आई म्हणजे वात्सल्याची मूर्ती

आई म्हणजे. . . . . . .
लेकरां साठी असते वात्सल्याची मूर्ती
मुला करता सत्यात उतरणारी कृती
लेकरां साठी भावनांची इच्छा पूर्ति
कुटुंबा साठी सतत धगधगणारी क्रांतीआई म्हणजे. . . . .. .
मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणणारी युक्ती
सगळ्यांना घराची ओढ लावणारी व्यक्ति
कितीही संकटे आल्यास लढणारी शक्ति
आईची सेवा केल्यास मिळेल मोक्ष्याची प्राप्ती

आई म्हणजे. . . . .. .
आभाळा येवढी तिच्या मायेची व्याप्ती
तिच्या आशिर्वादाने मिळेल दिगंतर कीर्ती
आईची सेवा म्हणजेच ईश्वराची भक्ती
तुमच्या आनंदात असते तिची तृप्ती

आई म्हणजे. . . . . ..
पाल्याच्या शिक्षणा साठी असते भ्रांती
सगळ्या करता अखंड वाहणारी स्फूर्ती
आईच्याच कुशीत मिळेल मला मुक्ति
मुलीच्या सतत ओठावर असणारी उक्ति

आईचे प्रेम म्हणजे . . . . .
जशी ताज्या दुधा वरची साय
जशी कोवळ्या ऊनातील ऊब
जसे हिमालयातील हिमनगाचे टोक
जसा आठवणींचा अमुल्य ठेवा

आईचे प्रेम म्हणजे. . . . .
जशी सैनिकाच्या हातामधली ढाल
जशी पाऊसा नंतर निसर्गाची शाल
जसे गाण कोकिळेच्या षडजचा स्वर
जसे सूर्योदयाचे कोवळे कोवळे क्षण

आईचे प्रेम म्हणजे. . . . .
जशी सूर्यास्ताची सोनेरी किरणे
जसे समुद्राच्या मना प्रमाणे अथांग
जसे पहिल्या पाऊसा नंतरचा सुगंध
जसे पहाटे धुक्यात पसरलेले दवबिंदु

Views: 99

0 thoughts on “आई म्हणजे वात्सल्याची मूर्ती”

Leave a Reply