लघुकथा – जाणीव
हणमंतला आज खूपच आनंद झाला होता. कारण त्याला त्याची आई उद्या आठवडे बाजाराला घेऊन जाणार होती. कारण आठवडे बाजार म्हणजे नुसती धमाल. खाण्यासाठी वेगवेगळे पदार्थ, खेळायला छोटे-मोठे आकाश पाळणा, रहाटपाळणा, आणि बरंच काही. हणमंतला मात्र आकाश पाळणा मध्ये बसायला अतिशय आवडायचे. हवेवर स्वार होऊन पाळणा जसा-जसा वर जायचा तसे-तसे हणमंतला छान वाटायचे.
हणमंत दुसर्या दिवशी सकाळी लवकर उठून तयार होतो. सकाळ पासून हणमंत अतिशय खुष होता. तो पर्यंत त्यांच्या गल्लीतील मित्राला सुद्धा सांगून येतो की तो आई सोबत आठवडे बाजाराला जाणार आहे. दुपारच्या वेळेस हणमंत सोबत आठवडे बाजारात पोहोचतो.