणी 

गझल – थांबले नाही कुणी… Read More »

कविता: पुन्हा एकदा…

कविता

मा‍झ्याच स्वप्नांना लावला मी सुरूंग संकल्प सोडला अर्धवट पुन्हा एकदा शर्थीचे प्रयत्न सत्यात आले नाहीत निश्चयाचे संपले बळ पुन्हा एकदा स्वप्नांची लचके तोडली मी स्वत: पराभवाने दिली मात पुन्हा एकदा कष्टाची घागर भरली पुन्हा संपूर्ण अपयशाचे भरले रांजण पुन्हा एकदा प्रयत्नाचा डोंगर उभारला मी स्वत:च नियतीनेच दिला घाव पुन्हा एकदा सुखांना जिंकण्याचा भास मला झाला दु:खाने केले

कविता: पुन्हा एकदा… Read More »