मी पुण्यात २००८-२००९ या वेळेत नवी पेठेत राहायचो. आम्ही तिथे ५ जण होतो. २ बेडरूम चा फ़्लँट होता. मी त्याआधी बँगलोर १.५ वर्ष राहून आलो होतो. मेस चे जेवण खाऊन आम्ही कंटाळलों होतो. मग त्यामुळे आम्ही तिथे स्वंयपाका साठी बाई शोधात होतो. आणि आमची ओळख आज्जीशी झाली.
वय वर्षे ५५.. नऊवारी नेसलेल्या.. कपाळी भलामोठं कुंकु.. चेहरयावर स्मितहास्य.. राहणी अत्यत साधी.. टापटीपपणा.. स्वछता.. स्वंयपाकाची आवड.. रोखठोक बोलणं.. आणि चोख हिशोब.. त्यानी लगेच दुसरया दिवसापासुन स्वंयपाकाला सुरुवात केली. आज्जीमुळे आम्हाला दररोज नवनवीन पदार्थ खायला भेटत. ५ जणा मध्ये माझ्या मित्राचा भाऊ लहान होता. त्याचे आजी खुप लाड करत. पहिल्या १० दिवसात त्यांना सगळ्याच्या खायच्या आवडी-निवडी कळल्या होत्या. आवडीनुसार त्या स्वच्छ, सात्विक जेवण बनवित. कधीहि त्या काम उरकायचे आहे म्हणून करत नसत. परिपूर्ण जेवण बनवण्यात त्यांच्या हाथखंडा होता. त्यांचा स्वंयपाकाला उत्कृष्ट चव होती. उकडीचे मोदक बनण्यात त्या तरबेज होत्या. आज्जी शिळे-अन्नाचा उपयोग खुप चागल्या पद्धतीने करत. दुसरया दिवशी त्या शिळे-अन्नाची अशी काही डिश बनवत की ते खाल्यानंतर असं कधी वाटलंच नाही कि हे शिळे-अन्न आहे. आम्ही पाचीजन लगेच डिश संपवत असत. नारळ असेल तर आज्जी नारळ फोडून उकडीचे मोदक बनवून घरून आणत. काका हलवाई कडे १५-२० रुपयाला मिळणारा मोदक आम्ही फुकटात खात असु. जेव्हा कधी मित्र किवां पाहुणे आले तर आज्जी टाळाटाळ न करता जेवण बनवत असत.
धुणे-भांडी करण्यासाठी दुसरी बाई होती. तिने पहिला एक महिना सोडून कधी व्यवस्थित काम केलेच नाही. त्यामुळे आमचे आणि बाई चे भांडणे व्हायची. शेवटी आम्ही बाईला काम व्यवस्थीत करत नसल्या मुळे कामावरून काढून टाकले. बाई नी जाताना धमकी दिली कि घरात दुसरी धुणे-भांडी करणारी बाई येवू देणार नाही. तेव्हा आज्जीनी आम्हाला त्यांच्या ऒळखीची दुसरी धुणे-भांडी करणारी बाई लावून दिली.
आज्जी, दिवाळीला कधीही बक्षिशी न मागता आम्हालाच त्यांच्या घरी जेवणाचा निमंत्रण देत. एका दिवाळीला आम्ही त्यांच्या घरी जेवणाला गेलो होतो. घर ३ खोल्याचा होते.. एकदम टापटीप.. व्यवस्थित सजावट आणि जेवणा साठी खूप सारे पदार्थ. २०१० नंतर मी नवी पेठ पुणे सोडली आणि वारजे पुणे येथे राहायला गेलो पण मला कधीही एवढा चागलं जेवण बनवणाऱ्या आज्जी कुठे भेटल्या नहित. आजही उकडीचे मोदक खाल्यावर त्यांची जरूर आठवण येते.

Views: 67