Skip to content
Bhagwat Balshetwar
अद्वितीय अनुभव...

मराठी कथा, कविता, लेख, चित्रपट परीक्षण, प्रवासवर्णन, फोटोग्राफी, पुस्तक, कोट्स, आणि इतर साहित्य

  • कथा
    • लघु कथा
    • शत शब्द कथा
  • कविता
    • चित्र चारोळी
    • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – कविकट्टा
  • लेख
    • व्यक्ती विशेष
  • प्रवासवर्णन
  • चित्रपट परीक्षण
  • फोटोग्राफी
    • पक्षी फोटोग्राफी
    • फोटोग्राफी – गणेशोत्सव
  • कोट्स
  • पुस्तक
    • वडिलांची प्रकाशित साहित्य संपदा
  • इतर साहित्य
  • About
    • क्षणचित्रे आणि समारंभ
    • फोटोग्राफी अवॉर्ड
    • Privacy Policy
Bhagwat Balshetwar
अद्वितीय अनुभव...

मराठी कथा, कविता, लेख, चित्रपट परीक्षण, प्रवासवर्णन, फोटोग्राफी, पुस्तक, कोट्स, आणि इतर साहित्य

  • कथा
    • लघु कथा
    • शत शब्द कथा
  • कविता
    • चित्र चारोळी
    • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – कविकट्टा
  • लेख
    • व्यक्ती विशेष
  • प्रवासवर्णन
  • चित्रपट परीक्षण
  • फोटोग्राफी
    • पक्षी फोटोग्राफी
    • फोटोग्राफी – गणेशोत्सव
  • कोट्स
  • पुस्तक
    • वडिलांची प्रकाशित साहित्य संपदा
  • इतर साहित्य
  • About
    • क्षणचित्रे आणि समारंभ
    • फोटोग्राफी अवॉर्ड
    • Privacy Policy

लघुकथा – आनंद आणि दु:ख

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / November 29, 2024
कथाकथा लघुकथा

जवळपास ९.३० च्या दरम्यान गजानन धावत पळत हॉस्पिटल कडे निघाला. चौथ्या मजल्यावर पोहोचल्यावर त्याला थोडे हायसे वाटले. पण तिथे आयसीयू समोर थोड्याश्या जागेत लोकांनी आप आपली आंथरूण टाकून आरामात बोलत बसलेली होती. तो हताशपणे सगळी कडे झोपण्यासाठी जागा पाहत होता. पण त्याला काहीच यश आले नाही. तिथे एक जागा रिकामी होती तिथे तो आंथरूण टाकणार तेवढ्यात त्याला कोणी तरी सांगितले की ही तर लक्ष्मणची ठरलेली जागा आहे. गजाननने आंथरूण टाकणार तेवढ्यात तिथे किडकिडीत मनुष्य आला. गजानन बाजूला झाला. त्याला समोर असलेल्या मेडिकलच्या अतिशय कडेला झोपायला जागा भेटली. तिथे रात्री सारखी गर्दी व्हायची त्यामुळे झोप पूर्ण व्हायची नाही. त्यामुळे गजाननची चिडचिड झाली.

रोज झोपण्याच्या जागेसाठी ओढाताण व्हायला लागली. जेवण संपवून गजानन लगेच हॉस्पिटल कडे निघाला. तिथे लक्ष्मणची एकच जागा रिकामी होती. तिथे गजाननने आंथरूण टाकले. जागेवरून दोघांचे थोडे भांडण झाले. गजानन मागे हटला नाही. शेवटी लक्ष्मणला मेडिकलच्या कडेला झोपायला जागा भेटली.

दुसर्‍या दिवशी त्यांना आजूबाजूला जागा मिळाली. पण दोघं काहीच बोलले नाहीत. लक्ष्मणच्या बाजूला आणखी व्यक्ति दिसत होतो. गजानन त्यांचे बोलणे ऐकत होता.

राम – “लक्ष्मण आज आयसीयू मध्ये लक्ष्मीला भेटला का रे”

लक्ष्मण – नाही अण्णा. मी इथेच राहतो पण लक्ष्मीला काही भेटू वाटत नाही.

राम – का?

लक्ष्मण काहीही न बोलता थोड्या वेळा साठी निघून गेला. काही दिवसा खाली त्याच्या वडीलांना आजारपणा मुळे इथे हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते.

