आईचे ब्रह्मास्त्र
प्रत्येक माणसाचे ईश्वराशी संवाद साधण्याचा कला वेगळी असते आणि गाऱ्हाण मांडायची पद्धत सुद्धा वेगळी असते. माझ्या आईची पद्धत सुद्धा वेगळी आहे. देव काही कर्मकांडात अडकला नाही. आईने काही संगीतामध्ये शिक्षण घेतले नाही. आई जेव्हा घरातल्या देवाची पूजा मनापासून करते आणि सोबत भावगीत गाते. काय सांगू ऐकायला खुप छान वाटते. कारण आहे तिची देवावरील श्रद्धा. एखादा गायक रियाज करताना सुराला जसे आळवतो. त्याच प्रमाणे आई भावगीत गाऊन देवाला आळवते. हृदयातलली भक्ती गाणे रुपी भावातून गळ्यातून प्रकट होतात. जसे काही संगीत सेवा ईश्वरा चरणी रूजू करते. आई आणि घरातील देव त्या भक्तीरसा मध्ये नाहून निघतात आणि ऐकणाऱ्याचे कान तृप्त होतात.