कविता

कविता

कविता: सखी

कविता: सखी
सखे तुझ्या मधाळ वाणीने न बोलणारा बोलू लागलो
तुझ्या साध्या बोलण्यावर सुद्धा खुदकन हसू लागलो
तुझ्या आनंदात मी आनंद शोधत प्रसन्न राहू लागलो
दु:खाचे काय घेऊन बसलीस वेडे तुझे दु:ख जगू लागलो
 
जुनी खपली काढू नको सुखाचा मुलामा चढवू लागलो
सुखी सह-जीवनाची स्वप्न मी आत्ता मस्त रंगवू लागलो
भूतकाळ असो किती ही कठोर तरी घर आता सजवू लागलो
तू कधी येशील जीवनात तीच वाट फक्त पाहू लागलो
 
येण्याने उजळेल आयुष्य, छोटे-छोटे प्रसंग खुलवू लागलो
एकत्र येण्यासाठी असतील आव्हाने त्या विरुद्ध लढू लागलो 
अडचणींना लढू साथीने, त्यासाठी पुन्हा तयारी करू लागलो 
सखी करू नको काळजी फक्त देवावर श्रद्धा ठेवू लागलो 
 
नवा श्वास नवा ध्यास आभाळा पर्यंत दृष्टी फेरु लागलो
तुझी साथ असेल तर प्रेमात परत बहरू लागलो
तू फक्त-फक्त हो म्हण, आनंदी पक्ष्या प्रमाणे उडू लागलो
देशील साथ? होकार दे, पुन्हा प्रेमाचे बंध विणू लागलो

कविता: सखी Read More »

कविता : चल सखे

कविता : चल सखे
चल सखे बनवू आपले सुंदर घर
जसे चिमणी करते खटाटोप दिनभर

एक-एक वीट लावू समजुतीच्या जपून
दिन रात्र मेहनत करू एकमेकांना समजून

मनसोक्त हास्य, प्रचंड मस्ती, किंचित आदर
ठेवू जाणीव, ठेवू मान, करू एकमेकांची फक्त कदर

पडतील थोडे कष्ट सोडावे लागतील मोहाचे क्षण
कस लागेल नात्याचा मात्र सापडतील मोत्याचे कण

एकएक पै जमा करून घर सजवू अतिशय मस्त
पाहुणचारात पाठवू नको अतिथीला रिक्त हस्त

कधी भांडू कधी लढू कधी परिस्थितीचा अतिरेक
येतील अडचणी फार विश्वास हीच जगण्याची मेख

घडाभर संवेदना, संपूर्ण साथ, परिपूर्ण स्वातंत्र्य यांचे मिश्रण
जोडीदाराची प्रगती साधायला लागणार नाहीत जास्त परिश्रम

आनंद, दु:ख, सण, क्षण, जाणिवांना करू एकत्र साजरे
तू कर थोडे नखरे आपण जगू क्षण करून मन हसरे

कविता : चल सखे Read More »

कविता : आईची लाडकी…

आईची लाडकी… लाडकी माझी हॉस्टेल ला राहणार आहेअश्रूंचा बांध आता कसा थांबणार आहेक्षणोक्षणी तुझी आठवणं काढणार आहेव्याकुळ हृदय विरह कसा सोसणार आहे बाहेरच्या जगात तुझे पाऊलआता पडणार आहेरुसून फुगणे, अनं हसणे कोणाला जमणार आहेसारखा-सारखा हट्ट आत्ता कोण करणार आहेघरातील तुझी जागा आता कोण भरणार आहे तुझी प्रगती मी प्रसन्न होऊन पुन्हा बघणार आहेहॉस्टेलला राहतेस तरी

कविता : आईची लाडकी… Read More »

कविता : संयमाची परीक्षा…

संयमाची परीक्षा… संयमानेच घेतली संयमाची परीक्षाहरला संयम राहिल्या फक्त अपेक्षा परिस्थितीनेच केला संयमाचा घातकसे करायचे परिस्थितीशी दोन हात हतबलतेने केले संयमावर अचूक वारकष्टाचा पर्वत चढल्या शिवाय नाही हार पुन्हा संकटांनी ग्रासले संयमाचा ठावआतातरी संयम करेल का भीतीवर घाव मनोबळाने वाढवले संयमाचे अपूर्व बळकेव्हा भेटणार संयम राखल्याचे फळ संयमाला लागली भीतीची परत जाणीवसंयम जिंकेल या प्रयत्नात

कविता : संयमाची परीक्षा… Read More »

निवडक चारोळी – भाग ७

आई आणि मुलगी…आईच्या नजरेत मुली साठी असते प्रचंड मायासंस्कार, संगोपनामुळे मुलगी असते तिचीच कायाकुठल्याही परिस्थितीत आई असते मुलींसाठी वटवृक्षआश्वासक सहवास मुलींसाठी असते मूर्तिमंत छाया शब्द समजेन आता…तुझ्या ओठांवर आलेला शब्द मी झेलीन आताओठांवर येऊन माघारी गेलेला शब्द समजेन आतासखी तुला दिलेला शब्द मी अक्षरशः पाळेन आताक्षणा-क्षणांत आनंद शोधून गोळा करून देईन आता सौंदर्य… अभिजात शब्द फिका पडेल असे सौंदर्यइतरांना आपलंस करणे तुझे औदार्यसखी का आहेस तू इतकी कुशाग्रबुद्धीचीसगळ्यांची आवडती यात नाही आश्चर्य

निवडक चारोळी – भाग ७ Read More »

कविता : पांडुरंग माझा

भावनांचा निचरा, स्व विचारांतून मोकळा
भक्तीचा कुंभमेळा, पांडुरंग माझा ||1||

आयुष्याचे गणित, कसा सोडवु मी एकटा
कोडे सोडवण्या आला, पांडुरंग माझा ||2||

मायबापा विठ्ठला, कधी भेटीतो या जीवाला
आस पूरवी आता, पांडुरंग माझा ||3||

वाळवंटी भक्त, कुठे कुठे शोधावे विठ्ठला
कृपा करी देवा, पांडुरंग माझा ||4||

कविता : पांडुरंग माझा Read More »

कविता: आई म्हणजे आईच असते

mother, daughter, sunset-429158.jpg

कविता: आई म्हणजे आईच असते
आई म्हणजे आई म्हणजे आईच असते
अहो असे काय करता तुमची आमची सारखीच असते
तुमचे भले करण्यात तिचा आनंद असतो
लेकरांना कमी पडू नये हाच बाणा असतो
कठीण प्रसंगी वीजे सारखी तळपत असते
कसोटीच्या काळात नदी सारखी शांत, प्रवाही असते

कडक उन्हाळ्यात सुद्धा मायेची सावली असते
नात्याच्या भवऱ्यात वाचण्याचा शेवटचा उपाय असते

दोलायमान परिस्थितीत मार्ग दाखवणारा गुरु असते
झोपून जरी असली तरी कुटुंबाचा एकसंध कणा असते

पडझडीच्या काळात बाळासाठी तर प्रयत्नांची ढाल असते
तुमच्या जटील समस्येचे उत्तर शोधण्यात हुशार असते

सगळे विरोधात असताना तिथे जगाशी लढत असते
स्व: बाजूला ठेवून पालकत्व साजरे करत असते

तुम्हाला तुमच्या पेक्ष्या जास्त ती ओळखून असते
परिस्थितीचे ऊन झेलत मुलासाठी वडाचे झाड असते

कितीही लिहिले तरी आईसाठी खूप कमीच असते
अहो असे काय करता तुमची आमची सारखीच असते

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

कविता: आई म्हणजे आईच असते Read More »