“युद्धस्य कथा रम्या” असे म्हटले जाते. कारण युद्धात देशभक्ती, पराक्रम, त्याग, राजकारण, प्रखर संवाद, आरपारची लढाई, होत्याम्य, आणि बलिदान यांची भरपूर रेलचेल असते. बऱ्याच वेळेस आपल्याला कथा आपल्याला माहीत असते पण आपण चित्रपट बघतो कारण खरे कौशल कथेची मांडणी करण्यात असते आणि प्रेक्षक त्याकडे विशेष लक्ष देतात. केसरी हा चित्रपट ऐतिहासिक अश्या “सारगढीची लढाई” वर आधारित आहे. ही लढाई १२ सप्टेंबर १८९७ या दिवशी ब्रिटिश साम्राज्याच्या 36व्या शीख रेजिमेंटच्या २१ जवान आणि १०००० अफगाणी पठाण यांच्यात झाली होती. जगातील आता पर्यंतच्या पहिल्या पाच सर्वोच्च लढाईत या लढाईची गणना होते. त्यांच्या पराक्रम ऐकूनच आपण रोमांचित होतो. ते क्षण जर आपल्या डोळ्यासमोर साकारले तर काय होईल?
पहिला हाफ ठीकठाक आहे. चित्रपटाची पहिले १० मिनिटामध्ये सोडली तर त्यात विशेष काही नाही. अक्षय कुमार जो की हवलदार ईशर सिंह यांची भूमिका करतोय त्याचा प्रवेश ठीकठाक झाला आहे. इतर व्यावसायिक सिनेमा प्रमाणे डशिंग एन्ट्रीक टाळली आहे. सगळा फोकॅस ईशर सिंह या व्यक्तीरेखे वर आहे. खास करून खलनायकाचे पात्र चांगले फुलवता आले असते. खलनायकाला त्याच्या व्यक्तिरेखेला पहिले १० मिनिटे वगळता पहिल्या हाफ मध्ये वाव नाही. परिणीतीचे व्यक्तिरेखा सुद्धा आणखी चांगल्या पद्धतीने रंगवता आली असती. तिच्या व्यक्तिरेखेला थोडा वेळ आणि न्याय द्यायला पाहिजे होता. पहिल्या भागात चित्रपट संथ होतो पण त्यात विनोदी पेरणी उत्तम केली आहे. तेरी मिट्टी गाणे सुरेल झाले आहे.
सारगढीच्या किल्ल्याचे जागेचे खूप महत्त्व असते. दोन मोठ्या गुलिस्तान आणि लॉकहार्ट किल्ल्या मधील संभाषण पोहचण्याचे काम इथे होत असते आणि त्यासाठी हा किल्ला एक महत्त्वाचा दुवा असतो. खलनायक आणि त्याचे दोन साथीदार अचानक सारगढीच्या किल्ल्यावर आक्रमण करतात. त्यांना फक्त २१ सैनिक उत्तर देतात. पण का आक्रमण करतात यांचे थोडे जास्त कथानक दाखवले असते तर उत्तम झाले असते. दुसरा हाफ मात्र कमाल आहे. युद्धाचे प्रसंग चांगल्या रित्या दर्शवलेले आहेत. २१ सैनिकाचे हळवे क्षण आणि जबरदस्त मनोधर्य योग्य पद्धतीने दाखवलेले आहेत. ज्या वेळेस भोलाला एक बदाम मिळतो आणि तो जपून ठेवतो तो भावनिक क्षण छान टिपला आहे. भोला सिंहचे जाताना हसणे चटका लावून जाते.
