कविता : मागे पडलो…

मागे पडलो…

जीवनाच्या शर्यतीत माणुसकीने वागलो
माणसा सोबत जगण्यात मागे पडलो
 
नात्यांचा जू खांद्यावर घट्ट ओढून धरलो
प्रवासात वाहत गेलो मागे पडलो
 
सुसंवाद नसताना शब्द धरून बसलो   
ऐक्याला वाळवी लागली मागे पडलो
 
संघर्षाच्या वेळेस तत्व धरून बसलो  
लढाईत जिंकून सुद्धा मागे पडलो
 
आप्तेष्टांना मित्रांना आपले म्हणून राहिलो
अपयशात माणुसकी निसटली मागे पडलो

Views: 108

Leave a Reply