ब्लॉग : चित्रपट परिक्षण – ‘सरदार उधम’ – उत्कृष्ट कलाकृती

चित्रपट परीक्षण

२०१४ साली मी अमृतसर ला अमरनाथ यात्रे निमित्त गेलो होतो. तिथे मी सुवर्ण मंदीरा सोबत जालियनवाला बाग स्मारका ला भेट दिली होती. तिथे मला इतिहासा मधील “जालियनवाला बाग” हत्याकांड आठवले. भिंतीत घुसलेल्या गोळ्या आणि त्या पाहून लोकांवर इंग्रजांनी काय, किती आणि कसे भयानक अत्याचार केले असतील त्याचे पुसट शी कल्पना येते. या हत्याकांडाच्या जखमेला इतिहासाच्या पानात बाजूला पडली आहे. या जखमेला भारतीयांनी कधीही पुरेसा न्याय दिलाच नाही. आणि स्मारक बघून आपण त्यातील शहीदांना आदरांजली न वाहता निघून जातो. पण “सरदार उधम” या चित्रपटाने या घटनेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
मला आधी वाटले की बॉलीवुडचा चित्रपट आहे मग त्यात मारधाड, त्वेषाने बोललेले संवाद, अपूर्ण माहिती, वाद विवाद, अति भडक मसाला, व्यक्तिरेखेला ला सुपर हीरो दाखवायचा अट्टाहास, असे काहीसे किंवा कमी जास्त प्रमाणात या सगळ्यांचे मिश्रण असा चित्रपट असेल. एखादी गोळी घ्यावी तसे चित्रपट पहिल्यावर हात आपटून केलेला जयजयकार. असे या चित्रपटात काही नाही. इतर देशभक्ती चित्रपटात जशी दाखवली तशी ट्रीटमेंट कथेला नाही.

ब्लॉग : चित्रपट परिक्षण – ‘सरदार उधम’ – उत्कृष्ट कलाकृती Read More »