जसे मुले व्यसनांच्या आहारी जातात त्याप्रमाणे मुले कॅन्डी क्रॅश सागा च्या आहारी जातात. ज्या प्रमाणे एक व्यसनांच्या सोबत दूसरे येते त्या प्रमाणे कॅन्डी क्रॅश संग सोबत पेट रेस्क्यू सागा आणि नवीन कॅन्डी क्रॅश सोडा सागा येतात. हे कॅन्डी क्रॅश आम्हाला कधी सोडणार हे माहित नाही. जसे दोन सिगारेट पिणारे लगेच मित्र बनतात त्याच प्रमाणे दोन सागा खेळणारे लगेच मित्र बनतात . दोन ट्रक चालवणारे जेव्हा-जेव्हा भेटतात तेव्हा-तेव्हा ट्रक बद्दल बोलत असतात. त्या प्रमाणे दोन सागा खेळणारे मित्र भेटले कि मी एखादी लेव्हल कशी कमी वेळेत पूर्ण केली आणि ती कशी अवघड आहे हे बोलत असतात. दुसर्याचा किती लेव्हल झाल्या हे कळल्या शिवाय त्यांचे बोलणं पूर्ण होत नाही.
या सागा गेम्स मुळे तुम्हाला राग, लोभ, मद, मत्सर चा अनुभव येतो. एखादी लेव्हल क्लिँयर झाली नाही तर प्रचंड राग येतो. एँपिसोड पूर्ण करायचा लोभ जडतो. दुसर्याची जास्त लेव्हल झाली तर मत्सर वाढतो. स्वत:ची लेव्हल जास्त झाली तर मद म्हणजे अंहकार वाढतो. कॅन्डी क्रॅश सागा मुळे खुप फायदे होतात. मैदानी खेळा मुळे तुम्हाला दुखापत होऊ शकते. पण तसे कॅन्डी क्रॅश मध्ये होत नाही पण तुम्ही रस्त्यावर चालताना कॅन्डी क्रॅश खेळत असाल तर मग काय होईल ते काही सागू शकत नाही. तुम्ही गटारात पडाल का खड्यात पडाल हे ब्रह्मदेव सुद्धा सागू शकत नाही. क्रिकेट मध्ये पहिल्यांदा बँट ने खेळण्या साठी मारामारी होते तसे इथे काही होत नाही. त्यामुळे तुमचा आनंदकोणी हिरावून घेऊ शकत नाही. अर्जुनाला एकाग्रतेत ने फक्त पक्ष्यांचा डोळा दिसतो त्या प्रमाणे कॅन्डी क्रॅश खेळताना तुम्हाला फक्त ३ कॅडी दिसतात. कॅन्डी क्रॅश चि नशा उत्तरो-उतर वाढत जाते. दारूचढल्या नंतर माणूस झिंगत जातो त्याप्रमाणे माणसाला सागा खेळून झिंगतो.
कॅन्डी क्रॅश सागा नवरे मंडळी साठी खूप महत्वाचा आहे. तुमची अर्धांगीनी तुळशी बागेत किंवा लक्ष्मी रोड वर शॉपिंग करताना तुम्ही बोर होण्या पेक्ष्या तुमची ६-७ लेव्हल खुशाल पूर्ण करू शकता. तसेच माँल मध्ये तुमची अर्धांगीनी तुमचे पैसे खर्च करत असताना तुम्ही काहीही करू शकत नाही या अपराधी भावनेने वाईट वाटून घेण्या पेक्ष्या तुमची कॅन्डी क्रॅश सागा चि गाडी पुढे दामटू शकता आणि तुम्ही तुमचे मनोरंजन करू शकता. तसेच सागा गेम सामान्य माणूस ते खासदारा पर्यंत सगळ्यांना आवडतो. तसा हा गेम सर्वमान्य/लोकमान्य आहे. काही दिवसापूर्वी एका आमदारांना कॅन्डी क्रॅश विधानसभेत खेळताना बघण्यात आले आहे. तेव्हा एकमेका सहाय्य करू अवघे धरू कॅन्डी क्रॅशचा सुपंथ.
कॅन्डी क्रॅश चारोळी
रात्र-दिवस मी खेळत राहतो कॅन्डी क्रॅश
आई म्हणते आत्ता तरी थोडा वेळ शांत बस
बायको म्हणते किती वेळ खेळता कॅन्डी क्रॅश
आत्ता तरी मला घेऊन द्या नेकलेस आणि पर्स
मनोरंजन म्हणुन मी खेळतो कॅन्डी क्रॅश
316 लेव्हल खेळून खेळून झालो कृश
अकरा वाजून गेले तरी केला नाही ब्रश
बाबा म्हणतात आत्ता तरी सोडून दे कॅन्डी क्रॅश
आम असो वा आमदार खेळतात कॅन्डी क्रॅश
Mystery quest देऊन मदत करतात पास
more lives दिल्यास हसतात खासम खास
कॅन्डी रिक्वेस्ट पाठवताच मोबाईल झाला क्रैश
Views: 44