छायाचित्रणाची कसब पणाला लागल्या मुले काम छान झाले आहे. दिग्दर्शन पहिल्या भागाचे ठीक आहे पण दुसरा भाग अप्रतिम आहे. दिग्दर्शकाने ऐतिहासिक कथेवर चांगले काम केले आहे. “अनुराग सिंग” यांचे हिंदीत पहिले दिग्दर्शन आहे हे जाणवत नाही. या आधी अनुरागने पंजाबीत काही हिट चित्रपट दिले आहेत. चित्रपटात लढाई दाखवताना पार्श्वसंगीताचा उत्तम रित्या वापर केलेला आहे. चित्रपटाचे दुसऱ्या भागाचे संपादन सुद्धा एकदम झक्कास झाले आहे. ईशर सिंहचे दुसऱ्या भागातील दृश्य बघताना अंगावर काटाच येतो. काही लढाईचे क्षण तर इतके जबरदस्त आहेत की तुमचे पैसे वसूल झाल्याचे समाधान तुम्हाला मिळते. संवाद मात्र करकरीत आहेत. अक्षय कुमारच्या वाट्याला उत्तम संवाद आले आहेत.
चित्रपट संपल्या नंतर फक्त काही सह कलाकाराची नाव लक्षात राहतात. बाकी २० सैनिकाच्या उप-कथानक आणखी फुलवता आली असती तर चित्रपट आणखी बहरला असता. पहिल्या भागात काही दृश्य गुळगुळीत झाली आहेत. दुसर्या भागात प्रत्येक पात्राची भावनिक गुंतागुंत आणि कर्तव्य यांची छान पद्धतीने रेखाटणी झाली आहे. प्रत्येक सैनिक असलेल्या कलाकाराने अभिनयाचा आलेख उंच केला आहे. कास्टिंग व्यवस्थित आणि चांगली झाली आहे. ईशर सिंह यांचे वरिष्ठ इंगज यांच्या वाट्याला फक्त २-३ दृश्य आहेत. व्हीएफएक्सचा वापर जरी कमी असला तरी युद्धाचे दृश्य एकदम कडक आहेत. ईशर सिंहचा त्वेष, शौर्य, जबाबदारी, गिळलेला अपमान आणि त्यातून पेटून उठून केलेला उत्तुंग पराक्रम उठून दिसतो. शेवटी अति तटीच्या संग्रामात २१ सैनिकाची आहुती पडते. शेवटी तर गुरमुख सिंह हे पात्र अद्भुत युद्ध करून मन जिंकतो.
व्हीएफएक्सचा आणखी चांगला वापर करून युद्ध दृश्याची परिणामकरता आणखी वाढवता आली असती. सह कलाकारांना आणखी चांगल्या पद्धतीने प्रस्तावित करता आले असते तर आणखी सुसंगत वाटले असते. पहिला हाफ आणखी सुंदर केला असता तर चित्रपटाला जास्त रंग चढला असता. खलनायक, सह-कलाकार यांना आणखी वाव द्यायला पाहिजे होता.
ऐतिहासिक कथा बीज, सह-कलाकाराचा उत्तम अभिनय, चांगली मांडणी, न्याय देणारी पटकथा, भडकपणा नसलेली मांडणी, पार्श्वसंगीताचा योग्य वापर, लढाईचे उत्तम चित्रीकरण, ऐतिहासिक कथेला न्याय देण्याचा चांगला प्रयत्न आणि अक्षय कुमारच्या चांगला अभिनयाने नटलेला चित्रपट. यामुळे चित्रपट वेगळ्या उंची वर गेला आहे. दुसरा हाफ पहिल्या हाफची राहिलेली कसर भरून काढतो. एक चांगला चित्रपट बघितल्याचे समाधान आपल्याला भेटते. मला या चित्रपटाला ५ पैकी कमीत कमी ३.५ स्टार द्यायला आवडेल.
Views: 117
Hello there, just became aware of your blog through Google,
and found that it is truly informative. I'm gonna watch
out for brussels. I'll appreciate if you continue this in future.
A lot of people will be benefited from your writing. Cheers!
Hеy! Someone in my Ϝacebook group shared tgis website wіth us so I came to ցive it a loοk.
I'm dsfinitely loving the information. I'm book-marking and will be tweeting tthis to my followers!
Eҳcellent bloց and amazing design.
Very energetic post, I enjoyed that a lot.
Will there be a part 2?
Thanks for finally talking about >"केसरी – चित्रपट परीक्षण/रिव्यू – स्पॉईलर अलर्ट" <Liked it!