समीक्षा

समीक्षा

खाद्यपरीक्षण – Barbeque मिसळ – झणझणीत मिसळ

मी Barbeque मिसळ हे नाव ऐकूनच चक्रावलो. आम्ही ठरवले की ३१च्या निमित्ताने आजच्या दिवशी ही मिसळ आधी टेस्ट न करता थेट जाऊन मिसळीचा आस्वाद घ्यायचा. पण ऐनवेळी ३ मित्र येऊ शकले नाहीत. तरी आम्ही “Barbeque मिसळ” ला दुपारी लंच वेळे मध्ये धडक दिली. पुण्यात चहाची दुकाने गल्लोगल्लीत आढळतात तशीच मिसळची दुकाने सुद्धा आत्ता वाढली आहेत. कारण पुणेकरांचे मिसळ पाव या खाद्यपदार्था वर मनापासून प्रेम आहे. मला वाटले मिसळ सारखी मिसळ असेल पण या वेळेस अनुभव वेगळा होता. पण येथील व्यवस्था थोडी वेगळी होती.

खाद्यपरीक्षण – Barbeque मिसळ – झणझणीत मिसळ Read More »

चित्रपट परीक्षण/रिव्यू : ‘Tanhaji: The Unsung Warrior’

श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी साम्राज्य उभे केले ते चतुराई, कर्तबगारी, खंबीर नेतृत्व, विचाराची कल्पकता, लढाऊपणा, गनिमी कावा, पराकोटीचा पराक्रम, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाख मोलाची  स्वराज्या साठी घाम गाळणारी, पराक्रम आणि बलिदान देणारी माणसं त्यांनी जमा केली. त्यापैकी एक होते “नरवीर तानाजी मालुसरे”. हे नाव उच्चारताच फक्त एक नाव आठवते ते म्हणजे सिंहगड. त्यासोबत महाराजांचे प्रसिद्ध विधान आठवते “गड आला पण सिंह

चित्रपट परीक्षण/रिव्यू : ‘Tanhaji: The Unsung Warrior’ Read More »

चित्रपट परीक्षण/रिव्यू : फत्तेशिकस्त : दमदार सर्जिकल स्ट्राइक

“शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ॥ शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळीं ॥१६॥ शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायाचें कैसें बोलणे॥ शिवरायचे सलगी देणें । कैसे असें ॥“ शिवराया बद्दल कितीही पुस्तके लिहिली आणि कथा चित्रपटात दाखवल्या तर कमीच पडेल. राजांची प्रत्येक लढाई, पराक्रम, कर्तृत्व, माणसं जिंकण्याची कला, आणि बुद्धीबळातील अजोड चाली प्रमाणे खिंडीत गाठून शत्रूवर केलेली मात यावर चित्रपट निघू शकतो. राजांचे उत्तुंग कर्तृत्व आणि पराक्रम आभाळाच्या परीघा सारखा होता.

चित्रपट परीक्षण/रिव्यू : फत्तेशिकस्त : दमदार सर्जिकल स्ट्राइक Read More »

केसरी – चित्रपट परीक्षण/रिव्यू – स्पॉईलर अलर्ट

“युद्धस्य कथा रम्या” असे म्हटले जाते. कारण युद्धात देशभक्ती, पराक्रम, त्याग, राजकारण, प्रखर संवाद, आरपारची लढाई, होत्याम्य, आणि बलिदान यांची भरपूर रेलचेल असते. बऱ्याच वेळेस आपल्याला कथा आपल्याला माहीत असते पण आपण चित्रपट बघतो कारण खरे कौशल कथेची मांडणी करण्यात असते आणि प्रेक्षक त्याकडे विशेष लक्ष देतात. केसरी हा चित्रपट ऐतिहासिक अश्या “सारगढीची लढाई” वर आधारित आहे. ही लढाई १२ सप्टेंबर १८९७ या दिवशी ब्रिटिश साम्राज्याच्या 36व्या शीख रेजिमेंटच्या २१ जवान आणि १०००० अफगाणी पठाण यांच्यात झाली होती. जगातील आता पर्यंतच्या पहिल्या पाच सर्वोच्च लढाईत या लढाईची गणना होते. त्यांच्या पराक्रम ऐकूनच आपण रोमांचित होतो. ते क्षण जर आपल्या डोळ्यासमोर साकारले तर काय होईल?

केसरी – चित्रपट परीक्षण/रिव्यू – स्पॉईलर अलर्ट Read More »