कविता : गर्जूनी

येतील संकटे गर्दीत धावुनी
काळे ढग आले उन्मत्त होऊनी
प्रश्नांचा झाला विचित्र गुंता
पराभवास सर्व आले गर्जूनी

ईश्वरावर सर्व भार सोडूनी
धीर सोडू नको जातील विरुनी
संयमाची अति कठोर परीक्षा
होशील संकट मुक्त कर्म जोडुनी

Views: 53

Leave a Reply