आठवड्या नंतर सुद्धा दोघात बोलणे नव्हते. 9 वाजता अचानक एक बेड आयसीयूच्या बाहेर येत होता. त्या महिला पेशंट सोबत लक्ष्मण होता. बाजूचे लोक सांगत होते की, एक धर्मादाय संस्थेने लक्ष्मणच्या बायकोला इथे अॅडमिट केले होते. लक्ष्मण त्याच्या बायकोला घाटी रुग्णालयात घेऊन जात आहे. बिल खूप झाल्यामुळे लक्ष्मणला बायकोला तिकडे घेऊन जात होता. ही दृश्य बघून गजाननला अतिशय वाईट वाटले. दोघांचे जागेवरून भांडण झाले होते. गजाननला झोपण्याची जागा मिळाली होती. पण त्याला आज झोपण्याचे सुख मिळणार होते. पण छोट्या गोष्टीवरून लक्ष्मणशी भांडण झाले यांचे दु:ख सुद्धा होते.

लघुकथा – आनंद आणि दु:ख Read More »

कथा – बंडखोर

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / May 15, 2021
कथाकथा दीर्घकथा

आज सुमेधच्या घरी इडली आणि वडा हा नाष्टाचा बेत ठरला होता. सुमेध अप्पा सोबत घरी सकाळच्या नाष्टाची वाट बघत बसला होता. स्वयंपाक घरातील काम संपवून सुमेधची आई “सरिता” आणि पत्नी “मेघा” नाष्टा घेऊन आल्या. अप्पाचा दंडक होता की दररोज रात्री जेवण आणि सुट्टीच्या दिवशी सकाळचा नाष्टा एकत्रच केला पाहिजे. त्यामुळे कुटुंबाचे एकमेकांशी बोलणे आणि आठवड्या भरची चर्चा व्हायची. बोलता-बोलता सुमेधच्या ऑफिसचा विषय निघाला. काल सुमेधने ऑफिस व्यवस्थापनाशी विविध मुद्द्यावर विरोध प्रगट करण्यासाठी ईमेल पाठवला आहे. त्यानंतर मॅनेजमेंटच्या लोकांनी त्याला सोमवारी भेटण्यासाठी बोलवले आहे. सुमेधला त्याचे ऑफिस मधले मित्र सांगतात की उगाच नुसती उठाठेव आणि बंडखोरपणा करण्यात काही अर्थ नाही आणि सुमेधने मॅनेजमेंटच्या लोकांच्या विरोधात जाऊन काहीही साध्य होणार नाही. उलट त्याचा परिणाम तुलाच भोगावा लागेल असे मित्रांनी असा सल्ला दिला.

कथा – बंडखोर Read More »

लघुकथा – जाणीव

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / March 27, 2021
कथाकथा लघुकथा

हणमंतला आज खूपच आनंद झाला होता. कारण त्याला त्याची आई उद्या आठवडे बाजाराला घेऊन जाणार होती. कारण आठवडे बाजार म्हणजे नुसती धमाल. खाण्यासाठी वेगवेगळे पदार्थ, खेळायला छोटे-मोठे आकाश पाळणा, रहाटपाळणा, आणि बरंच काही. हणमंतला मात्र आकाश पाळणा मध्ये बसायला अतिशय आवडायचे. हवेवर स्वार होऊन पाळणा जसा-जसा वर जायचा तसे-तसे हणमंतला छान वाटायचे.
हणमंत दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठून तयार होतो. सकाळ पासून हणमंत अतिशय खुष होता. तो पर्यंत त्यांच्या गल्लीतील मित्राला सुद्धा सांगून येतो की तो आई सोबत आठवडे बाजाराला जाणार आहे. दुपारच्या वेळेस हणमंत सोबत आठवडे बाजारात पोहोचतो.

लघुकथा – जाणीव Read More »

शतशब्द कथा : फर्निचर

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / October 10, 2020
कथाकथा शत शब्द कथा

लघुकथा : फर्निचर नेहाआणि प्रथम त्यांच्या प्रिय घराचे फर्निचर करायचे होते. त्यासाठी तो बऱ्याच नामांकित कंपनी कडून माहिती काढत होता. आज एक नामांकित विक्रेता “निलेश” घर बघून फर्निचर ब्रांड आणि किंमत ठरवण्यासाठी आला होता. निलेशने मॉड्यूलर किचनची माहिती सांगण्यासाठी पूर्वी प्रथमने सांगीतले लहान मुलांना इजा न करणारे फर्निचर ब्रान्ड दाखवा. घरातील इतर फर्निचर सुद्धा लहान

शतशब्द कथा : फर्निचर Read More »

लघुकथा : मावशी चहा!

