काही नाही
काही नाही ओंजळीत माझ्या काही नाही
शब्द नाही सूर नाही संगीतात राम नाही
पाऊस नाही श्रावण नाही मनात उत्साह नाही
चंद्र नाही सूर्य नाही आकाशात इंद्रधनुष्य नाही
काही नाही
काही नाही नशीबात माझ्या काही नाही
घर नाही दार नाही आडोशाला पार नाही
आनंद नाही दु:खं नाही भावनांना थारा नाही
रंग नाही रूप नाही आयुष्यात हुरूप नाही
काही नाही
काही नाही स्वभावात माझ्या काही नाही
प्रेम नाही द्वेष नाही व्यक्तीबद्दल स्नेह नाही
हिवाळा नाही उन्हाळा नाही स्वभावात बदल नाही
माज नाही साज नाही चेहर्यावर मुखवटा नाही
Views: 62