फास्टर फेणे – परीक्षण – स्पॉयलर अलर्ट

चित्रपट परीक्षण

आपण हॉलीवूडचे रहस्या वर आधारित चित्रपटा साठी जेम्स बॉड , शेरलाँक होम्सचे चित्रपट बघतो. पण मराठीत त्याच धर्तीवर आलेला चित्रपट बघायला विसरतो. मराठी चित्रपटा मध्ये नवीन-नवीन प्रयोग होत आहेत त्या मधलाच फास्टर फेणे हा उत्तम उदाहरण आहे. चित्रपट नाविन्यपूर्ण आहे यात वादच नाही. सगळ्या व्यक्तिरेखा स्पष्ट आणि ठळक आहेत. फेणे च्या विविध दृष्या मध्ये पार्श्वसंगीताचा सुरेख वापर केला आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला अमेय वाघ आणि गिरीश कुलकर्णीचे नाव एकाच रेषेत मध्ये आहे हे बरेच काही सांगून जाते. भा. रा. भागवत यांनी लिहिलेली कथा नवीन रुपात रंगवली आहे. मा‍झ्या सारखे ज्यांनी कथा वाचली नाही त्यांना पूर्ण नवीन अनुभव आहे.

फास्टर फेणे – परीक्षण – स्पॉयलर अलर्ट Read More »

बाहूबली २ – एक निरीक्षण

चित्रपट परीक्षण

सुंदर, अद्भुत, अकल्पनीय असा चित्रपट बनवला आहे राजमौली या दिग्दर्शकाने. चित्रपटाची प्रत्येक फ्रेमवर मेहनत जाणवते. दिग्दर्शक प्रेक्षकांच्या मनाची घट्ट पकड घेतो. महाभारताचे प्रतिबिंब जाणवेल कथेत. महाभारताच्या कथेत तुम्हाला सगळे काही सापडते त्या प्रमाणे इथे प्रयोग, प्रेमाचा त्रिकोण, हेवेदावे, मारामारी, वचन, शिक्षा, अदभुत पराक्रम विनोद, नाट्य, रहस्य, डाव-प्रतिदाव, अतर्क, अजिंक्य, डोळे दिपावणारे विशिष्ठ परिणामकारक दृश्य आणि त्यात कथेतील वळण चित्रपटाला एका वेगळ्याच रम्य दुनियेत घेऊन जातो.

बाहूबली २ – एक निरीक्षण Read More »