वधू – वर परिचय मेळावा

मध्यस्थीची स्थळ जमवण्यासाठी लगबग – लगबग
मुलींच्या वडीलांची मुलीसाठी तगमग – तगमग
पाहूण्याची स्थळ शोधण्यासाठी दगदग – दगदग
निमंत्रित करतात उदघाटनाने झगमग – झगमग
मुलांना परिचय देतांना वाटते धगधग – धगधग
मुलींची सुंदर दिसण्याचीे असते झटपट – झटपट
लहानाची स्नँकसाठीे आईकडे कटकट – कटकट
ऐका मागून एक स्थळ बघतात पटपट – पटपट
मुलींना प्रश्न विचारताच कापतात लटलट – लटलट
रिफ्रेश होण्यासाठी चहा पितात घटघट – घटघट
स्वप्नातला जोडीदार शोधण्यासाठी खटपट – खटपट
दोन्ही पत्रिका जुळवण्याची असते लटपट – लटपट
प्रत्येक स्थळांना प्रतिसाद देतात झटझट – झटझट
प्रवास व धावपळ यांच्यावरून होते रटरट – रटरट
ऋणानुबंधा मुळेच लग्न होतात फटफट – फटफट

Views: 32

Leave a Reply