फोटोग्राफी : फुलपाखरू – भाग २

फोटोग्राफी

फोटोग्राफी : परिसरातील फुलपाखरू – भाग २
Butterfly Photography Part 2

फोटोग्राफी : फुलपाखरू – भाग २ Read More »

कविता : मागे पडलो…

कविता

मागे पडलो…
जीवनाच्या शर्यतीत माणुसकीने वागलो
माणसा सोबत जगण्यात मागे पडलो

नात्यांचा जु खांद्यावर घट्ट ओढून धरलो
प्रवासात वाहत गेलो मागे पडलो

सुसंवाद नसताना शब्द धरून बसलो
ऐक्याला वाळवी लागली मागे पडलो

संघर्षाच्या वेळेस तत्व धरून बसलो
लढाईत जिंकून सुद्धा मागे पडलो

आप्तेष्टांना मित्रांना आपले म्हणून राहिलो
अपयशात माणुसकी निसटली मागे पडलो

कविता : मागे पडलो… Read More »

कविता: वाईट भूतकाळ सोडून दे

कविता

जागलेल्या आठवांचे माप घेणे सोडुनी दे
भूतकाळाच्या चुकांची मोजदादच खोडुनी दे
मैफिलीची गोड गीते वाटती ना आळवावी
पाश प्रीतीचे चुकीचे जोडलेले तोडुनी दे

धाडलेली प्रेम पत्रे फोल गेली फाडुनी दे
गाळलेल्या आसवांचे व्याज आता फेडुनी दे
शोधलेले शिंपले मोती मला दावू नको तू
खर्चलेले नेटके क्षण आपले मज जोखुनी दे

सोसल्या कडवट क्षणांची याद आता टाकुनी दे
छेडलेले बासरीचे सूर आता मोजुनी दे
पोळल्या गेल्या जिवाला आस तू दावू नको रे
बरसलेले पावसाळी चांगले क्षण त्यागुनी दे

सांडलेल्या आठवांना फक्त आता वेचुनी दे
मोरपंखी भावनांचे निबर जाळे तोडुनी दे
भावनांशी खेळणारे फास तू फेकू नको ना
चाललेले खेळ सारे एकदाचे मोडुनी दे

कविता: वाईट भूतकाळ सोडून दे Read More »

फोटोग्राफी : परिसरातील सामान्य पक्षी – भाग ७

फोटोग्राफी

फोटोग्राफी : परिसरातील सामान्य पक्षी – भाग ७
Common Bird MH Photography Part7

फोटोग्राफी : परिसरातील सामान्य पक्षी – भाग ७ Read More »