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / September 27, 2020
कथाकथा लघुकथा

आत्त्याबाई मला चहा पाहिजे होता. करते की मग “गरोदर असलेल्या सूने साठी चहा सुद्धा करू शकत नाही का?” तसे नाही हो आत्त्याबाई, तुम्ही ज्यांची सारखी आठवण करतात त्या मालती ताईच्या हातचा चहा पाहिजे. तसे सासू म्हणजे यशोदा बाईना आठवले की चहा घेताना आपसूकपणे मालती ताई आणि चहा सोबत गप्पा या आठवायच्या. त्यामुळे सूने सोबत चहा घेते वेळेस हा विषय सारखा निघायचा. चहाचा विषय निघाला की आपसूकच मालती ताईचे नाव यायचे. मालती ताईचा चहा किती चांगला असायचा हे आवर्जून सांगायच्या. अगं मालती ताई आत्ता राहिल्या दुसर्‍या गावात. आत्ता कुठून आणून देऊ तुला चहा. त्या गोष्टीला आत्ता बरीच वर्ष झाली. तसे यशोदा बाई आठवणीत हरवल्या.

लघुकथा : मावशी चहा! Read More »

शतशब्द कथा – विरोधक…

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / May 26, 2020
कथाकथा शत शब्द कथा

शतशब्द कथा – विरोधक… अनुप आणि मानसी एकाच कॉलेज आणि एकाच वर्गामध्ये शिकत असत. पण दोघा मध्ये चढाओढ आणि खुन्नस फार पूर्वी पासून होती. दररोज कॉलेज मध्ये लवकर कोण पोहोचतो यांची सुद्धा दोघात चढाओढ असे. कॉलेज मध्ये सांघिक खेळात, सांस्कृतिक कार्यक्रमात, अभ्यासात दोघा मध्ये एक नंबर मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धा असे. कॉलेज संपल्या नंतर अनुप उच्च

शतशब्द कथा – विरोधक… Read More »

लघुकथा – नजर

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / December 15, 2019
कथाकथा लघुकथा

उमा आज आपल्या मैत्रिणीच्या घरी(पद्मिनी) कामानिमित्त कडे आली होती. पद्मिनीची आई शांता काकू उमाच्या सख्या नसल्या तरी जुन्या भावकीतील नातेवाईक होत्या. पद्मिनी वर्ग मैत्रिण असल्यामुळे उमेचे तिच्या घरी जाणे येणे होत असे. पद्मिनी सोबत तिच्या खोलीत बोलत असताना सहजच निरागस पणे सांगीतले की, तिला स्थळ बघायला घरच्यांनी सुरुवात केली आहे. पुढील आठवड्यात तिला बघायला पाहुणे येणार आहेत असे सुद्धा सांगीतले. चहा-पाणी केल्यानंतर उमा घरी गेली.

लघुकथा – नजर Read More »

शत शब्द कथा – बोलावणे

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / February 28, 2019
कथाकथा शत शब्द कथा

देविकाच्या एका डोळ्यात अश्रु आणि दुसर्‍या डोळ्यात आनंदाश्रू होते. तिच्या डोळ्या समोरून तिचे आयुष्य झरकन तरळून गेले. तिला वडीलांनी कुठल्याही प्रसंगात ठाम राहायला शिकवले होते. देविका साठी अंतिम निर्णायक स्थिती आलीच होती कारण सहा महिन्या पासून तिच्या वडीलांची तब्बेत खराब होती. डॉक्टरांनी बरेच प्रयत्न करून सुद्धा पदरात काहीच यश पडत नव्हते.

शत शब्द कथा – बोलावणे Read More »

लघुकथा – निरोप समारंभ

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / October 28, 2018
कथाकथा लघुकथा

तुषारचा आज ऑफिस मध्ये शेवटचा दिवस होता. त्याच संध्याकाळी त्याने ऑफिस मधील मित्रांना पार्टी साठी बोलावले होते. त्यासाठी त्याने सगळ्यांना तशी ई-मेल केली होती. त्यात मंगेशला सुद्धा आमंत्रण दिले होते. तुषार आणि मंगेश मध्ये काही विशेष मित्रत्वाचे संबंध नव्हते. पण त्याला स्वत:ला मंगेशला आमंत्रित करावेसे वाटले. यांचे उत्तर तुषार कडे नव्हते.

पण मंगेश पार्टीला आला आणि त्याने खूप मौज मस्ती केली. तुषारला वाटले की तो स्वतः कंपनी सोडून जाणार आहे आणि त्यामुळे मंगेशच्या मार्गातील काटा निघाला म्हणून मंगेश खुष आहे का? की मित्राच्या आनंदात मंगेश खुष आहे हे समजत नव्हते. पण दोघांनी जेवण मस्त पैकी एन्जॉय केले. त्यांच्या सोबत बरीच मित्र मैत्रिणी सुद्धा होत्या. सगळे एकमेकांच्या आठवणी सांगण्यात मशगुल झाले होते.

