कविता – नमवणार

कविता

नशिबाच्या कौलाला मी हो नमवणार,
रुसलेल्या सुखाला हसवून जिंकणार।

नात्यांच्या गुंत्यांना मीच सावरणार,
भिजत पडलेला प्रश्नांना मी उकलणार|

संघर्षांवर मात करून यश खेचणार,
आव्हानं झुगारून प्रगती साधणार|

आयुष्याचा यक्ष प्रश्न मी हो उलगडणार,
अडथळ्यांच्या शर्यतीत स्वतःला घडवणार।

चुकलेल्या वाटा सोडून मार्ग निवडणार
अपयश हरवून यशात नवा रंग भरणार

कविता – नमवणार Read More »