सल
आज आनंदी बाई खुपच गडबडीत होत्या. कारण त्यांच्या पिऊचा आज वाढदिवस होता. जोरात तयारी चालली होती. सुषमा त्यांना सूचना देत होती. घराची सजावट पूर्ण होत आली होती. तेव्हड्यात पिऊ धावत आली. आनंदी बाई ने तिला कडेवर उचलले. पिऊ लगेच त्यांना बिलगली. संध्याकाळी 6 ला कार्यक्रम सुरू झाला. सुषमा-अजय अगत्याने सगळी कडे लक्ष्य देत होती. कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. सोसायटीतील लहान मुले आणि मुली आली होती. केक कटिंग, गेम्स झाल्या नंतर छोटासा फराळ होता. आनंदी बाई किचन मध्ये काम करत ओळखीच्या लोकांना भेटत होत्या. पिऊचे सर्व आवडते लोक आनंदी बाईच्या सुध्दा आवडीचे होते. सगळे जण निघून गेल्या वर आनंदी बाई ने पिऊला गिफ्ट दिले. पिऊने गिफ्ट घेतले पण सुषमा नको म्हणत होती. पण आनंदी बाईच्या पिऊ वरच्या प्रेमामुळे सुषमाने जास्त आढावेढे घेतले नाहीत.