लघुकथा – निरोप समारंभ Read More »

कथा : मैत्रा – भाग २

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / July 29, 2018
कथाकथा दीर्घकथा

मैत्राला सत्य जाणून घ्यायचे होते त्यामुळे मैत्रा आणि मिहीर गाडीने जळगाव जवळच्या त्याच्या गावी जायला निघाले. गावातील वाड्यात पोहचले. चिरेबंदी वाडा, खानदानी कुटुंब आणि छान माणसे यांनी वातावरण भरून गेल होत. तिथे त्यांना पाहून मिहीरच्या आईला अति आनंद वाटला. सगळे त्यांच्या आकस्मिक भेटण्याने भारावून गेले. तिथे तिला मिहीरचे सगळे कुटुंबच भेटले. मिहीर आला म्हणल्या नंतर सगळेच त्यांच्या मायेची माणसे जमा झाली. विशेष करून आई, बहिण ‘एकता’, ‘सई’ वाहिनी, पुतण्या ‘आकाश’ आणि इतर मंडळी हजर होती. ‘एकताने’ सांगीतले तिच्या सासूबाईला सगळे प्रेमाने “अक्का” म्हणतात. सगळा वाडा मैत्राला दाखवला. “एकता” मिहीर पेक्षा ३ वर्षानी मोठी होती. अक्काच्या खोलीत मिहीर आणि मैत्राचा फोटो बरेच काही सांगून जात होता. कुटुंब बघून मैत्राला चांगले वाटले पण मिहीर कुटुंबा पासून लांब का आहे यांचे कोडे उलगडले नव्हते.

कथा : मैत्रा – भाग २ Read More »

1 2 Next →

Photography Award 2025

FotoVision Exhibition
CTM 5th International Exhibition

'थोडं मनातलं… थोडं जनातलं…' पुस्तक विक्रीस उपलब्ध आहे!!!

Search on Site

Categories

Archives

Subscribe to Blog via Email

Enter your email address to subscribe and receive notifications.

Site Statistic

Site Total Page View : 11025 

Statistic

Top Posts & Pages

  • कविता
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • WordPress

Recent Posts

  • ब्लॉग : लेख : INS Kavaratti आणि INS Sindhukirti – भाग १ May 15, 2026
  • ब्लॉग : लेख : भारतीय नौसेना – धैर्य आणि शौर्य April 15, 2026
  • फोटोग्राफी : परिसरातील पक्षी – भाग १० February 22, 2026
  • फोटोग्राफी – नेहरू प्राणी उद्यान, हैदराबाद January 6, 2026
  • ब्लॉग : चित्रपट परिक्षण – कांतारा: अ लिजेंड चॅप्टर १ October 18, 2025

RSS RSS

  • ब्लॉग : लेख : INS Kavaratti आणि INS Sindhukirti – भाग १
  • ब्लॉग : लेख : भारतीय नौसेना – धैर्य आणि शौर्य
  • फोटोग्राफी : परिसरातील पक्षी – भाग १०
  • फोटोग्राफी – नेहरू प्राणी उद्यान, हैदराबाद
  • ब्लॉग : चित्रपट परिक्षण – कांतारा: अ लिजेंड चॅप्टर १
  • फोटोग्राफी – गणेशोत्सव २०२५
  • महादेवा…
  1. Mahesh Purandare on ब्लॉग : चित्रपट परिक्षण – छावा – असीम शौर्य, अचाट पराक्रम आणि त्यागाची गाथा – स्पॉइलर अलर्टFebruary 27, 2025
  2. अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : फुलपाखरू - भाग ४ on फोटोग्राफी : फुलपाखरू – भाग २July 1, 2023
  3. अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : फुलपाखरू - भाग ४ on फोटोग्राफी : फुलपाखरूJuly 1, 2023
  4. अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : फुलपाखरू - भाग ४ on फोटोग्राफी – TATR – ताडोबा – बटरफ्लाय वर्ल्डJune 30, 2023
  5. अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : फुलपाखरू - भाग ४ on फोटोग्राफी : फुलपाखरूJune 30, 2023
  6. अद्वितीय अनुभव... - निवडक चारोळी – भाग ७ on निवडक चित्र चारोळी – भाग ६June 25, 2023
  7. अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : भिगवण आणि मयूरेश्वर अभयारण्य on फोटोग्राफी : परिसरातील सामान्य पक्षी – भाग ८February 19, 2023
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Blogadda

Discover latest Indian Blogs

IndiBlogHub

Top bloggers in india

Archives

Copyright © 2026 अद्वितीय अनुभव... भागवत बलशेटवार

Follow Us

  • Facebook
  • Instagram
  • Twitter
  • Yourquote

Loading Comments...